agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, Chemists discover how blue light from digital devices speeds blindness | Agrowon

डिजिटल साधनांचा निळा प्रकाश डोळ्यांसाठी घातक

वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

सध्या मोबाईल, लॅपटॉपसह डिजिटल साधनांचा वापर सातत्याने होत आहे. या साधनातून बाहेर पडणारा निळा प्रकाश हा डोळ्यांसाठी हानीकारक ठरत असून, ते अंधत्वाकडे नेऊ शकत असल्याचे ‘युनिव्हर्सिटी ऑफ तोलेडो’ येथील ‘ऑप्टिकल केमिस्ट्री’ विषयातील संशोधकांचे मत आहे. त्यांनी केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष ‘जर्नल सायंटि.िफक रिपोर्ट्‌स’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

सध्या मोबाईल, लॅपटॉपसह डिजिटल साधनांचा वापर सातत्याने होत आहे. या साधनातून बाहेर पडणारा निळा प्रकाश हा डोळ्यांसाठी हानीकारक ठरत असून, ते अंधत्वाकडे नेऊ शकत असल्याचे ‘युनिव्हर्सिटी ऑफ तोलेडो’ येथील ‘ऑप्टिकल केमिस्ट्री’ विषयातील संशोधकांचे मत आहे. त्यांनी केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष ‘जर्नल सायंटि.िफक रिपोर्ट्‌स’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

सतत डिजिटल साधनांचा वापर आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे वाढत्या वयासोबत पेशींच्या निर्मितीमध्ये अडचणी येत असून, त्याचा परिणाम अंधत्वामध्ये होऊ शकतो. त्या विषयी माहिती देताना तोलेडो विद्यापीठातील रसायनशास्त्र आणि जैवरसायनशास्त्र विभागातील सहायक प्रा. डॉ. अजिथ करुणारत्ने यांनी सांगितले, की डिजिटल साधनातून उत्सर्जित होणाऱ्या निळ्या रंगाच्या प्रकाशामुळे डोळ्यांतील भिंग आणि बाहुलीवर विपरीत परिणाम होतो. त्याविषयी नुकतेच काही प्रयोग करण्यात आले.
मॅक्युलर डिजनरेशन हा सामान्यतः वयाच्या पन्नाशीनंतर आढळणारा डोळ्यांचा आजार आहे. त्यामध्ये रेटिनामधील प्रकाश ग्रहण करणाऱ्या पेशी मृत होत जातात. त्यामुळे हळूहळू दृष्टी अधू होत जाते. या पेशींना रेटिनल नावाच्या संयुगाची आवश्यकता असते. या संयुगांमुळे प्रकाशाची जाणीव होताच त्यासंबंधी मेंदूतील विशिष्ट भागापर्यंत संदेश पाठवला जातो. या रेटिनलशिवाय प्रकाश ग्रहण करणाऱ्या पेशी उपयोगशून्य होतात.

करुणारत्ने यांच्या प्रयोगशाळेत केलेल्या अभ्यासामध्ये सातत्याने निळा प्रकाश रेटिनलवर पडत राहिल्याने प्रकाश ग्रहण करणाऱ्या पेशीमध्ये विषारी रसायने तयार होत असल्याचे आढळले आहे. अशी रसायने हिरव्या, पिवळ्या किंवा लाल रंगाबाबत होत नाहीत.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी...

  • अधिक अभ्यासामध्ये संशोधकांना ई-जीवनसत्त्वाशी संबंधित अल्फा टोकोफेरॉल हे मूलद्रव्य आढळले आहे. ते डोळे व शरीरासाठी नैसर्गिक अॅण्टीऑक्सि़डेन्ट असून, पेशी मृत होण्यापासून रोखते. वाढत्या वयासोबत प्रतिकारक शक्ती कमी होते. माणसांच्या रेटिनलची निळ्या प्रकाशाशी झगडण्याची क्षमता कमी होते.
  • करुणारत्ने या प्रयोगशाळेमध्ये टीव्ही, मोबाईल, टॅबलेट यांच्या स्क्रीनच्या प्रकाशाचे डोळ्यावर होणारे परिणाम तपासले जात आहेत.
  • सध्या काही मोबाईल कंपन्या निळ्या प्रकाशासाठी फिल्टर्स बसवत आहेत. ते डोळ्यासाठी फायदेशीर राहू शकते, असे संशोधक जॉन पेटन यांनी सांगितले.
  • त्याचप्रमाणे अतिनील आणि निळा प्रकाश रोखणारे चष्मे वापरण्याचा सल्ला करुणारत्ने देतात.

 


इतर ताज्या घडामोडी
पुणे विद्यापीठात पश्चिम विभागीय औषधी...पुणे  ः केंद्र सरकारच्या आयुष...
शिर्डीतील सामुदायिक विवाह सोहळ्यासाठीची...शिर्डी, जि. नगर  : साई सिद्धी चॅरिटेबल...
माळेगाव कारखान्यात सत्तापरिवर्तन;...माळेगाव, जि. पुणे  ः राज्यात लक्षवेधी...
नगर जिल्ह्यातील सहा केंद्रांवर तूर...नगर  ः जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदीसाठी आठ...
कर्जमाफीवरून विरोधक दुसऱ्या दिवशीही...मुंबई  ः भाजपने शेतकरी कर्जमाफी आणि महिला...
सातारा जिल्ह्यात ९० टक्के क्षेत्रावर...सातारा  ः जिल्ह्यात पोषक वातावरणामुळे रब्बी...
मसाला, सुगंधी वनस्पतीवर्गीय पिकांची...अकोला  ः ‘‘आपल्याकडील हवामान, जमीन हे मसाला...
मराठवाड्यात यंदा तुती लागवडीसाठी...औरंगाबाद : मराठवाड्यात गतवर्षी दुष्काळाचा...
संपूर्ण कर्जमुक्तीसाठी भाजपचे आंदोलन अकोला  : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने...
`म्हैसाळ`च्या उन्हाळी आवर्तनाकडे...सलगरे, जि. सांगली : म्हैसाळ पाणी योजनेचे कालवे...
अकोला झेडपी देणार आत्महत्याग्रस्त...अकोला  ः नापिकी, कर्जबाजारीपणामुळे जिल्ह्यात...
लातूर विभागात १४ लाख हेक्‍टरवर रब्बी...लातूर : विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत...
अमरावती जिल्ह्यात निवडणुकांचा बिगुलअमरावती  ः जिल्ह्यात एप्रिल ते जून या...
वऱ्हाडातील चार लाख शेतकरी...अकोला  ः राज्य शासनाने जाहीर केलेल्या...
मराठवाडा, खानदेशातील नऊ कारखान्यांची...औरंगाबाद  : येथील साखर सहसंचालक...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात ३३११...नांदेड : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
जळगाव : कर्जमाफीसाठी ११३ शेतकऱ्यांचे...जळगाव  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
कराडी येथे रेंजअभावी कर्जमाफी लाभार्थी...पारोळा, जि. जळगाव ः राज्य सरकारच्या महात्मा...
पुष्पोत्सव अधिक मोठ्या स्वरूपात साजरा...नाशिक : ‘नाशिक महापालिका राबवत असलेला...
नाशिक जिल्ह्यात गव्हाच्या पेऱ्यात वाढनाशिक : जिल्ह्यात रब्बीच्या एकूण १ लाख १३ हजार...