agricultural stories in Marathi, agrowon, bambu crop has its an economic value | Agrowon

बांबू पिकाला आहे व्यावसायिक मूल्य...

हेमंत बेडेकर
रविवार, 21 एप्रिल 2019

बांबू हा पर्यावरणरक्षक आहे. याचबरोबरीने बांबू उद्योगात असंख्य लोकांना रोजगार देण्याची क्षमता आहे. बांबूचे आजच्या घडीला ज्ञात असलेले किमान १५०० मुख्य उपयोग आहेत. बांबू उत्पादक देशांपैकी भारतात याचे क्षेत्र सर्वांत जास्त असले तरी, उत्पन्नात मात्र चीन आघाडीवर आहे.

बांबू हा पर्यावरणरक्षक आहे. याचबरोबरीने बांबू उद्योगात असंख्य लोकांना रोजगार देण्याची क्षमता आहे. बांबूचे आजच्या घडीला ज्ञात असलेले किमान १५०० मुख्य उपयोग आहेत. बांबू उत्पादक देशांपैकी भारतात याचे क्षेत्र सर्वांत जास्त असले तरी, उत्पन्नात मात्र चीन आघाडीवर आहे.

बांबू एक बहुवार्षिक आणि बहुपयोगी गवत आहे. सर्व सरकारी परवानग्यांच्या कचाट्यातून मुक्त झालेले बांबू एक औद्योगिक पीक म्हणून पुढे येत आहे. भारतात जम्मू-काश्मीर वगळता हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि राजस्थान, कच्छच्या रणापासून ते ईशान्येकडील राज्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. या सर्व प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या एकपाद ते छद्मपाद अशा विविध रूपांत बांबू लागवड दिसते. कधी उंचच उंच पण अतिशय कमी जाडीचा, कधी भरपूर जाडी आणि चांगली उंची असणारा, तर कधी अतिशय बुटका; कधी दरवर्षी फुलावर येणारा पण तरीही बहुवार्षिक तर कधी ३० ते १०० वर्षांनी फुलणारा आणि बी धरताच आपले आयुष्य संपवणारा अशी बांबूची विविधता आहे. आजही आपल्याकडे ग्रामीण भागात परंपरागत घरांच्या बांधणीसाठी बांबूचा वापर केला जातो. बांबू उत्पादक देशांपैकी भारतात याचे क्षेत्र सर्वांत जास्त असले तरी, उत्पन्नात मात्र चीन आघाडीवर आहे.

बांबू हे व्यापारी पीक असल्याने त्यापासून बनवलेल्या वस्तूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली मागणी असते. बांबू हा जगभरातील अविकसित, अर्धविकसित व विकसित देशांतील जनतेचा जीवनाधार आहे. बांबू हा पर्यावरणरक्षक तर आहेच, याचबरोबरीने बांबू उद्योगात असंख्य लोकांना रोजगार देण्याची क्षमता आहे. बांबूचे आजच्या घडीला ज्ञात असलेले किमान १५०० मुख्य उपयोग आहेत. पडवीच्या आधारापासून ते कागदनिर्मितीपर्यंत सर्व उद्योग येतात. त्यातील ज्यांना आंतरराष्ट्रीय मानके प्राप्त आहेत, असे काही प्रकार हे औद्योगिक वस्तू म्हणून विचारात घेतले जातात. यात नुकताच तोडलेला बांबू व प्रक्रिया केलेला बांबू, पट्ट्याकाढून विणकाम केलेल्या टोपल्या, चटई, बांबूचे पडदे, विविध उपयोगासाठीच्या ताटल्या, झोपड्यांसाठी तट्ट्या, बांबूचे तयार बोर्ड अशा या वस्तू आहेत. त्याचबरोबर प्रक्रिया केलेला कोळसा, जळणासाठी केलेला कांडी कोळसा, थंड प्रदेशात वापरली जाणारी फरशी (flooring tiles), बांबूच्या तुळ्या व त्यापासून बनविलेल्या असंख्य वस्तू, प्लायवूड, कागदासाठी लगदा व कागद, इंधनात मिसळण्यासाठीचे अल्कोहोल, उदबत्तीच्या काड्या, बांबूचे कोंब अशा अनेक वस्तूंचा समावेश होतो. यातील एकेका वस्तूचा आंतरराष्ट्रीय व्यापार हा काही कोटींचा आहे.

पर्यावरणाला फायदेशीर ः

व्यावसायिक मुल्यांच्या बरोबरीने बांबूचे पर्यावरणीय महत्त्वही तेवढेच आहे. कर्बवायू शोषून मुक्तपणे प्राणवायू हवेत सोडणारा, जमिनीतून वाहणाऱ्या पाण्यातील गढूळपणा आपल्या मुळांमध्ये अडकवून शुद्ध करणारा बांबू पर्यावरण संवर्धनासाठी फायदेशीर आहे. अनेक वृक्षांपेक्षाही अधिक जैवभार देणारा, जमिनीची धूप थांबवणारा, याचबरोबर लाकडाला उत्तम पर्याय आहे.

बांबूचा आंतरराष्ट्रीय व्यापार
(रक्कम ः हजार अमेरिकी डॉलर्समध्ये)

देश निर्यात व्यापार क्रमवारी आयात व्यापार क्रमवारी
चीन १,२३,७५९९ २७,२४६
इंडोनेशिया १७,५६६० १६६८ ३९
फिलिपाइन्स ८५६६० ३३४४ ३०
नायजेरिया ९८१९ ३१९ ७९
भारत २१५७ १६ २४८९३ १०
एकूण व्यापार १,५६,२४४४   १४४,८९३  

माहिती स्रोत ः इनबार,२०१२(INBAR)

एक दृष्टिक्षेप ः

१) बांबू हे बहुवार्षिक झाडासारखे उंच वाढणारे गवत जगातील उष्ण व समशीतोष्ण प्रदेशात आढळते.
२) चीनपेक्षा जास्त बांबू लागवडीखाली क्षेत्र असणारा भारत मात्र जागतिक व्यापारात खालच्या क्रमांकावर.
३) जगातील बांबू उत्पादक देशात भारताचा दुसरा क्रमांक.
४) दक्षिण पूर्व आशियाई प्रदेश, दक्षिण अमेरिकेतील देश, आफ्रिका खंड, चीन, जपान या देशांमध्ये बांबूची चांगली लागवड.
५) बांबूला जरी गरिबांचे सोने म्हणत असले तरी भारतात हे पीक दुर्लक्षित राहिले. चीन व इतर बांबू पिकवणाऱ्या देशांनी याचा व्यापारी पीक म्हणून वापर करून आधुनिक तंत्रज्ञान वापरून अर्थव्यवस्थेत मानाचे स्थान मिळवून दिले.
६) आज जगातील बांबूचा व्यापार सुमारे २०० कोटी डॉलर एवढा आहे. त्यातील ६५ टक्के वाटा एकट्या चीनचा (११२ कोटी डॉलर) आहे. त्याखालोखाल इंडोनेशिया, व्हिएतनाम, फिलिपिन्स आणि ब्रह्मदेश. भारत सोळाव्या स्थानावर (वाटा २१६ लाख डॉलर). या सर्व देशांचा देशांतर्गत बांबू वापरही लक्षणीय आहे. आपण मात्र आपल्याला लागणाऱ्या बांबूपैकी निम्मासुधा उत्पादित करीत नाही.

संपर्क ः हेमंत बेडेकर, ९७६७२००९०५
(लेखक बांबू लागवड विषयातील अभ्यासक आहेत.)


इतर वन शेती
बहुगुणी कडुनिंबविविध प्रकारचे त्वचारोग जसे की, त्वचेवर खाज, पुरळ...
जाणून घ्या बहुगुणी पळसाबद्दल..!शास्त्रीय नावः ब्युटीया मोनोस्पर्मा वनस्पतीचे...
पारंपरिक बांबू लागवडीचे व्यवस्थापनसहाव्या वर्षानंतर दरवर्षी बांबू बेटातून सरासरी १०...
वनाधिकार कायद्याआधारे ग्रामसभांचे शाश्‍...‘खोज’ संस्थेच्या मार्गदर्शनात अमरावती जिल्ह्यातील...
वनशेतीसाठी मोह लागवड उपयुक्तजंगलामध्ये पानझडी वृक्षवर्गातील मोह हे एक...
कन्या वन समृद्धी योजनाशेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली, तर तिच्या...
बांबू विकासासाठी धोरणात्मक निर्णयांची...‘राष्ट्रीय बांबू अभियान’नुसार सुचविलेल्या सुधारित...
तंत्र शेवगा लागवडीचेमहाराष्ट्रातील सुमारे ८४ टक्के क्षेत्र कोरडवाहू...
उभारूयात बांबू प्रक्रिया उद्योगलेखमालेतील मागील काही भागांत आपण बांबूची व्यापारी...
गावामध्ये उभारा बांबू आधारित उद्योगआपण बांबूचा औद्योगिक पीक म्हणून विचार केला नाही...
बांबू उद्योग वाढीसाठी हवेत सातत्यपूर्ण...भारताचा जम्मू काश्मीर भाग वगळता सर्व प्रांतात...
बांबू पिकाला आहे व्यावसायिक मूल्य...बांबू हा पर्यावरणरक्षक आहे. याचबरोबरीने बांबू...
बांबू लागवड, व्यवस्थापनातील शंका समाधानबांबू लागवड करताना आपला विभाग, हवामानानुसार जाती...
वाढवूया बांबूचे उत्पादनजगाच्या बाजारात टिकण्यासाठी बांबूची एकरी...
बांबू लागवडीचा ताळेबंदसर्वसामान्य हवामानात एक बांबू दुसऱ्या वर्षापासून...
योग्य पद्धतीनेच करा बांबू तोडणीपरिपक्व बांबू हा दरवर्षी तोडला पाहिजे, तरच त्याला...
अशी करा तयारी बांबू लागवडीची...आपण बांबू लागवड कशासाठी करत आहोत हे निश्चित करावे...
बांबू व्यापाराला चांगली संधीयेत्या काळात राज्यातील बांबूचा व्यापार वाढवायचा...
जमीन, हवामानानुसार बांबू जातीची निवड...वनामधील बांबूची प्रत चांगली नसते आणि वनातला बांबू...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...