agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, Gene network lets plant roots handle nitrogen | Agrowon

नत्राच्या शोषण, पचनासाठी कार्यरत जनुकांचे नेटवर्क ओळखले
वृत्तसेवा
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

नत्र हे पिकांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा अन्नद्रव्यांपैकी एक आहे. पिकाची मुळे जमिनीतून शोषण्याची क्रिया आणि त्याचा वनस्पतीअंतर्गत चयापयांच्या प्रक्रियेचा सखोल वेध कॅलिफोर्निया विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञा सिओभान ब्रॅडी व कोल्ड स्प्रिंग हार्बर प्रयोगशाळेतील सहकाऱ्यांनी एकत्रितरीत्या केलेल्या संशोधनात घेतला आहे. यामुळे पिकांची वाढ आणि एकूण उत्पादनाला चालना मिळणार आहे. हे संशोधन ‘जर्नल नेचर’मध्ये प्रकाशित झाले आहे.

नत्र हे पिकांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा अन्नद्रव्यांपैकी एक आहे. पिकाची मुळे जमिनीतून शोषण्याची क्रिया आणि त्याचा वनस्पतीअंतर्गत चयापयांच्या प्रक्रियेचा सखोल वेध कॅलिफोर्निया विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञा सिओभान ब्रॅडी व कोल्ड स्प्रिंग हार्बर प्रयोगशाळेतील सहकाऱ्यांनी एकत्रितरीत्या केलेल्या संशोधनात घेतला आहे. यामुळे पिकांची वाढ आणि एकूण उत्पादनाला चालना मिळणार आहे. हे संशोधन ‘जर्नल नेचर’मध्ये प्रकाशित झाले आहे.

नत्रयुक्त खतांच्या शोधाला सुमारे शंभर वर्षे पूर्ण झाले आहे. या खतामुळे कृषी उत्पादकतेमुळे प्रचंड वाढ झाली, अब्जावधी लोकांच्या भुकेच्या समस्येवर काही अंशी तरी मात करता आली. मात्र, या खतांच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनीच्या समस्या वाढत गेल्या. वाहत्या पाण्यासोबत खतांसोबत कीडनाशकांचे अंश पाण्याचे स्रोत, नद्या, तलाव आणि समुद्रामध्ये वाढत आहे. याचे विपरीत परिणामही दिसू लागले आहेत.
या नत्रयुक्त खतांविषयी माहिती देताना कॅलिफोर्निया विद्यापीठातील वनस्पती जीवशास्त्राच्या सहायक प्रा. सिओभान ब्रॅडी यांनी सांगितले, की नत्राचे चयापचय वनस्पतींच्या वाढीमध्ये अतुल्य महत्त्वाचे आहे. नत्राचे पचन आणि वहन यांमध्ये कार्यरत जनुकांची ओळख पटवलेली असली तरी या सर्व प्रक्रियेचे नियंत्रण कशाप्रकारे होते, याविषयी फारशी माहिती उपलब्ध नव्हती. जनुकांचे नेटवर्क मुळांच्या जिवंत राहण्यामध्ये आणि वाढीमध्ये कशाप्रकारे कार्य करते, यावर संशोधन आमच्या प्रयोगशाळेमध्ये संशोधन सुरू केले.
अशा नियंत्रण जनुकांना त्यांच्या अन्य जनुकांच्या कार्याला नियंत्रित करण्याच्या गुणधर्मांमुळे `ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर` म्हणून ओळखले जाते. फांद्या, फुटले, पाने यांमध्ये आजवर त्यांची ओळख पटली होती. मात्र, मातीतून नत्र ज्या मुळांद्वारे वनस्पतीमध्ये प्रवेश करतो, त्या मुळांमध्ये त्यांची ओळख पटली नव्हती.

मुळांतील शास्त्र
पदवीचे विद्यार्थी अॅलीसन गौडीनिअर यांनी ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर म्हणून कार्यरत अशा शेकडो जनुकांचे रोबोटिक्सद्वारे विश्लेषण केले. त्याच सोबत कोल्ड स्प्रिंग हार्बर लॅबोरेटरीतील सहयोगी प्रा. डोरेन वारे आणि सहकाऱ्यांनी या नेटवर्कमध्ये कार्यरत अत्यंत महत्त्वाच्या जनुकांचा अंदाज संगणकीय पद्धतीने घेतला. त्यानंतर कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी या संभाव्य महत्त्वाच्या जनुकांची नेमकी भूमिका अभ्यासली. त्यातून नत्राच्या चयापचयामध्ये कार्यरत अत्यंत महत्त्वाच्या अशा जनुकांचा गट मिळवण्यात यश आले.

भविष्यात ज्या वेळी नत्र कार्यक्षम अशा जातींची पैदास करण्याचा विचार होईल, तेव्हा या जनुकांना टाळून पुढे जाताच येणार नाही. अर्थात, या संशोधनामुळे अनेक संशोधनाला नवी  दिशा मिळणार आहे.
- सिओभान ब्रॅडी,
सहायक प्राध्यापिका, कॅलिफोर्निया डेव्हिस विद्यापीठ, अमेरिका.

इतर ताज्या घडामोडी
सरपंच ग्रामसंसद महासंघाच्या...अकोला  ः शेगाव येथे नुकत्याच झालेल्या राज्य...
सातारा जिल्ह्यातील चार साखर...सातारा  : गाळप हंगामातील ऊस उत्पादकांची...
‘आदिनाथ'च्या कामगारांचे पगारासाठी ‘...सोलापूर : आदिनाथ साखर कारखान्याकडून ४१ महिने...
उजनी कालवा फुटला, पिके उद्‌ध्वस्तमोहोळ, जि. सोलापूर : उजनी धरणाचा डावा कालवा मोहोळ...
आधुनिक तंत्रांचा वापर करून स्मार्ट शेती...अकोला : ऊतिसंवर्धित हळद रोपांची निर्मिती आणि...
सांगली जिल्ह्यात अजूनही ९१ टॅंकर सुरूचसांगली  ः जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासूनच...
सिंधुदुर्गातील वृद्ध दाम्पत्यावर...सिंधुदुर्ग  ः पाळीव कुत्र्याला वाचविण्यासाठी...
पुणे जिल्ह्यात २१ ऑक्टोबर रोजी मतदानपुणे : ‘‘विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात शहरी...
अखेर बगाजी सागर ‘ओव्हर फ्लो’धामणगाव रेल्वे, जि. अमरावती  : अमरावती आणि...
'स्मार्ट' मुख्यालयाला मिळाली नवी जागापुणे :  राज्याच्या स्मार्ट प्रकल्पाच्या...
सोलापूर जिल्ह्यात मका लष्करी अळीने केला...सोलापूर ः दुष्काळातही जेमतेम पाण्यावर यंदा...
तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पुणे ः उत्तर, दक्षिण महाराष्ट्रात कमी दाबाचे...
अकोला जिल्ह्यात तीन तालुक्यांत अतिवृष्टीअकोला ः मागील २४ तासांत अकोला जिल्ह्यात दमदार...
डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार...पुणे ः डॉ. परुळेकर जयंतीनिमित्त ‘सकाळ माध्यम...
कर्जमाफी, ऊसबिलासाठी शेतकऱ्यांचा एल्गारनवी दिल्ली : शेतकरी कर्जमाफी, थकीत ऊसबिल,...
पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी...नाशिक  : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना...
औरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
मराठवाड्यातील ११ मंडळांत जोरदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी ३८४...
`प्रक्रिया उत्पादनांवरील १२ टक्के...रत्नागिरी : कोकणातील फळ उद्योगांसाठी...
सांगली जिल्हा बॅंकेच्या ऑनलाइन परिक्षा...सांगली : जिल्हा बॅंकेतील कनिष्ठ लिपिक पदाच्या...