अळिंबी - वनस्पती या मैत्रीसाठी झाला जनुकाचा ऱ्हास

अळिंबी - वनस्पती या मैत्रीसाठी झाला जनुकाचा ऱ्हास
अळिंबी - वनस्पती या मैत्रीसाठी झाला जनुकाचा ऱ्हास

फ्लाय अॅमानिटा या अळिंबीतील एका जनुकाचा ऱ्हास झाल्यामुळे अन्य वनस्पतींशी सहजीवी संबंधाकडे तिची वाटचाल सुरू झाल्याचे विस्कॉन्सिन मॅडीसन विद्यापीठातील संशोधकांना आढळले आहे. अनेकवेळा अशा घटनांचा अर्थ जनुकांच्या उत्क्रांतीशी लावण्यात येत असला तरी या घटनेमध्ये एक जनुक नष्ट झाल्याचे दिसून आले आहे. हे संशोधन ‘जर्नल मॉलेक्युलर बायोलॉजी अॅँड इव्हॅल्युशन’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. फ्लाय अॅमानिटा ही अळिंबी आपल्या गडद रंगाद्वारे आपल्याकडे आकर्षित होणाऱ्याला धोक्याचा इशारा देते. ही अळिंबी खाण्यात आल्यानंतर भास होऊ लागतात. दृष्टीमध्ये बदल होऊन वस्तू मोठ्या आणि तरीही दाबल्या गेल्याप्रमाणे दिसतात. या गुणधर्मामुळे जादूची अळिंबी म्हणून परिकथांमध्ये (‘अॅलाईस इन वंडरलॅंड’ सारख्या) तिला स्थान मिळाले आहे. अॅमानिटा कुळातील काही अळिंबी या मृत्यूकारक आहेत. इतक्या विषारी असलेल्या या अळिंबी वनस्पतींशी मात्र मित्रत्वाने किंवा सहजिवी पद्धतीने वागतात. शर्करेच्या बदल्यामध्ये वनस्पतींना काही खनिजे आणि अन्नद्रव्ये पुरवतात. ही मैत्री ५० दशलक्ष वर्षांपासून सुरू आहे. असे आहे संशोधन

  • विस्कॉन्सिन मॅडीसन विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र आणि जिवाणूशास्त्राच्या प्रो. अॅनी प्रिंगल यांच्यासह व्हियन्ना विद्यापीठातील संशोधिका जॅकेलिन हेस यांनी नॉर्वे, नेदरलॅंड, फ्रान्स आणि सौदी अरेबिया येथील संशोधकांच्या सहकार्याने अभ्यास केला. प्रामुख्याने मुक्तपणे आढळणाऱ्या व सहजिवी संबंधापासून वेगळ्या अॅमानिटा प्रजातीं वेगळ्या मिळवण्यात आल्या. सहजिवी संबंधामध्ये कार्यरत अळिंबीच्या तीन प्रजातीं (त्यात फ्लाय अॅमानिटा यांचा समावेश होता.) आणि असहजिवी पद्धतीने कार्यरत अशा तीन जवळच्या प्रजातीं यांचे जनुकीय विश्लेषण केले.
  • अन्य अनेक बाबी सारख्या असूनही जनुकीय पातळीवरील भिन्नता मोठी आहे. सहजिवी प्रजातींमध्ये जनुकांची संख्या जवळपास दुप्पट आढळली. एकदा वेगळा जनुकीय रस्ता पकडल्यानंतर त्यांनी वनस्पतींशी भागीदारी करण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण रचना विकसित केली.
  • सुरवातीच्या संशोधनामध्ये काही अन्य अळिंबीच्या कुळामध्ये सहजिवी पद्धतीसाठी पेशींतील सेल्युलोज आधारित भित्तिकातील विकरे (एंझाईम्स) नष्ट झाल्याचे आढळले होते. ही जनुके कुजणाऱ्या पानातून अन्नद्रव्ये मिळण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. मात्र वनस्पतींची जुळवून घेण्यामध्ये त्यांची अडचण ठरली असती. कुजणाऱ्या पदार्थांच्या पचनीयतेसाठी आवश्यक विकरांची अनुलब्धता अॅमानिटा इनोपीनाटा या प्रजातीमध्ये दिसून आली. ही प्रजाती सहजिवी संबंध आणि असहजिवी जगणाऱ्या अळिंबीच्या दरम्यानची स्थिती असल्याचे हेस यांचे मत आहे.
  • प्रिंगल यांनी या घटनेवर केलेली टिप्पणी महत्त्वाची आहे. त्या म्हणतात, मैत्रीसाठी त्यागाची आवश्यकता असते.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com