जंगल संवर्धनाच्या पद्धतींत हवा अधिक काटेकोरपणा

जंगल संवर्धनाच्या पद्धतींत हवा अधिक काटेकोरपणा
जंगल संवर्धनाच्या पद्धतींत हवा अधिक काटेकोरपणा

सध्या जंगलातील विविधता टिकवण्याच्या दृष्टीने रोपांची निर्मिती करून त्यांची लागवड नैसर्गिक जंगलामध्ये करण्याची पद्धती राबवली जात आहे. मात्र, उत्तर कॅलिफोर्नियातील पाच स्थानिक रोपवाटिकांच्या सर्वेक्षणातून संशोधकांना चार अस्थानिक फायटोप्थोरा आढळल्या आहेत. अशा परदेशी आणि बुरशीनाशकांना प्रतिकारकता विकसित केलेल्या वनस्पतींतून जंगलातील बुरशींमुध्येही प्रतिकारकता विकसित होण्याचा धोका वाढू शकतो, याकडे कॅलिफोर्निया- बर्केले विद्यापीठातील संशोधक लक्ष वेधत आहेत. यावर मात करण्यासाठी त्यांनी व्यवस्थापनाच्या नव्या पद्धतींसह बुरशींचे निदान करण्याच्या नव्या पद्धतींची सांगड घालण्याची आवश्यकता आहे. तसेच बुरशींचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी जंगल संवर्धनाच्या पद्धतींतही अधिक काटेकोरपणा आणण्याची गरज संशोधक व्यक्त करत आहेत. २०१४ मध्ये कॅलिफोर्निया कृषी विभागातील वनस्पती जीवशास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासामध्ये स्थानिक जंगली फुले आणि औषधी वनस्पतींबाबत महत्त्वाची बाब आढळली होती. जंगलामध्ये लागवडीसाठी रोपवाटिकांमध्ये तयार केलेल्या रोपांमध्ये फायटोप्थोरो टेन्टाक्युलाटा ही परदेशी बुरशी आढळली होती. ही बुरशी मूळ आणि खोडकूजसाठी कारणीभूत ठरते. तोपर्यंत पर्यावरणतज्ज्ञ हे बाहेरून आयात केलेल्या रोपांमुळे किंवा झाडांबाबत अधिक साशंक होते. मात्र, स्थानिक पातळीवर तयार केलेल्या जंगली वनस्पतींच्या रोपांमार्फतही जंगलांमध्ये रोगांचा प्रसार होऊ शकत असल्याचे नुकत्याच प्रकाशित झालेल्या संशोधनातून पुढे आले आहे. अशा परदेशी बुरशींच्या प्रादुर्भावामुळे जंगलातील ओक झाडे मृत झाल्याचे दिसून आले आहे.

  • उत्तर कॅलिफोर्निया येथील पाच स्थानिक रोपवाटिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये चार परदेशी किंवा अस्थानिक फायटोप्थोरा बुरशींचे बीजाणू आढळले आहे. या बुरशी स्थानिक किंवा जंगलामध्ये आढळणाऱ्या नियमित बुरशी प्रजातींच्या तुलनेमध्ये अधिक आक्रमक असून, त्यात  बुरशीनाशकांविरुद्ध वेगाने प्रतिकारकता विकसित होते.   
  • स्थानिक जंगलाच्या संवर्धनासाठी राबवल्या जाणाऱ्या प्रकल्पांवर सुमारे एक कोटी डॉलर्स इतका खर्च केला जात आहे. अर्थात, या प्रकल्पातून मिळणारे जैवविविधता संवर्धन, आर्थिक आणि आरोग्यासाठीचे फायदे त्याहीपेक्षा अधिक मौल्यवान आहेत. परिसरामध्ये पाण्याचा व हवेचा दर्जा सुधारण्यास मदत होणार असल्याचे मत पर्यावरणशास्त्र, धोरण आणि व्यवस्थापन या विषयाचे प्रा. मॅट्टेओ गार्बेलोट्टो यांनी मांडले.   
  • निष्कर्ष शेतीसाठीही तितकेच महत्त्वाचे...

  • गार्बेलोट्टो आणि त्यांच्या गटाने स्थानिक आणि जंगली वनस्पतींच्या रोपवाटिकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या बुरशीनाशकांचा आणि त्यामुळे वनस्पतींमध्ये निर्माण होत असलेल्या प्रतिकारकतेचा अभ्यास केला.  
  • ही बुरशी फॉस्फाइटयुक्त बुरशीनाशकांसाठी अधिक सहनशील असल्याचेही आढळले. त्यानंतर न्यूझीलंड येथील संशोधक गटासह फायटोप्थोरा या रोगकारक बुरशींमध्ये फॉस्फाइटविरुद्ध तयार झालेली प्रतिकारकतेचा अभ्यास करण्यास सुरवात केली. जंगले आणि रोपवाटिकांच्या असंख्य नमुन्यातून फायटोप्थोराच्या ११ प्रजाती गोळा केल्या. त्यांची फॉस्फाइटप्रती असलेली संवेदनशीलता मोजण्यात आली असून, चार प्रजाती या प्रतिकारक आढळल्या.
  • यात फायटोप्थोरा रॅमोरम हे बुरशी उत्तर अमेरिकेतील ओक झाडांच्या आणि युरोपातील लार्क झाडाच्या मृत होण्यासाठी कारणीभूत आढळली. फायटोप्थोरा क्रास्सामुरा ही प्रजाती कॅलिफोर्निया- बर्केले विद्यापीठातील संशोधकांनी प्रथम स्थानिक वनस्पती रोपवाटिकांमध्ये व संवर्धन क्षेत्रामध्ये आढळली आहे.
  • या चार प्रजाती जनुकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या प्रजातींसारख्याच असूनही, त्यांनी प्रतिकारकता विकसित केली आहे. ही प्रतिकारता त्यांनी रोपवाटिकेत मिळवली असण्याची शक्यता गृहीत धरून  सर्वेक्षण व अभ्यास करण्यात आला. हे गृहीतक खरे ठरले.
  • ही बुरशी नव्या वातावरणाशी त्वरित जुळवून घेत असल्याचेही लक्षात आले. त्यामुळे मोठ्या क्षेत्रामध्ये प्रसार होऊन स्थानिक वनस्पतींना फटका बसू शकतो.
  • वेगाने पसरणारी समस्या

  • रोगांचा प्रसार आणि त्याद्वारे होणारी जंगली झाडांची मर यांचा संबंध स्थानिक वनस्पतींच्या रोपवाटिकांतील वाढीशी घालण्यात आला आहे. हे संशोधन जर्नल प्लॅन्ट पॅथॉलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
  • पाच संवर्धन रोपवाटिकांमध्ये केलल्या अभ्यासामध्ये २०३ वनस्पतींचे विश्लेषण करण्यात आले. त्यातील ५५ वनस्पतींमध्ये फायटोप्थोराचा प्रादुर्भाव आढळला. रोपवाटिकांतील  मातृवृक्षांमध्ये उच्च पातळीवर प्रादुर्भाव दिसू आला. काही प्रजातीमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक प्रादुर्भावग्रस्त रोपे आढळली.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com