अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन तंत्रातून उत्पन्नात वाढ

अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन तंत्रातून उत्पन्नात वाढ
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन तंत्रातून उत्पन्नात वाढ

सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे. नागालॅंडसारख्या भाताचे उत्पादन अधिक असलेल्या प्रदेशामध्ये व्यावसायिक अळिंबी उत्पादनाला मोठा वाव आहे. त्यातून शेतकऱ्यांकडील भाताच्या भुश्शांचा पुनर्वापर होण्यासोबतच चांगले आर्थिक उत्पन्नही मिळू शकते. या उद्देशाने भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या नागालॅंड केंद्राने अळिंबी उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले आहे. दिमापूर येथीळ राजिब मोंडल यांनी ही संधी लक्षात घेऊन अळिंबी उत्पादनाला प्रारंभ केला. भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या सहकार्याने अळिंबी उत्पादक म्हणून चांगले नाव कमावले आहे. अळिंबी उत्पादनासाठी त्यांनी अत्यंत कमी खर्चातील युनिट उभारले आहे. अळिंबी उत्पादनासाठी मिळत असलेल्या प्रोत्साहनामुळे गेल्या काही वर्षांमध्ये अळिंबीच्या स्पॉनच्या मागणीमध्ये वेगाने वाढ होत आहे. हे पाहता त्यांनी स्पॉन उत्पादनालाही सुरवात केली आहे. मोंडल यांनी बाजरा, गहू यांच्या भुश्शांचा वापर भाताच्या भुश्शाऐवजी करत आहेत. त्यामुळे त्यांना वर्षभर अळिंबी उत्पादन घेणे शक्य होते. हंगामामध्ये प्रतिमाह ६५० ते ७०० स्पॉन पॅकेटनिर्मिती करणे शक्य होत आहे. एक स्पॉन पॅकेट २०० ग्रॅम वजनाचे असते. त्यातील ३०० ते ४०० पाकिटांची विक्री नागालॅंडमधील शेतकऱ्यांनी केली जाते. त्यातून प्रतिमाह सुमारे ८७५० रुपये उत्पन्न मिळते. उर्वरित पाकिटे ही स्वतःच्या अळिंबी उत्पादनासाठी वापरली जातात. त्यांच्या अळिंबी उत्पादनाचा आवाकाही वाढला आहे. दर महिन्याला साधारणपणे ते ३६० किलो ओयस्टर अळिंबी तयार करतात. त्यातून त्यांनी महिन्याला सुमारे ३६ हजार रुपये मिळतात. स्पॉन आणि अळिंबीचे एकत्रित उत्पन्न ४४ हजार ७५० रुपये होते. या अळिंबीची विक्री नागालॅंड येथील दिमापूर, वोखा, मोकाक्चूंग जिल्ह्यांमध्ये केली जाते. अधिक उत्पादन झाल्यास अन्य जिल्ह्यांमध्येही माल पाठवला जात असल्याचे मोंडल यांनी सांगितले. सध्या अळिंबीच्या मागणीच्या तुलनेमध्ये नागालॅंडमध्ये उत्पादन अत्यंत कमी आहे. त्यामुळे अळिंबी उत्पादनाला मोठ्या संधी आहेत. राजिब मोंडल हे नागालॅंड येथील यशस्वी अळिंबी उत्पादक आणि व्यावसायिक स्पॉन उत्पादक म्हणून ओळखले जातात. बटन अळिंबीसारख्या अन्य प्रकारच्या अळिंबीच्या उत्पादनासाठी त्यांनी नियोजन सुरू केले आहे. स्पॉन उत्पादनासाठी मोंडल यांनी द्रवरुर स्पॉन तंत्रज्ञानाची पद्धत अवलंबली आहे. या पद्धतीने कमी वेळामध्ये अधिक उत्पादन होते. त्याचप्रमाणे त्यात कोणतेही प्रदूषण होण्याच्या शक्यता कमी होतात. उत्तम दर्जाचे स्पॉन्स मिळतात. मोंडल यांच्या कार्यासाठी भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या नागालॅंड केंद्राच्या वतीने नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या स्वीकारासाठी गौरव करण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com