agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, Robots will never replace teachers but can boost children's education | Agrowon

रोबोट्स निभावतील शिक्षक सहायकाची भूमिका
वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

लहान मुलांच्या शिक्षणपद्धतीमध्ये रोबोट हे पूर्णपणे शिक्षकांची जागा घेऊ शकणार नाहीत. मात्र, सहायक म्हणून अत्यंत मोलाची भूमिका ते नक्कीच निभाऊ शकतील, असे प्लायमाउथ विद्यापीठातील संशोधकांना आढळले आहे.

लहान मुलांच्या शिक्षणपद्धतीमध्ये रोबोट हे पूर्णपणे शिक्षकांची जागा घेऊ शकणार नाहीत. मात्र, सहायक म्हणून अत्यंत मोलाची भूमिका ते नक्कीच निभाऊ शकतील, असे प्लायमाउथ विद्यापीठातील संशोधकांना आढळले आहे.

प्लायमाउथ विद्यापीठातील रोबोटिक्सचे प्रा. टोनी बेल्पाईमे यांनी सांगितले, की अनेक वर्षांपासून वर्गासाठी खास रोबोट्स निर्मिती करण्याचा प्रयत्न संशोधक करत आहेत. केवळ तंत्रज्ञान आणि गणिताच्याच नव्हे, तर सामाजिक रोबोट्स निर्मितीकडेही कल आहे. फळा, खडू, कागदपासून संगणक, टॅबलेटपर्यंत पोचलेल्या शिक्षणव्यवस्थेमध्ये भविष्यात रोबोट्स दिसू लागतील. त्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या एकूण प्रगतीकडे लक्ष ठेवण्यासाठी वेळ मिळू शकेल.

  • सध्या झालेल्या अभ्यासामध्ये येल विद्यापीठ, त्सुकूबा विद्यापीठ येथील अभ्यासक्रमावर आधारित चाचण्या घेण्यात आल्या. त्यात आतापर्यंत प्रकाशित झालेल्या १०० पेक्षा अधिक अशा संशोधनाचा आढावा घेतला गेला.
  • मुलांमध्ये शब्द संख्या आणि मूळ अंक असे लहान धडे देण्यासाठी रोबोट्स उपयोगी आहेत. मात्र, बोलण्याची ओळख पटवणे आणि सामाजिक एकत्वाची भावना अशा काही तांत्रिक मर्यादांमुळे शिक्षकांना सहायक अशा स्वरूपामध्ये रोबोट्सची भूमिका मर्यादित राहते.
  • त्यात प्रामुख्याने लहान मुलांचे बोलणे ओळखणे ही तांत्रिक अडचण दिसून आली.
  • प्रत्यक्ष शाळांपर्यंत रोबोट्स पोचवण्यासारख्या अडचणी आहेत.
  • केवळ अडचणीच्या वेळी रोबोट्सची मदत घेण्याऐवजी प्रत्येक वेळी त्यावर अवलंबून राहण्याचे प्रमाण वाढते.

इतर बातम्या
संत नामदेव महाराजांच्या १७ व्या...पंढरपूर : पंढरपूर येथून आळंदीकडे निघालेल्या श्री...
'पणन'ची २७ पासून कापूस खरेदी नागपूर ः सिसिआयची खरेदी सुरूच असली तरी कापूस पणन...
शेतीला व्यावसायिक दर्जा आवश्यक: सुहास...पुणे: भावनिकतेच्या आधारे शेती न करता शेतकरी...
शिशुआहारातील शर्करेविषयी अधिक काळजी...माणसाच्या आरोग्याला हानिकारक खाद्यविषयक सवयी...
वऱ्हाडात जमिनीतील ओलीमुळे रब्बीची पेरणी...अकोला : मॉन्सूनोत्तर पावसाने मोठा...
'गडचिरोली जिल्ह्यात शासकीय धान खरेदी...गडचिरोली  ः आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने...
खानदेशात प्रकल्पांमधील साठा ७८ टक्‍क्‍...जळगाव  ः खानदेशात सर्वच भागांतील...
भामरागड तालुक्‍यातील पूरग्रस्त...गडचिरोली  ः उपविभागीय अधिकारी कार्यालय...
कापूस खरेदीसाठी आर्द्रतेची मर्यादा...वर्धा  ः संततधार पावसामुळे या वर्षी कापसात...
'शासकीय धान केंद्रावर जाचक अटींचे...भंडारा  ः शासकीय धान खरेदी केंद्रावर पाखड...
अमरावती विभागात विषबाधितांची संख्या...अमरावती ः राज्यात दोन वर्षांपूर्वी फवारणीदरम्यान...
देवळाली कॅम्प येथून ४८ हजार रुपयांच्या...नाशिक : नाशिक तालुक्यातील देवळाली कॅम्प येथील...
मराठवाड्यात मजूर मिळेना, वेचणीचे दर...औरंगाबाद : जोरदार पावसाने केलेल्या नुकसानीतून...
डाळिंब बागा वाचविण्यासाठी धडपडआटपाडी, जि. सांगली :  यंदा तालुक्यात रिमझिम...
सांगली जिल्ह्यात रब्बीतील पिकांची ६७...सांगली : ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत...
पुणे विभागात रब्बीसाठी अडीच लाख क्विंटल...पुणे  ः यंदा पाऊस उशिरा झाल्याने पुणे...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीवर अमेरिकन...परभणी : जिल्ह्यातील पेडगाव (ता. परभणी) येथील दोन...
सोलापूर जिल्ह्यात रब्बीची उरकली ३१...सोलापूर : खरिपामध्ये पावसाने हुलकावणी दिली. पण,...
सातारा जिल्ह्यात आले पिकावर ‘करपा’चा...सातारा  ः अतिपावसाचा फटका इतर पिकांप्रमाणे...
पावसामुळे स्ट्रॉबेरीचा हंगाम लांबणीवरपुणे : मॉन्सूनचा लांबलेला मुक्काम आणि...