स्थानिकीकरणातही मका टिकवून आहे काही मूळ गुणधर्म

स्थानिकीकरणातही मका टिकवून आहे काही मूळ गुणधर्म
स्थानिकीकरणातही मका टिकवून आहे काही मूळ गुणधर्म

जंगली मका प्रजातीपासून स्थानिकीकरण होण्याच्या प्रक्रियेमध्ये मका जातींमध्ये अनेक बदल झाले असले तरी काही महत्त्वाचे गुणधर्म अद्यापही जंगली वनस्पतीचेच असल्याचे आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाने केलेल्या अभ्यासामध्ये आढळले आहे. त्यातून सुमारे ६५०० वर्षांपूर्वी मूळ मेक्सिको (दक्षिण अमेरिका) येथून आलेल्या मका पिकामध्ये सुधारणा होत त्याचे स्थानिकीकरण कसे झाले, याविषयी माहिती उपलब्ध झाली आहे. मका पिकाचा इतिहास हा जंगली प्रजाती ‘टिओसिन्टे’पासून सुरू होतो. याची कणसे संख्येने कमी, आकाराने लहान आणि सहजतेने काढता येणार नाहीत, अशा आवरणामध्ये गुंडाळलेली असत. शेतकऱ्यांनी गुणधर्मानुसार निवड पद्धतीने हळूहळू सुधारणा करत हे जंगली पीक आजच्या स्थितीमध्ये आणले आहे. आता भरपूर कणसे, मोठा आकार, अधिक दाणे असे मका पिकाचे स्वरूप झाले आहे. अर्थात, ही प्रक्रिया अनेक ठिकाणी विभागून झालेली आहे. स्मिथसोनियन संस्थेतील संशोधकांनी उत्खननातून मिळालेल्या मका पिकांच्या पुरातन जातीसह अत्याधुनिक जनुकिय तंत्रज्ञानाद्वारे जंगली वनस्पती ते व्यावसायिक पीक या संपूर्ण प्रवासाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रक्रियेमध्ये कोणते गुणधर्म नव्याने जमा झाले, कोणते लुप्त झाले आणि कोणते अद्यापही पिकामध्ये आहेत, याविषयी माहिती मिळवण्यात आली. स्मिथसोनियन संस्थेतील संशोधकांसह चौदा अन्य आंतरराष्ट्रीय संस्थातील संशोधकांच्या सहकार्याने केलेल्या या बहुशाखीय अभ्यासाचे निष्कर्ष जर्नल सायन्समध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. स्मिथसोनियनच्या राष्ट्रीय नैसर्गिक इतिहास संग्रहालयाचे अभिरक्षक (क्युरेटर) लोगान किस्टलर यांनी सांगितले, की मानवी पर्यावरणाच्या अनुषंगाने एखाद्या वनस्पतींचे स्थानिकीकरण होऊन पिकामध्ये रूपांतर होण्याची उत्क्रांतीची प्रक्रिया समजून घेण्यात आली. अशा इतिहासाच्या अभ्यासातून भविष्यातील पीक मिळवण्यासाठी योग्य ती साधने मिळू शकतात. कृषी क्षेत्रासाठी जागेची मर्यादा निर्माण होत असतानाच वाढत्या मागणी आणि गरजाना सामोरे जावे लागणार आहे. - गेल्या काही वर्षांपासून जनुकीयतज्ज्ञ आणि उत्खननतज्ज्ञ दक्षिण मेक्सिको येथील टिओसिन्टे या ९००० वर्षांपूर्वीच्या जंगली प्रजातीपासून आतापर्यंत विकसित होत गेलेल्या मका पिकाचा अभ्यास करत आहे. या विभागामध्ये आजही जंगलामध्ये आढळणाऱ्या टिओसिन्टे या वनस्पती आणि मका पिकामध्ये अनेक जनुकीय समानता दिसून येतात. मेक्सिको व मध्य अमेरिकेच्या अन्य विभागांमध्ये तुलनेने ही समानता कमी आहे.

  • नैर्ऋत्य अॅमेझॉन आणि पेरूच्या किनाऱ्याकडील भागामध्ये प्राचीन काळातील गाळमातीमध्ये आढळलेले मक्याचे सूक्ष्म पराग आणि अन्य घटक सुमारे ६५०० वर्षांपूर्वीचे आहेत. येथे मक्याचे स्थानिकीकरण झाल्यानंतर त्याचे स्थलांतर लोकांबरोबर दक्षिण आणि अन्य अमेरिकेतील भागांमध्ये झाले असावे, या निष्कर्षापर्यंत संशोधक आले आहेत.
  • मेक्सिको येथे सापडलेल्या ५००० वर्षांपूर्वीच्या मक्याचे जनुकीय विश्लेषण केले असता, गुंतागुंत अधिक वाढली. त्यात टिओसिन्टे आणि स्थानिकीकरण झालेल्या मक्यांची जनुकांचे मिश्रण आढळले. कणसाभोवती पूर्वी असलेल्या कठीण आवरण उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये कमी झाले. त्याचे प्रत्यक्ष जनुकीय पुरावा आढळला नाही. तो मिळवण्यासाठी किस्टलर यांच्या गटाने आधुनिक मक्याच्या १०० पेक्षा जातींची जनुकीय तुलना केली. त्यात गेल्या ६० वर्षांमध्ये स्थानिक शेतकरी व गटांनी विकसित केलेल्या दक्षिण अमेरिकेतील पूर्व खोऱ्यातील ४० प्रजातींचा समावेश होता. या मका प्रजातींची जनुकीय संरचना नुकतीच मिळवण्यात आली आहे. या जनुकीय संरचनांमध्ये प्राचीन ११ प्रजातींचाही समावेश आहे.
  • संशोधनाचे महत्त्व ः

  • किस्टलर यांच्या मते, दक्षिण अमेरिकेमध्ये मक्याचे किमान दोन वेळी स्थानिकीकरण झाल्याचे दिसत आहे. ६५०० वर्षांपूर्वी अर्थवट स्थानिकीकरण जालेल्या पीक नैर्ऋत्य अॅमेझॉन प्रांतात आले. येथे पूर्वीपासून भात, शाबूकंद आणि अन्य पिकाची लागवड होत होती. त्यामुळे नवीन पीकही स्वीकारले गेले. त्यानंतर हजारो वर्षांच्या प्रयत्नानंतर त्याचे पूर्ण स्थानिकीकरण झाले. ही सर्व प्रक्रिया ४००० वर्षांपूर्वीपर्यंत सुरू होती. पुढे मका पिकाचा विस्तार पूर्वेकडे आणि अॅंडेस पर्वताच्या पायथ्याच्या भागामध्ये १००० वर्षाच्या सुमारास झाला. आता अॅटलांटिक किनाऱ्याच्या भागामध्ये बोलल्या जाणाऱ्या मॅक्रो जे भाषांमध्ये त्याचे पुरावे आढळतात. त्याकाळी मक्यासाठी अॅमेझोनिन शब्दांचा वापर होत असे.
  • कोणत्याही पिकाच्या एकूण इतिहासाचा मागोवा त्या पिकाच्या भविष्यातील विकासासाठी फायद्याचा ठरतो. भविष्यामध्ये अधिक गुणवत्ता असलेल्या, उत्पादनक्षम जातींच्या विकासाला याचा फायदा होणार आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com