केळी पिकाची लागवड, अन्नद्रव्य व्यवस्थापन

केळी पिकाची लागवड, अन्नद्रव्य व्यवस्थापन
केळी पिकाची लागवड, अन्नद्रव्य व्यवस्थापन

केळी पिकाची लागवड योग्य अंतरावर करून शिफारशीप्रमाणे अन्नद्रव्यांचे नियोजन करावे. भरपूर सेंद्रिय खतांचा वापर केल्यास उत्पादन व दर्जामध्ये वाढ होते. केळी हे महत्त्वाचे नगदी पीक मानले जाते. खोल काळी जमीन आणि सिंचनासाठी पाणी असल्यास या पिकातून चांगले उत्पादन मिळू शकते. जमीन : मध्यम ते भारी, भरपूर सेंद्रिय खते असणारी जमीन उपयुक्त ठरते. जमिनीची खोली साधारण ६० ते ९० सेंमीपेक्षा जास्त असावी. सामू उदासीन असावा. केळी लागवडीचा हंगाम- मृग हंगाम व सप्टेंबर- ऑक्टोबर लागवड (कांदे बहार) १) लागवडीसाठी कंदाची निवड - जातिवंत व रोगमुक्त बागेतून केळीचे कंद निवडावेत. कंद साधारण ७५० ग्रॅम वजनाचा व तलवारीच्या प्रकाराचा असावा. कंदावर तीन ते चार रिंगा असाव्यात. कंद तीन ते चार महिने वयाची असावेत. कंदप्रक्रिया - लागवडीपूर्वी कंद इमिडाक्लोप्रीड (१७.८ एस.एल.) ०.५ मि.लि अधिक मॅन्कोझेब ३ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या द्रावणामध्ये १० ते १५ मिनिटे बुडवून घ्यावी. २) ऊतिसंवर्धित रोपे - रोपे एकसारख्या उंचीची, रोगमुक्त असावीत. उंची सुमारे १ ते दीड फूट आणि पानांची संख्या सहापर्यंत असावीत. लागवड पद्धती ः केळी लागवड करण्यासाठी जातीनुसार १.२५ बाय १.२५ किंवा १.५ बाय १.५ मीटर अंतर ठेवावे. तसेच, केळी लागवड करण्यासाठी चौरस पद्धतीचा अवलंब करावा. अन्नद्रव्य व्यवस्थापन -

  • केळीसाठी शिफारशीप्रमाणेच खते द्यावीत. केळी लागवड करताना प्रतिझाड पूर्ण कुजलेले शेणखत ३० किलो किंवा ५ किलो गांडूळ खत द्यावे.
  • केळी लागवडीवेळा प्रतिझाड २५ ग्रॅम अॅझोस्पिरीलिअम आणि २५ ग्रॅम पीएसबी द्यावे.  रासायनिक खतांचे नियोजन
  • केळीसाठी खते देताना बांगडी पद्धतीचा अवलंब करावा. खताचा कार्यक्षमतेने उपयोग होण्यासाठी मातीमध्ये चर करून खते दिल्यानंतर खते त्वरित मातीआड करावीत.
  • साधारणपणे खते देण्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे असावे.
    खत देण्याची वेळ युरिया (ग्रॅम एसएसपी (ग्रॅम) एमओपी (ग्रॅम)
    लागवडीपासून महिन्याच्या आत ८० ते ८५ ३५० ते ४०० ८० ते ८५
    पहिल्या डोसनंतर दीड महिन्याने ८० ते ८५ 00 00
    दुसऱ्या डोसनंतर दीड महिन्याने ८० ते ८५ 00 00
    तिसऱ्या डोसनंतर दीड महिन्याने ८० ते ८५ 00 ८० ते ८५
    चौथ्या डोसनंतर दीड महिन्याने ३० ते ३५ 00 00
    पाचव्या डोसनंतर दीड महिन्याने ३० ते३५ ग्रॅम 00 ८० ते ८५
    सहाव्या डोसनंतर दीड महिन्याने ३० ते ३५ ग्रॅम 00 ८० ते ८५
    एकूण मात्रा ४१० ते ४५० ३५० ते ४०० ३२० ते ३४०
  • (टीप - उपरोक्त तक्त्यातील खत मात्रेमध्ये माती परीक्षणानुसार योग्य ते बदल करून घेणे अपेक्षित आहे. ) सूक्ष्म अन्नद्रव्ये वापर

  • केळी लागवडीनंतर दुसऱ्या व चौथ्या महिन्यामध्ये फेरस सल्फेट आणि झिंक सल्फेट ०.५ टक्के द्रावणाची (५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) याप्रमाणे फवारणी करावी.
  • पाचव्या व सातव्या महिन्यात जमिनीतून झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेट प्रत्येकी १५ ग्रॅम या प्रमाणात १०० ते १५० ग्रॅम शेणखतात मिसळून द्यावे.
  • जर, ठिबक सिंचनातून खतांचा वापर करणार असल्यास शिफारशीच्या ७५ टक्के (म्हणजेच १५०ः६०ः१५० नत्रःस्फुरदःपालाश) मात्रा द्यावी.
  • डॉ. पी. ए. साबळे, ८४०८०३५७७२ (लेखक डॉ. साबळे हे सरदार कृषीनगर दांतीवाडा कृषी विद्यापीठ, गुजरात येथे उद्यानविद्या विभागात सहायक प्राध्यापक असून, सुषमा सोनपुरे या महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कृषी विद्या विभागातून आचार्य पदवी घेत आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com