agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, Pesticide exposure can dramatically impact bees' social behaviors, study shows | Agrowon

कीडनाशकांच्या संपर्कामुळे मधमाश्यांच्या वर्तनावर होतो परिणाम
वृत्तसेवा
रविवार, 11 नोव्हेंबर 2018

हार्वर्ड विद्यापीठातील संशोधकांनी निओनिकोटीनॉईड कीडनाशकांच्या संपर्कात आलेल्या मधमाश्यांच्या वर्तनावरील परिणामांच्या अभ्यासासाठी नावीन्यपूर्ण रोबोटिक प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे. या कीडनाशकांच्या संपर्कात आलेल्या मधमाश्यांच्या सामाजिक वर्तनामध्ये बदल होतो. विशेषतः मधमाश्या अळ्यांच्या संगोपनामध्ये कमी वेळ घालवतात आणि अन्य मधमाश्यांशीही कमी संपर्क करत असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे मधमाश्यांचे घर उष्ण ठेवण्याच्या क्षमतेवर परिणाम होत असून, वसाहतींचे मेणाच्या साह्याने बंद करण्यात अडचणी येत असल्याचे अतिरिक्त चाचण्यामध्ये दिसून आले.

हार्वर्ड विद्यापीठातील संशोधकांनी निओनिकोटीनॉईड कीडनाशकांच्या संपर्कात आलेल्या मधमाश्यांच्या वर्तनावरील परिणामांच्या अभ्यासासाठी नावीन्यपूर्ण रोबोटिक प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे. या कीडनाशकांच्या संपर्कात आलेल्या मधमाश्यांच्या सामाजिक वर्तनामध्ये बदल होतो. विशेषतः मधमाश्या अळ्यांच्या संगोपनामध्ये कमी वेळ घालवतात आणि अन्य मधमाश्यांशीही कमी संपर्क करत असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे मधमाश्यांचे घर उष्ण ठेवण्याच्या क्षमतेवर परिणाम होत असून, वसाहतींचे मेणाच्या साह्याने बंद करण्यात अडचणी येत असल्याचे अतिरिक्त चाचण्यामध्ये दिसून आले. या संशोधनाचे निष्कर्ष ‘सायन्स’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

सर्व सामाजिक प्राण्यामध्ये आदर्श म्हणून मधमाश्यांचे उदाहरण दिले जाते. त्यात प्रामुख्याने खाद्यान्नांचा शोध, पिल्लांची काळजी घेणे, शरीराच्या साह्याने वसाहतीची तापमान योग्य पातळीवर ठेवणे, घरट्यांची दुरुस्ती अशा अनेक गोष्टी एक कुटुंब म्हणून केल्या जातात. मात्र, गेल्या काही दशकांमध्ये कीडनाशकांच्या संपर्कामुळे त्यांच्या वर्तनामध्ये परिणाम होत असल्याचे सातत्याने समोर येत होते. नुकत्याच जेम्स क्रॉल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या एका अभ्यासामध्ये वर्तनातील बदल हे हिमनगाचे वरचे टोक असल्याचे स्पष्ट झाले आहे. बेंजामीन डी बायवोर्ट यांच्या प्रयोगशाळेत संशोधन करणारे थॉमस डी. कॅबोट, क्रॉल यांनी निओनिकोटीनॉईड गटातील किडनाशकांचे मधमाश्यांच्या सामाजिक वर्तनावर अभ्यास केला आहे. त्यासाठी त्यांनी नावीन्यपूर्ण रोबोटीक प्लॅटफॉर्म वापरला आहे.
क्रॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९९० च्या दरम्यान निओनिकोटीनॉईड गटातील किडनाशकांचा वापर सुरू झाला. पुढे हा गट सर्वाधिक वापराच्या कीडनाशकांमध्ये सामील झाला. सामान्यतः त्यांचा वापर बीजप्रक्रियेसाठी होत असे. आंतरप्रवाही असलेल्या किडनाशकांच्या परिणामामुळे संपूर्ण वनस्पती किडीला दूर ठेवू शकते. मात्र, त्याचे विषारीपण पराग आणि मधापर्यंत पोचत असल्याने मधमाश्यांसाठी हानिकारक ठरत आहे.

  • आतापर्यंत अनेक अभ्यास हे मधमाश्यांच्या खाण्याच्या वर्तनासंबंधी झाले आहे. मात्र, एकूण सामाजिक वर्तनातील तो केवळ एक भाग असून, अन्य सामाजिक वर्तनही एकूण वसाहतीच्या संरचनेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. एकाच वेळी १० ते १२ वसाहतींचा अभ्यास करण्यासाठी क्रॉल आणि सहकाऱ्यांनी वैशिष्ट्यपूर्ण रोबोटीक प्लॅटफॉर्म विकसित केला आहे.
  • प्रत्येक मधमाशींच्या पाठीवर एक सोपा क्यूआर कोड लावण्यात आला. या कोडचे वाचन करणाऱ्या एक कॅमेरा वसाहतीच्या वर फिरता ठेवण्यात आला. त्यामुळे प्रत्येक मधमाशीचे वर्तन संगणकांमध्ये स्वयंचलित पद्धती टिपले जाऊ लागेल. अगदी वसाहतीच्या आतपर्यंत शिरकाव करणे शक्य झाले.
  • मधमाश्यांना किडनाशकांचा विशिष्ठ पातळीपर्यंत डोस देऊन, त्यांच्या वर्तनात पडणाऱ्या फरकांचा अभ्यास करणे शक्य झाले. अशा माश्या अन्य माश्यांशी संपर्क कमी करत असून, वसाहतीच्या बाहेर अधिक काळ घालवत असल्याचे दिसून आले.
  • या अभ्यासासाठी मधमाश्यांना वास्तविक प्रमाणात कीडनाशकांचा डोस देण्यात आला. त्याचे त्यांच्या शरीरक्रियेवर आणि सामाजिक वर्तनातील फरकांच्या नोंदी करण्यात आल्या. या रोबोटीक पद्धतीमुळे एकाच वेळी १२ संपूर्ण वसाहतींचे निरीक्षण करता आले.
  • क्रॉल यांनी सांगितले, की मधमाश्यांतील जैविक घड्याळ अत्यंत कार्यक्षम असते. किडनाशकांच्या डोसचा दिवसाच्या एकूण कार्यपद्धतीवर संख्याशास्त्रीयदृष्ट्या फारसा परिणाम आढळला नसला तरी रात्रीच्या काळात मात्र गोंधळ उडाला. कीकार्डीयन क्लॉक बिघडून जात असल्याचे स्पष्ट झाले.
  • अधिक प्रयोग करताना, वसाहतीतील तापमान मोजण्यासाठी तापमापीची रचना केली. कारण, शरीराच्या साह्याने मधमाश्या वसाहतीचे तापमान योग्य पातळीवर ठेवतात. या क्रियेवर होणारा परिणाम मोजण्याचा प्रयत्न केला. ज्या वेळी तापमान कमी होते, त्या वेळी आपले पंख खाली करून, तेथील स्नायींचे घर्षण करून उष्णता तयार करतात. तापमान वाढल्यानंतर पंख्याच्या साह्याने हवा खेळती ठेवून तापमान योग्य पातळीवर ठेवले जाते. किडनाशकांचा डोस दिलेल्या मधमाश्यांच्या वसाहतीच्या तापमान स्थिर ठेवण्याची ही क्षमता कमी होत असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे वसाहतीचे मेणाच्या साह्याने रोधकता आणण्याची क्षमता कमी झाली.
टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा...पुणे : कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्राच्या पश्‍...
विविधरंगी फुले, फीलर्सला गणेशोत्सवात...फुलांना वर्षभर मागणी राहते. मात्र, वर्षांतील काही...
एकरी सात टन भाताचे विक्रमी उत्पादनरत्नागिरी जिल्ह्यातील रीळ येथील मिलिंद वैद्य...
लष्करी अळीमुळे येतेय दूध व्यवसायावर संकटनगर ः मक्यावर आलेल्या अमेरिकन लष्करी अळीच्या...
मराठवाडा वॉटर ग्रिडची अंमलबजावणी...परभणी: मराठवाडा वॉटर ग्रिडची अंमलबजावणी व्यापक...
शेतकऱ्यांमध्ये केलेल्या जनजागृतीतून...बुलडाणा  ः कृषी विभागाने लष्करी अळीच्या...
पिंपळगाव बसवंत बाजार समितीत होणार...नाशिक: बाजार समितीचे कार्यक्षेत्र निफाड...
लष्करी अळीची शेतकऱ्यांमध्ये धास्तीरुईखेड मायंबा, जि. बुलडाणा ः ‘‘अमेरिकन लष्करी...
फवारणी केलेला मका चाऱ्यात वापरू नका:...पुणे (प्रतिनिधी)ः  राज्यात सध्या मक्यावर...
लष्करी अळीमुळे डेअरी, पोल्ट्रीला १३००...पुणे : राज्यातील डेअरी व पोल्ट्री उद्योगासाठी...
बाजार समित्यांतील रोख व्यवहारांवरील...नवी दिल्ली ः रोखीच्या व्यवहारांवर नियंत्रण आणून...
अन्नद्रव्यांचा वापर हवा संतुलितचशेतकऱ्यांनी माती आणि पाणी परिक्षणाबरोबरच...
मराठवाडा वॉटर ग्रिडचा संशयकल्लोळ! चिमणीचा खोपा ते राजवाडा, असे निवाऱ्याचे अनेक...
‘एफएमओ’चा सह्याद्री फार्म्सला १२०...नाशिक : शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्वतःच्या...
लष्करी अळीच्या नुकसानीचे पंचनामे का...औरंगाबाद : ‘‘शेती तोट्यात गेली, गावचं अर्थकारण...
जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्गजायकवाडी, जि. औरंगाबाद : जायकवाडी धरणामधून...
थकबाकीदार सूतगिरणीच्या संचालकांवर राज्य...मुंबई: कोट्यवधींचे कर्ज थकवल्याप्रकरणी राज्य...
रेशीम विभागाचा सुधारित आकृतीबंध...जालना: झपाट्याने वाढत असलेल्या रेशीम उद्योग व...
अमेरिकन लष्करी अळीकडून ४० टक्के मका फस्तपुणे: राज्यात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचे...
लष्करी अळी आटोक्यात: कृषी विभागपुणे : राज्यात दोन लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्रातील...