agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, Previously grainy wheat genome comes into focus | Agrowon

गहू पिकाचे जनुकीय विश्लेषण, सुसंगत मांडणी पूर्ण

वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाने गहू पिकाचे संपूर्ण जनुकीय विश्लेषण केले असून, त्याची सुसंगतवार मांडणी केली आहे. यातून गहू पिकाच्या विविध रोग आणि तापमानासाठी प्रतिकारक जातींची विकास करणे सुलभ होणार आहे.

आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाने गहू पिकाचे संपूर्ण जनुकीय विश्लेषण केले असून, त्याची सुसंगतवार मांडणी केली आहे. यातून गहू पिकाच्या विविध रोग आणि तापमानासाठी प्रतिकारक जातींची विकास करणे सुलभ होणार आहे.

गहू हे पृथ्वीवरील विस्तृत प्रदेशामध्ये घेतले जाणारे पीक आहे. गहू पिकातून मांसाच्या तुलनेमध्ये अधिक प्रथिने पुरवली जातात. अगदी माणसाने वापरलेल्या एकूण कॅलरीचा पाचवा भाग हा गव्हातून येतो. गहू पिकाची जनुकीय संरचना हा मोठी आणि तुलनेने गुंतागुंतीची आहे. त्यात १६ अब्ज बेस जोड्या असून (त्यापासून डीएनए बनतात.) मानवी जिनोमपेक्षा पाचपटीने मोठी रचना आहे. परिणामी महत्त्वाचे खाद्यपीक असलेल्या गव्हाचे संपूर्ण विश्लेषण करणे ही प्रचंड मोठी कामगिरी असल्याचे जॉन इनस् सेंटर येथील प्रकल्प अधिकारी डॉ. क्रिस्टोबाल युयुवे यांनी सांगितले.

  • गहू हे दुष्काळ आणि पूर दोन्हीसाठी संवेदनशील आहे. प्रति वर्ष तांबेरा रोगाच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे मोठे नुकसान होते. तापमानातील बदलाचेही पिकाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहेत. या साऱ्या समस्यावर मात करीत अधिक उत्पादक्षम, उच्च पोषणमूल्ययुक्त जातींचा विकास करण्यासाठी हे संशोधन उपयोगी ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय व्हीट जिनोम सिक्वेन्सिंग कन्सॉर्टियम द्वारे हे संशोधन जर्नल सायन्स मध्ये प्रकाशित करण्यात आले. जगभरातील २० देशांतील ७३ संशोधन संस्थामधील २०० पेक्षा अधिक संशोधकाचा त्याला हातभार लागला.
  • यामध्ये २१ क्रोमोसोम्स, १०७८९१ जनुके आणि ४ दशलक्षपेक्षा अधिक मुलद्रव्यीय मार्कर यांची सुसंगती लावण्यात आली. वेगवेगळ्या जनुकांच्या कार्यावर प्रभाव टाकणाऱ्या किंवा नियंत्रित करणाऱ्या घटकांविषयी माहिती उपलब्ध होणार आहे.
  • यासोबत जॉन इनस् सेंटर मधील संशोधकांनी गव्हाची जनुके कशा प्रकारे विविध गुणधर्मांसाठी कारणीभूत ठरतात, याविषयी संशोधन प्रकाशित केले आहे. त्यामुळे विविध गुणधर्मयुक्त जातींचा विकास करणे सोपे होणार आहे. सध्या स्पीड ब्रिडींग या तंत्रज्ञानावर जॉन इनस् सेंटरमधील ग्लासहाऊसमध्ये काम सुरू असून, त्यामुळे पैदाशीची साखळी कमी करणे शक्य होईल.

इतर अॅग्रो विशेष
‘गोकूळ’चे दूध आता टेट्रापॅकमध्येही...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (...
खाद्यतेल आयातशुल्क कपातीने सोयाबीन,...पुणे: केंद्र सरकारने खाद्यतेल आयातशुल्कात कपात...
कांदा लिलाव अखेर सुरूनाशिक: जिल्हा उपनिबंधकांनी तातडीने लिलाव सुरू...
केंद्र सरकार खाद्यतेल आयात शुल्क...नवी दिल्ली ः देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाचे...
कांदा खरेदीनंतर अवधीच्या निर्णयात गोंधळ...नाशिक : बाजार समितीत कांदा खरेदी केल्यानंतर...
सांगली बाजार समितीत हळदीची उलाढाल २८०...सांगली ः कोरोना विषाणूमुळे बाजार समित्या बंद...
मोसंबी फळपिक विमा अर्जात गारपीटीचा कॉलम...पुणे ः आंबिया बहारातील मोसंबी, डाळिंब,...
पुरानं आमचं जगणंच खरवडून नेलंयसोलापूर ः नदीकाठी शेत असल्यानं दरवर्षी ऊस करतो,...
गुणवत्तापूर्ण सीताफळ उत्पादन हेच ध्येयबाजारपेठेचा अभ्यास आणि योग्य नियोजन केल्यास...
स्पॉन, अळिंबी उत्पादनाचा ‘कोल्हापूर...शिरटी (ता.शिरोळ,जि.कोल्हापूर) येथील उच्चशिक्षित...
धुके पडण्यास प्रारंभ...पुणे ः परतीचा मॉन्सून गेल्यानंतर राज्यातील...
मोह फुलांचा वाढेल गोडवाराज्यामध्ये ऐन नवरात्रीमध्ये मॉन्सून देवतेने...
देखो तो कहीं चुनाव है क्या?‘स रहद पर तनाव है क्या, देखो तो कहीं चुनाव है...
कांदा खरेदीनंतर व्यापाऱ्यांना मिळणार...नाशिक : बाजार समितीत कांदा खरेदी केल्यानंतर...
मराठवाड्यात साठ टक्के कपाशीवर गुलाबी...नांदेड : ‘‘मराठवाड्यात लवकर येणारे कापूस वाण...
कंपन्यांनी सर्वेक्षण न केल्यास विमा...पुणे: राज्यात विमा कंपन्यांनी पीक नुकसानीचे...
इथेनॉल दरात तीन रुपयांपर्यंत वाढकोल्हापूर : यंदाच्या हंगामात इथेनॉलनिर्मितीला गती...
एक लाख टन कांदा आयातीची शक्यतानवी दिल्ली ः देशातील कांदा दरवाढीवर नियंत्रण...
कापूस खरेदीसाठी तीस केंद्रे अंतिमनागपूर : गेल्या हंगामात नव्वद केंद्र आणि १५०...
फळ पीकविमा योजनेवर केळी उत्पादकांचा...जळगाव ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत केळी...