क्षारयुक्त जमिनीच्या सुधारणेत गवतवर्गीय पिके महत्त्वाची

क्षारयुक्त जमिनीच्या सुधारणेमध्ये गवतवर्गीय पिके महत्त्वाची
क्षारयुक्त जमिनीच्या सुधारणेमध्ये गवतवर्गीय पिके महत्त्वाची

अनेक शेतामध्ये पुरस्थितीमुळे पाणी शिरते किंवा काही जमिनीमध्ये जलधारणक्षमता कमी असल्यामुळे किंवा पोषक घटक उपलब्ध नाहीत किंवा अतिरिक्त क्षार आहेत, या कारणांमुळे अशा जमिनीमध्ये पिकांचे उत्पादन घेण्यामध्ये अडचणी येतात. अशा शेतांमध्ये गवतवर्गीय जैवइंधन पिकांचे उत्पादन घेतल्यास अधिक फायदेशीर राहू शकेल, असे मत ‘जिओलॉजिकल सोसायटी ऑफ अमेरिका’च्या वार्षिक बैठकीमध्ये मांडण्यात आलेल्या संशोधनात व्यक्त केले आहे. २०११ पासून अॅरगॉन राष्ट्रीय प्रयोगशाळेतील संशोधक श्रब विलो आणि स्विचग्रास या गवतवर्गीय वनस्पतींवर संशोधन करत आहेत. वालुकामय जमिनीमध्ये त्यांच्या वाढीच्या प्रयोगामध्ये मातीची केवळ धूपच थांबत नाही, तर मातीतील अतिरिक्त क्षारयुक्त घटक ही पिके शोषून घेत असल्याचे दिसून आले आहे. अतिरिक्त क्षारामुळे खराब झालेल्या जमिनीमध्येही यांची वाढ बऱ्यापैकी होते. पावसाच्या वाहत्या पाण्यासोबत हे क्षार भूजलामध्ये किंवा पाण्याच्या स्रोतामध्ये प्रदूषणाचे कारण ठरतात. मेक्सिकोच्या खाडीमध्ये पाण्यामध्ये प्रदूषण होऊन मोठ्या प्रमाणात शेवाळ वाढल्यामुळे विषारी डेड झोन तयार झालेले आहेत. अशा डेड झोनमध्ये ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे जलचर राहू शकत नाहीत. लेमॉँट (इल्लिनॉइज) येथील अॅरगॉन राष्ट्रीय प्रयोगशाळेतील संशोधक जॉन क्विन यांनी सांगितले, की पाण्याचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने आम्ही झुडूप विलो आणि गवतांवर लक्ष केंद्रित केले होते. मात्र, अभ्यासाअंती आम्हाला या पिकांमध्ये अनेक संभाव्य क्षमता दिसून आल्या. त्यात प्रामुख्याने जैवइंधनासाठी बायोमास, परागीभवन करणाऱ्या कीटकांसाठी, अन्य वन्यजीवांसाठी योग्य रहिवास यांचा समावेश होतो. प्रयोग

  • मध्य पूर्व इल्लिनॉइज येथील ६.५ हेक्टर प्रक्षेत्रावर क्रिस्टिना नेग्री यांच्या नेतृत्त्वाखाली अभ्यास करण्यात आला. हा भाग सामान्यतः कमी उत्पादकता, नायट्रेटचे उच्च प्रमाण, सातत्याने होणारी धूप यासाठी ओळखली जाते.
  • या जमिनीमध्ये श्रब विलो या गवताची लागवड जैवइंधन पीक म्हणून करण्यात आली. त्याचे माती, त्यातील ओलावा, भूजल आणि एकूण अन्य वनस्पतींवर होणारा परिणाम तपासण्यात आला. त्याचप्रमाणे मका आणि सोयाबीन पिकामध्ये वापरण्यात आलेल्या खतांचा कशाप्रकारे ऱ्हास होतो, याचीही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.
  • २०१३ मध्ये लावलेल्या विलो गवतामुळे येथील भूजलातील नायट्रेट क्षारांची तीव्रता अन्य मका पिकांच्या शेताच्या तुलनेमध्ये लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे दिसले.
  • त्याचप्रमाणे त्यातून उत्सर्जित होणाऱ्या हरितगृह वायू, कीटकांची विविध आणि एकूण हिरवळीवर चांगले परिणाम झाल्याचे दिसून आले.
  • जमिनीच्या व्यवस्थापनातून पाण्याचा दर्जा सुधारण्याविषयीच्या या प्रकल्पासाठी अमेरिकी ऊर्जा, जैवऊर्जा विभागामार्फत अर्थसाह्य करण्यात आले आहे.
  • गवतवर्गीय पिकांचे फायदे ः गवतवर्गीय पिकांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची खोलवर जाणारी मुळे. ती मका पिकामध्ये अतिरिक्त होणाऱ्या नायट्रेट खतामध्येही तग धरू शकतात. त्यामुळे जैवइंधन पीक म्हणून त्यांची उपयुक्तता मोठी आहे. या पिकांच्या लागवडीचा खर्च अत्यंत कमी असून, जमिनीतील क्षारांचे अतिरिक्त प्रमाण कमी करणे आणि त्यातून उपलब्ध होणाऱ्या बायोमासमधून जैवइंधनाची निर्मिती शक्य आहे. त्याचप्रमाणे मका पिकांमध्ये वाढताना ते मका पिकाची स्पर्धा करत नाही. त्यामुळे शेतीखालील कोणतीही जमीन कमी न करता या पिकांखालील क्षेत्र वाढवता येते. त्याच प्रमाणे ज्या जमिनीमध्ये सामान्य पिकांचे उत्पादन घेण्यात अडचणी येतात, तिथे ही पिके चांगल्या प्रकारे वाढू शकतात. तुमची खते वाया जाऊ देत नाही. पाण्याचे प्रदूषण रोखण्यामध्ये मदत करतात, असेही अनेक फायदे असल्याचे संशोधक नेग्री यांनी सांगितले.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com