जमशेदपूर येथे फुलतेय जरबेरा शेती

सुदीप्ता घोष या आपल्या जरबेरी शेतीबरोबरच आजूबाजूच्या शेतकऱ्यांसाठी करारशेतीतून उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
सुदीप्ता घोष या आपल्या जरबेरी शेतीबरोबरच आजूबाजूच्या शेतकऱ्यांसाठी करारशेतीतून उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

देशातील महत्त्वाच्या स्टील उद्योगासाठी ओळखल्या जाणाऱ्या जमशेदपूर परिसरातील पूर्व सिंघभूम भागामध्ये जरबेराची शेती फुलत आहे. येथील संरक्षित फूलशेतीची सुरवात २०१६ मध्ये करणाऱ्या सुदीप्ता घोष (वय ४६ वर्षे) यांच्यापासून अनेकांना प्रेरणा घेत फूलशेती वाढत आहे. पुढील टप्प्यामध्ये स्थानिक शेतकऱ्यांशी करार करत त्यांच्या प्रशिक्षणासह विपननाचे मॉडेल उभारणी करण्याचे त्यांचे नियोजन आहे. वर्षामध्ये नाताळ आणि व्हॅलेंटाईन डे या निमित्ताने फुलांची मोठी निर्यात होत असते. या अनुषंगाने शेतकरी वर्षभर नियोजन करत असतात. मात्र, जमशेदपूर जवळ गेल्या दोन वर्षांपासून संरक्षित शेतीमध्ये जरबेरा फुलांची शेती करणाऱ्या सुदीप्ता घोष यांनी आजूबाजूंच्या शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण आणि विपननाचे प्रारूप तयार करत आहेत. त्यातून शेतकऱ्यांना फायदा होऊ शकेल, असा त्यांचा दावा आहे. मूलतः अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवीनंतर कॉस्ट अकाउंटंट म्हणून सुमारे १४ वर्षे कार्यरत असलेल्या सुदीप्ता घोष यांनी पाच एकर शेतीमध्ये जरबेरा उत्पादनाला सुरवात केली. त्यापूर्वी त्यांनी एक्सएलआरआय या संस्थेतून सहा महिन्यांचा उद्योजकताविषयक अभ्यासक्रम पूर्ण केला. पूर्व सिंघभूम येथील घाटशीला भागात खुंटादीह येथे असलेल्या पाच एकर शेतीतून २०१७-१८ मध्ये त्यांनी ८ लाख रुपये उत्पन्न मिळवले. आता २०१९ मध्ये आजूबाजूच्या भात उत्पादक शेतकऱ्यांवर सुदीप्ता यांनी लक्ष केंद्रित केले असून, फुले, भाजीपाला शेतीकडे वळवण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात ब्रोकोली आणि ढोबळी मिरची यांची लागवड करण्यात येत आहे. आपल्या प्रकल्पाविषयी बोलताना त्या म्हणाल्या, की प्रत्यक्ष शेतीमध्ये उतरल्यानंतर अनेक समस्या, ज्यापूर्वी मी केवळ ऐकून होते, त्यांचा जवळून परिचय झाला. झारखंड राज्यातील शेतीही सुपीक असून, पिके, फुले आणि भाज्या यांचे चांगले उत्पादन घेत आहेत. मात्र, या शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ ही समस्या ठरत आहे. मागणी आणि पुरवठ्यातील दरी भरून काढण्यासाठी खूप काम करण्याजोगे आहे. त्यासाठी देशभरातील विविध भागांतील निर्यातदार आणि प्रत्यक्ष उत्पादक यांना जोडण्याची आवश्यकता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com