सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र विकसित

सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र विकसित
सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र विकसित

कोची येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन संस्थेने आॅरेंज स्पॉटेड ग्रुपर (हामूर) आणि पिंक इअर इंपिरर या मागणी असणाऱ्या माशांच्या बीजोत्पादनाचे तंत्र विकसित केले आहे. या अगोदर या संशोधन संस्थेने कोबिया आणि सिल्व्हर पोंपाना या माशांच्या बीजोत्पादनाचे तंत्र विकसित केले होते. आॅरेंज स्पॉटेड ग्रुपर आणि पिंक इअर इंपिरर या माशांना बाजारपेठेत चांगली मागणी असते. आॅरेंज स्पॉटेड ग्रुपर माशाच्या बीजोत्पादन आणि हॅचरी विकसित करण्याचे काम विशाखापट्ट्ण येथील प्रादेशिक संशोधन केंद्र तर पिंक इअर इंपिरर या माशाच्या बीजोत्पादनाचे तंत्र विझिजम येथील संशोधन केंद्राने केले आहे. जागतिक मासळी बाजारामध्ये आॅरेंज स्पॉटेड ग्रुपर (हॅमूर) या माशाला चांगली मागणी असते. गेल्या दोन वर्षांपासून संशोधन संस्थेतील तज्ज्ञ हॅचरीमध्ये बीजोत्पादन कसे यशस्वी करता येईल, याबाबत संशोधन करीत होते. सन २०१४ मध्ये बीजोत्पादनाचे तंत्र चांगल्या प्रकारे विकसित झाले; परंतु मत्यबीज जगण्याचे प्रमाण फार कमी होते. त्यामुळे तज्ज्ञांनी हॅचरीमधील पाणी व्यवस्थापन, माशांचे खाद्य व्यवस्थापनात सुधारणा करत चांगल्या क्षमतेचे मत्स्यबीज निर्मितीत यश मिळविले. चांगल्या गुणवत्तेचे हे मत्स्यबीज पुढील वाढीच्या टप्प्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण टाक्यांमध्ये ठेवले जाणार आहे. हॅचरी तंत्रज्ञान आणि पिंजरा पद्धतीने माशांच्या संगोपनाचे तंत्र मासेमारी करणाऱ्यांना येत्या काळात फायदेशीर ठरणार आहे. या दोन्ही माशांची प्रतिकारशक्ती चांगली आहे; तसेच या माशाचे वजनदेखील चांगले असते. वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळे या माशाला प्रामुख्याने जागतिक बाजारपेठेत चांगली मागणी आहे. चीन, सिंगापूर, मलेशिया या देशांत या माशांची चांगली बाजारपेठ विकसित झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com