मलेरियाचे परजीवी मानवी प्रतिकारक पेशींपेक्षा अधिक वेगवान

मलेरियाचे परजीवी मानवी प्रतिकारक पेशींपेक्षा अधिक वेगवान
मलेरियाचे परजीवी मानवी प्रतिकारक पेशींपेक्षा अधिक वेगवान

मलेरिया रोगकारक परजीवी प्लाजमोडियममध्ये वेगळ्या असलेल्या मूलभूत कायटोस्केलेटन प्रोटीनमुळे मानवी त्वचेतील प्रतिकारक पेशींपेक्षा दहा पट अधिक वेगवान असल्याचे हेडलबर्ग इन्स्टिट्यूट फॉर थेओरेटिकल स्टडिजमध्ये झालेल्या संशोधनामध्ये आढळले आहे. परिणामी, प्रतिकारक पेशी परजीवीला रोखण्यामध्ये कमी पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आजवर मलेरियाला रोखण्यामध्ये प्रतिकारक पेशी दहा पटीने कमी पडत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामागील नेमक्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न हेडलबर्ग इन्स्टिट्यूट फॉर थेओरेटिकल स्टडिजमधील संशोधक रॉस डग्लस आणि सहकाऱ्यांनी केला आहे. त्यामध्ये सस्तन प्राण्याच्या पेशी आणि परजीवी यांची जडणघडण वेगळ्याप्रकारे झाली असून, त्यामध्ये एक प्रथिन महत्त्वाची भूमिका निभावत असल्याचे दिसून आले. या संशोधनाचा फायदा उपचार प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी होणार आहे. हे ‘संशोधन जर्नल प्लॉसवन बायोलॉजी’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. मलेरियाचा परजीवी वेगाने कशा हालचाली करतो? प्रोटीन्सची लांब साखळी एकमेकांशी जोडलेली असून, त्यातून एक्टिनची लांब दोराप्रमाणे रचना तयार होते, त्याला `फिलामेंट्स` असे म्हणतात. हे फिलामेंट्स स्नायूंच्या पेशी अधिक चांगल्याप्रकारे कार्यरत राहण्यासाठी मदत करतात. त्याविषयी माहिती देताना डॉ. रॉस डग्लस यांनी सांगितले, की सर्वांत वेगवान असलेल्या प्रतिकारक पेशींच्या तुलनेत मलेरियाचा परजीवी दहापट अधिक वेगवान आहे. सस्तन प्राण्यातील परजीवीना रोखणे होईल शक्य

  • सस्तन प्राणी आणि परजीवी यातील अॅक्टीन प्रथिनामध्ये काही भागात बदल आहेत. संशोधकांनी प्रयोगशाळेमध्ये प्रथिनांच्या संबंधित भागामध्ये सस्तन प्राण्याच्या पेशीतील संबंधित घटकांचा वापर करून पाहिला. तेव्हा परजीवीला तग धरणे शक्य झाले नसल्याचे रॉस यांनी सांगितले. त्यानंतर अधिक अभ्यासासाठी विविध प्राण्यांतील परजीवीच्या हालचालींचा प्रयोगशाळेत, संगणकीय पद्धतीचा अवलंब करण्यात आला.
  • या संशोधनातून पुढे आलेल्या अॅक्टीन प्रोटीन्सला लक्ष्य करणाऱ्या रासायनिक संयुगांचा शोध घेता येईल. त्यातून हे फिलामेंट निर्मितीची प्रक्रिया रोखणे किंवा तोडून टाकणे शक्य होईल. त्यामुळे शरीरातील प्रतिकारक पेशींच्या हल्ल्यामध्ये परजीवी तग धरू शकणार नाहीत.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com