ब्ल्यूबेरीच्या उत्पादन, दर्जासाठी जंगली माश्या महत्त्वाच्या

ब्ल्यूबेरीच्या उत्पादन, दर्जासाठी जंगली माश्या महत्त्वाच्या
ब्ल्यूबेरीच्या उत्पादन, दर्जासाठी जंगली माश्या महत्त्वाच्या

मधमाश्या किंवा जंगली माश्यांमुळे परागीकरण वाढून उत्पादनामध्ये वाढ होते, हे सर्वज्ञात आहे. मात्र, वर्मोंट विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासामध्ये जंगली माश्यांमुळे ब्ल्यूबेरी फळांच्या आकार आणि अन्य गुणधर्मांवरही चांगले परिणाम होत असल्याचे पुढे आले आहे. हे संशोधन जर्नल अॅग्रीकल्चर, इकोसिस्टिम्स अॅण्ड एन्व्हायर्नमेंटमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. मोठ्या आणि उत्तम दर्जाच्या ब्ल्यूबेरी उत्पादनासाठी जंगली माश्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे व्हर्मोंट विद्यापीठातील संशोधनामध्ये दिसून आले आहे. या अभ्यासातून प्रथमच जंगली माश्यांमुळे ब्ल्यूबेरीच्या केवळ उत्पादनामध्येच नव्हे, तर आकार आणि दर्जामध्ये वाढ होत असल्याची बाब पुढे आली आहे. जंगली माश्यांमुळे ब्ल्यूबेरीच्या आकारामध्ये १२ टक्क्याने, संख्येमध्ये १२ टक्क्याने, आकारातील नियमितता ११ टक्क्याने वाढ झाली. त्याचप्रमाणे बेरी फळांना दोन ते अडीच दिवसांनी लवकर पक्वता आल्याने काढणी लवकर झाली. व्हर्मोंट राज्यातील नऊ बेरी फार्मवर भेट देणाऱ्या जंगली माश्यांचे प्रमाण, उत्पादन आणि अन्य गुणधर्मामध्ये होत असलेल्या बदलाचा अभ्यास केला. त्यात एका मध्यम आकाराच्या बेरी फार्ममधून प्रतिवर्ष उत्पादन ३६ टक्के (किंवा अंदाजे १.३६ लाख डॉलर इतके उत्पन्न) वाढत असल्याचे आढळले आहे. अन्य शेतामध्ये जंगली माश्यांमुळे उत्पादनामध्ये सरासरीपेक्षा ६ टक्क्याने वाढ होत असल्याचे दिसून आले. आपल्या संशोधनाविषयी माहिती देताना संशोधक चार्ल्स निकोलसन यांनी सांगितले, की मधमाश्यांच्या परागीकरणाचे फायदे कृषिक्षेत्रातील दोन तृतीयांश पिकांमध्ये उदा. कॉफी, कोकोआ आणि अन्य फळे व भाज्यामध्ये दिसून येतात. माश्यांचे प्रमाण कमी असल्यास त्यांच्या पेट्या भाड्याने आपल्या शेतामध्ये ठेवाव्या लागतात. जंगली माश्यांमुळे मधमाश्यांइतकाच फायदा शेती उत्पादनामध्ये दर वर्षी होत असतो. विशेष म्हणजे त्यासाठी कोणताही खर्च येत नाही. असे झाले प्रयोग

  • मधमाश्या व्हर्मोंट भागातील ब्ल्यूबेरी फारशा येत नाही. त्यामुळे येथील ग्रीन माउंटन भागामध्ये जंगली माश्यांसाठी वेगळे क्षेत्र तयार करणे सोपे झाले. त्याविषयी माहिती देताना संचालक टेलर रिकेट्स म्हणाले, की बहुतांश क्षेत्रामध्ये मधमाश्यांची संख्या मोठी असल्याने जंगली माश्यांचे शेतीतील नेमके योगदान मिळवण्यामध्ये अडचणी येतात.
  • संशोधकांच्या गटाने ९ प्रक्षेत्रामध्ये हात आणि इलेक्ट्रीक टूथब्रशच्या साह्याने ब्ल्यूबेरीचे परागीकरण केले. त्यानंतर लहान ब्रशच्या साह्याने रंगवलेले पराग ५ हजार फुलांवर सोडण्यात आले. या फुलातून मिळालेल्या उत्पादनाची तुलना नैसर्गिक परागीकरणाशी करण्यात आली. नैसर्गिक परागीकरणामध्ये जंगली माश्यांचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे जंगली माश्यांचे नेमके योगदान मिळवणे शक्य झाले.
  • जंगली माश्यांचे शेतीसाठी महत्त्व ः

  • जागतिक कृषिक्षेत्रामध्ये जंगली माश्यांचे महत्त्व अधोरेखित करताना रिकेट्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अमेरिकेतील जंगली मधमाश्यांच्या माहितीवरून नकाशा तयार केला आहे. त्यातून २००८ ते २०१३ या काळात विशेषतः अमेरिकी कृषिप्रक्षेत्रातील जंगली माश्यांचे प्रमाण २३ टक्क्याने घटल्याचे दिसून आले.
  • रिकेट्स यांच्या दुसऱ्या एका अभ्यासातून, हवामानातील बदलामुळे लॅटिन अमेरिकेतील कॉफी उत्पादनाच्या क्षेत्रामध्येही घट झाल्याचे स्पष्ट झाले. त्यावर अवलंबून मधमाश्यांच्या संख्येतही घट झाली.
  • ब्ल्यूबेरीच्या परागीकरणामध्ये मधमाश्यांपेक्षाही बंबल बी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कारण बंबल बी माश्यांनी विशिष्ट पद्धतीने थरथरणाऱ्या ब्ल्यूबेरीची फुलांचे परागीकरण करू शकतात.
  • छोटे परिणामकारक उपाय

  • शेती परिसरामध्ये माश्यांच्या नैसर्गिक रहिवासाचे योग्य प्रमाण ठेवल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. परिसरामध्ये जंगली फुलांचे प्रमाण अधिक ठेवावे लागते.
  • तसेच, मधमाश्यांच्या सुरक्षित रहिवासासाठी पक्षी घरट्याप्रमाणे बॉक्सेस ठेवल्यास फायदा होतो.
  • या क्षेत्रामध्ये कीटकनाशकांचा वापर कमीत कमी केला पाहिजे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com