चीनमधून पांझ्हिहुआ आंब्याची रशियाला निर्यात

चीनमधून पांझ्हिहुआ आंब्याची रशियाला निर्यात
चीनमधून पांझ्हिहुआ आंब्याची रशियाला निर्यात

चीनमधील वैशिष्ट्यपूर्ण पांझ्हिहुआ आंब्यांची निर्यात रशियामध्ये करण्यात येत आहे. चीनमधील पांझ्हिहुआ परिसरामध्ये या आंब्याची लागवड असून, येथील अतिउंच भागामध्ये हिवाळा नसल्याने नैसर्गिक हरितगृहाप्रमाणे स्थितीत त्याची वाढ होते. उत्तम दर्जा आणि चवीमुळे त्याला जगभरातील अनेक ठिकाणांहून मागणी आहे. पांझ्हिहुआ आंबा अन्य प्रदेशांच्या तुलनेमध्ये एक ते दोन महिने उशिरा म्हणजेच ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात बाजारात येतो. तर आग्नेय आशियातील देशांच्या तुलनेमध्ये २ ते ५ महिने नंतर हा आंबा बाजारात येतो. परिणामी, या काळात देशासह परदेशामध्ये चांगली मागणी असते. या आंब्याच्या निर्यातीतील महत्त्वाची कंपनी शांघाय क्विनवेई इंटरनॅशनल ट्रेडिंग लि. येथील आयरीन यांनी सांगितले, की जुलै महिन्यामध्ये पांझ्हिहुआ आंबा उत्पादनाची पहिली २० टनांची बॅच नुकतीच बाहेर पडली. त्याच्या सर्व चाचण्या पार पडल्या असून, त्याची निर्यात कोणत्याही मध्यस्थाविना सरळ रशियाला करण्यात आली. कंपनीच्या एलव्ही क्विंग या ब्रँडखाली बेलारूस, कझाकस्तान, उझबेकिस्तान या देशामध्ये विविध ताज्या भाज्या, फळे व वाळविलेली फळे निर्यात केली जातात. सुपर मार्केटलाही सरळ निर्यात पूर्वीपासून रशिया आणि हाँगकाँग येथील पांझ्हिहुआची निर्यात होत आली आहे. त्यात यावर्षी प्रथम व्हॅन्कोव्हर येथील सुपर मार्केटची भर पडली. व्हॅन्कोव्हर येथील सुपर मार्केटच्या सर्व चाचण्या आणि कडक निकषाची पूर्तता करत पांझ्हिहुआ आंब्याची पहिली शिपमेंट पाठविण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com