खनिज तेल उत्पादनासाठी पाणी खराब करण्याच्या प्रमाणात वाढ

खनिज तेल उत्पादनासाठी पाणी खराब करण्याच्या प्रमाणात वाढ
खनिज तेल उत्पादनासाठी पाणी खराब करण्याच्या प्रमाणात वाढ

अमेरिकेतील नैसर्गिक वायू आणि तेल उत्पादक भागांमध्ये २०११ ते २०१६ या काळामध्ये तेलविहिरीमध्ये फ्रॅक्चरिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण ७७० टक्क्यांपर्यंत असल्याचे ड्यूक विद्यापीठातील संशोधकांना आढळले आहे. नवीन विहिरींच्या निर्मितीसाठी पहिल्या वर्षी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण १४४० टक्क्यांनी वाढल्याचेही या अभ्यासात स्पष्ट झाले आहे. या पद्धतीने फ्रॅकिंग पाण्याच्या प्रमाणामध्ये वाढ होत राहिल्यास सन २०३० पर्यंत वॉटर फूटप्रिंटमध्ये ५० पटीने वाढ होऊ शकते. या सर्व प्रक्रियांचा विपरीत परिणाम दुष्काळग्रस्त पश्चिमेकडील राज्यांतील भूजलावर होऊ शकतो. जमिनीमध्ये तेल काढण्यासाठी कातळ फोडण्यासाठी प्रचंड दाबाने पाणी सोडले जाते. त्याला ‘हायड्रॉलिक फ्रॅक्चरिंग’ असे म्हणतात. आजवरच्या अभ्यासामध्ये यासाठी लागणारे पाणी हे अन्य ऊर्जास्रोतांच्या तुलनेत अधिक नसल्याचे सुचवले जात होते. मात्र, हे सारे अभ्यास गेल्या काही वर्षांतील फ्रॅकिंगच्या एकूण माहितीवर आधारलेले आहेत. ड्यूक विद्यापीठातील भूरसायनशास्त्र आणि जलदर्जा विभागातील प्रा. अॅवनेर वेन्गोष यांनी सांगितले की, या अभ्यासात दशकापेक्षा अधिक काळातील फ्रॅकिंगच्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून त्याचे वॉटर फूटप्रिंट वाढत गेल्याचे स्पष्ट झाले. पाणीवापराबाबत २०१४ आणि २०१५ ही वर्षे महत्त्वाची ठरतात. येथूनच पुढे पाण्याच्या वापराचा दर लक्षणीयरीत्या वाढत गेला. प्रतिविहीर खराब होणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढत चालले आहेत. गेल्या सहा वर्षांतील पाणीवापर, नैसर्गिक वायू, तेल आणि उद्योगाद्वारे खराब करण्यात आलेले पाणी या विषयीची माहितीचे विश्लेषण केले. अमेरिकेतील शेल वायू आणि तेल उत्पादक प्रदेशातील १२ हजारपेक्षा अधिक विहिरींचा त्यात समावेश होता. त्यावरून पूर्वीचे, सध्याचे आणि भविष्यातील पाण्याचा वापर काढण्यात आला. या संशोधनाचे निष्कर्ष ‘सायन्स अॅडव्हान्सेस’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com