सागरी मिडोव गवतामध्ये २२ टक्क्यांनी घट

सागरी मिडोव गवतामध्ये २२ टक्क्यांनी घट
सागरी मिडोव गवतामध्ये २२ टक्क्यांनी घट

सामान्यत बदलत्या वातावरणामुळे माणसे किंवा सजीव स्थलांतर करू शकतात. ती सोय वनस्पतींना नाही. गेल्या काही वर्षामध्ये बदलत्या वातावणाचा फटका गुयाम येथील समुद्री गवताला (मिडोव) बसत असल्याचे संशोधनामध्ये दिसून आले. अमेरिकन विद्यापीठातील पर्यावरण शास्त्र विभागाने केलेल्या विश्लेषणामध्ये मिडोव हे समुद्री गवत २२ टक्क्यांनी घटल्याचे दिसून आले आहे. हे संशोधन मरीन अॅंड फ्रेशवॉटर रिसर्चमध्ये प्रकाशित झाले आहे. अमेरिकन विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभागातील प्रा. किहो किम आणि त्यांचे विद्यार्थी कार्ले के. लारोचे यांनी मारियाना या बेटावरील मोठ्या संख्येने असलेल्या समुद्री गवताचा (शा. नाव - Enhalus acoroides ) अभ्यास केला. २००४ ते २०१५ या काळात या गवतांची संख्या २२ टक्क्याने कमी झाल्याचे आढळले आहे. ही गवते निसर्गासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. या गवतामध्ये सेंद्रिय कर्बाचा साठवणूक ( सुमारे १० टक्केपर्यंत) होते. यातील सेंद्रिय कर्बाचा फायदा सागराप्रमाणे किनाऱ्यावरील जमिनीलाही होतो. त्याचप्रमाणे मिडोव हे गवत सागरी पर्यावरणातील अन्नसाखळीमध्ये अनेक जलचरांचे खाद्य आहे. पॅसिफिकच्या पश्चिमेकडील उष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये या गवताची व्याप्ती व त्यांचा झालेला ऱ्हास यांचे प्रत्यक्ष नोंदी व उपग्रह यांच्या साह्याने मोजमाप करण्यात आले.

  • १८७९ ते २००६ या काळात जागतिक पातळीवर सागरी मिडोव यांचे प्रमाण ३० टक्क्यांनी घटले आहे.
  • अनेक संशोधनातून १९९० नंतर मिडोव गवत नष्ट होण्याचा वेग वाढला आहे. त्यामागे सागरी किनाऱ्यावरील विकास, विविधकामे आणि पाण्याचा दर्जा ढासळणे ही प्रमुख कारणे दिली जातात.
  • अमेरिकेतील ईशान्येचा भाग, मेक्सिकोच्या खाड्या अशा काही भागांच्या तुलनेमध्ये गुयाम येथील परिस्थिती चांगली होती. मात्र, सागरी किनाऱ्यांवर माणसांचा हस्तक्षेप वाढत चालला आहे.
  • हे गवत का महत्त्वाचे आहे? मिडोव गवत विविध जलचरांच्या खाद्य साखळीचा हिस्सा आहेत. कार्बनच्या साठवणीचे प्रमाणही अधिक असल्याने एकूण पर्यावरणामध्ये मोलाची भूमिका निभावतता. मध्ये असून, देशातील अनेक बेटांप्रमाणे गुयाम मध्येही सागरी पाण्यामध्ये प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. विशेषतः सांडपाणी व नत्र (नायट्रोजन) घटकांचे प्रदूषण वाढत आहे. सांडपाण्याचे निकष हे सरकारी नियम पाळले जात नसल्याचा फटका सागरी गवतांना बसत आहे.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com