agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, USDA Scientist Receives the Borlaug Field Award | Agrowon

मानाचा बोरलॉग फिल्ड पुरस्कार मॅथ्यू रौज यांना जाहीर
वृत्तसेवा
सोमवार, 3 सप्टेंबर 2018

अमेरिकन कृषी विभागातील शास्त्रज्ञ मॅथ्यू रौज यांना ‘दी वर्ल्ड फूड फाउंडेशन’चा २०१८ या वर्षाचा ‘नॉर्मन बोरलॉग अॅवॉर्ड फॉर फिल्ड रिसर्च अॅण्ड अॅप्लिकेशन’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा मानाचा पुरस्कार मिळवणारे रौज हे सातवे शास्त्रज्ञ असून, त्यांनी गहू पिकातील तांबेरा रोगप्रतिकारक जातींचा शोध घेण्यामध्ये मोलाची भूमिका निभावली आहे.

अमेरिकन कृषी विभागातील शास्त्रज्ञ मॅथ्यू रौज यांना ‘दी वर्ल्ड फूड फाउंडेशन’चा २०१८ या वर्षाचा ‘नॉर्मन बोरलॉग अॅवॉर्ड फॉर फिल्ड रिसर्च अॅण्ड अॅप्लिकेशन’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा मानाचा पुरस्कार मिळवणारे रौज हे सातवे शास्त्रज्ञ असून, त्यांनी गहू पिकातील तांबेरा रोगप्रतिकारक जातींचा शोध घेण्यामध्ये मोलाची भूमिका निभावली आहे.

बोरलॉग फिल्ड पुरस्कार शास्त्र विषयातील मानवी विकासामध्ये विशेषतः खाद्याचा दर्जा, उत्पादन किंवा उपलब्धता यामध्ये केलेल्या सुधारणेतील अद्वितीय कामगिरीबद्दल ४० वर्षापेक्षा कमी वयाच्या शास्त्रज्ञांना दिला जातो. १९७० चे नोबेल शांतता पुरस्काराचे विजेते नॉर्मन बोरलॉग यांनी सूचवल्याप्रमाणे जागतिक पातळीवर भूक आणि गरिबीच्या निर्मूलनामध्ये कार्यरत शास्त्रज्ञाला हा पुरस्कार दिला जातो.

रौज यांच्या संशोधन कार्याविषयी

  • मॅथ्यू रौज हे अमेरिकी कृषी संशोधन सेवेमध्ये वनस्पती विकृती तज्ज्ञ आहेत. त्यांनी गहू पिकाच्या सुधारणेसंदर्भात विशेषतः गहू पिकाचे तांबेरा रोगापासून संरक्षण करण्यासाठी संशोधन केले आहे. त्यांनी गहू पिकावरील तांबेरा रोगासाठी प्रतिकारक जातींच्या विकासामध्ये महत्त्वाचे कार्य केले आहे. त्यांच्या प्रयत्नातून युजी ९९ च्या तीव्र परिणामांवर मात करणे शक्य झाले.
  • एआरएसच्या केनिया आणि इथोपिया येथील वसंत गहू रोपवाटिका प्रकल्पाचे समन्वयक म्हणून काम करताना रौज यांनी युजी ९९ ला प्रतिकारक गहू जाती ओळखल्या. या प्रतिकारक जातींची पैदास करून, मिन्निसोटा विद्यापीठाच्या माध्यमातून लिंकेर्ट ही प्रतिकारक जात प्रसारीत केली.
  • नवीन तांबेरा रोगाच्या उद्रेकाला त्वरीत प्रतिसाद देण्यासाठी कार्यरत आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटामध्ये रौज यांनी काम केले आहे. या कामादरम्यान त्यांनी किंगबर्ड (इथोपिया) आणि एनएआरसी २०११ (पाकिस्तान) या तांबेरा रोगप्रतिकारक जाती ओळखल्या.
  • रौज हे सेंट पॉल (मिन्निसोटा) येथील एआरएसच्या तृणधान्य रोग प्रयोगशाळेमध्ये गेल्या दहा वर्षापासून कार्यरत आहेत. त्या माध्यमातून जागतिक गहू सुधारणा आणि रोगापासून संरक्षणासाठी विविध प्रकल्पांमध्येही त्यांचे योगदान आहे.

इतर अॅग्रो विशेष
अनुदान नव्हे; योगदानच वाचवेल शेतीलावातावरण बदल आणि कोसळणाऱ्या पाऊस धारा अथवा कडक...
साखर निर्यातीची सुवर्णसंधीपावसाळी स्थितीमुळे निर्यात न होऊ शकलेल्या साखर...
कापूस लोकायची लाज राखते; पण आमचं काय? यवतमाळ : ‘‘आमच्या कापसापासून तयार कपड्यानं आमी...
कंपोस्ट खते बनविण्याच्या पद्धतीजमिनीचा कस टिकविण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा...
एकदम बाजार समित्या बरखास्त करू नका:...पुणे ः केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बाजार समित्या...
पावसाने मोसंबीच्या उत्पादनातही संकटाची...औरंगाबाद : लिंबूवर्गीय फळपिकात 'राजा' पीक म्हणून...
आंतरराष्ट्रीय द्राक्ष चर्चासत्र आजपासूनपुणे: राष्ट्रीय द्राक्ष संशोधन (एनआरसीजी)...
राज्यात पीकहानी ७० लाख हेक्टरच्याही...पुणे : केंद्र शासनाला पाठविल्या जाणाऱ्या अहवालात...
राज्यात गारठा वाढला; नगर १२.१ अंशावरपुणे : किमान तापमानात घट होत असल्याने राज्यात...
साखर कारखान्यांसाठी कर्ज परतफेडीचा...नवी दिल्ली ः केंद्र सरकारने साखर कारखान्यांसाठी...
दोडका पिकाने उंचावले अर्थकारणधामणखेल (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील चंद्रकांत...
पेरू विक्रीसाठी प्रसिद्ध पेरणे फाटापुणे जिल्ह्यातील हवेली आणि शिरूर तालुक्यांच्या...
जळगावचे उडीद मार्केट यंदा पोचले...उडीद उत्पादनात खानदेश अग्रेसर आहे. जळगावच्या...
पर्यायाविना निर्णय घातकच! ऑ नलाइन राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) अधिक...
नैसर्गिक आपत्तीपासूनचा धडा काही वेदनांमधून सुखद आनंदप्राप्ती होते, तर काही...
किमान तापमानात किंचित वाढपुणे  : राज्यात थंडीची चाहूल लागल्यानंतर...
बाजार समित्यांना सक्षम पर्याय द्याः...पुणे ः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी...
पावसाने संत्र्यात ४० टक्के फळगळ; ४००...नागपूर : राज्याचे मुख्य फळपिकांत महत्त्वाचे स्थान...
हमीभावाने कापूस खरेदी २० नोव्हेंबरपासून...जळगाव : भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) व...
बारा लाख टन साखर निर्यातीचा मार्ग मोकळापुणे : केंद्र शासनाने मुदतवाढ दिल्यामुळे देशातील...