agricultural stories in Marathi, agrowon, coconut processing ia important | Agrowon

प्रक्रिया उद्योगात नारळाला मागणी
डॉ. दिलीप नागवेकर
रविवार, 2 सप्टेंबर 2018

नारळाचा प्रत्येक भागाचा उपयोग प्रक्रिया उद्योगासाठी अत्यंत उपयुक्त आहे. प्रक्रियेसाठी तंत्रज्ञान आणि काही प्रमाणात अनुदान नारळ विकास मंडळाकडे उपलब्ध आहे. वाढती मागणी लक्षात घेता सहकारी तत्त्वावर किंवा गावपातळीवर नारळ प्रक्रिया उद्योग यशस्वी ठरू शकतो.

नारळाचा प्रत्येक भागाचा उपयोग प्रक्रिया उद्योगासाठी अत्यंत उपयुक्त आहे. प्रक्रियेसाठी तंत्रज्ञान आणि काही प्रमाणात अनुदान नारळ विकास मंडळाकडे उपलब्ध आहे. वाढती मागणी लक्षात घेता सहकारी तत्त्वावर किंवा गावपातळीवर नारळ प्रक्रिया उद्योग यशस्वी ठरू शकतो.

नारळ हा आरोग्यदायी अन्न तसेच पेय पुरविण्याबरोबरच निवारा, संपत्ती आणि सौंदर्य देणारा वृक्ष आहे. याच्या प्रत्येक भागाचा उपयोग खाद्य पदार्थ तसेच प्रक्रिया उद्योगात केला जातो. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्याची आर्थिक प्रगती ही नारळ प्रक्रिया उद्योग आणि पर्यटनातूनच होत आहे. त्यासाठी नारळ उत्पादन वाढविण्यावर या राज्यातील बागायतदारांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. कोकणात देखील प्रक्रिया आणि पर्यटन उद्योग वाढविण्यासाठी नारळ लागवड, योग्य व्यवस्थापन आणि प्रक्रिया उद्योगावर भर दिला पाहिजे. कोकणात नारळाखालील क्षेत्र हे विखुरलेल्या स्वरुपात असल्याने सहकारी तत्त्वावर किंवा गावपातळीवर लघू उद्योग यशस्वी ठरू शकतात. त्याचबरोबर एकात्मिक कारखानदारीचा विचार करण्याची गरज आहे.

पूरक उद्योगांना संधी
१) अखंड नारळ खरेदी करून त्याच्या प्रत्येक भागाचा उपयोग करून स्वतंत्र उद्योग उभारणे शक्य आहे. नारळाचा प्रत्येक भागाचा उपयोग विविध उत्पादने तयार करण्यासाठी होऊ शकतो. यासाठी तंत्रज्ञान आणि काही प्रमाणात अनुदान नारळ विकास मंडळाकडे उपलब्ध आहे.
२) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये सन २००७ मध्ये भारतातील पहिले नारळ प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले.
३) नारळ विकास मंडळामार्फत महाराष्ट्रासाठीचे कार्यालय ठाणे येथे सुरू करण्यात आले आहे. त्याचा लाभ नारळ बागायतदारांनी घेतला पाहिजे.

प्रक्रिया उद्योगांना संधी
काथ्या उद्योग :

  • अखंड नारळ सोलल्यानंतर सोडणे उपलब्ध होतात. या सोडणापासून काथ्या काढला जातो. त्यापासून अनेक वस्तू तयार केल्या जातात. त्यापैकी सुंभ, दोरखंड, पायपुसण्याला चांगली मागणी आहे.
  • सोडण भुसा (क्वायर पीथ) ७० टक्के उपलब्ध होतो. याचा उपयोग जमिनीची प्रत सुधारणे, मुळे फुटण्यासाठी माध्यम आणि आच्छादनासाठी होतो. त्याचबरोबर उत्तम प्रकारचे सेंद्रिय खत तयार करता येते. त्याच्यामध्ये त्याच्या वजनाच्या दहा पट पाणी धरून ठेवण्याची क्षमता असल्याने त्याचा वापर पाणी कमतरता असलेल्या विभागात पिकासाठी चांगला होतो.

नारळ पाण्यापासून व्हिनेगर :
पक्व नारळ सोलून फोडल्यानंतर त्यांच्या मधून जे पाणी उपलब्ध होते त्यापासून व्हिनेगर तयार करता येते.
नारळ पाण्यापासून नाता-डी-कोको, सॉस, सरबत निर्मितीला वाव आहे.

खोबरे :
सुके खोबरे, खोबरेल तेल, नारळ खोबरे दूध, शुध्द खोबरेल तेल (व्हर्जिन कोकोनट ऑईल), नारळ खोबरे मलई, दूध पावडर, नारळ चीप्स्, खोबरे पीठ या पदार्थांना प्रक्रिया उद्योगात चांगली मागणी आहे.

करवंटी :
करवंटीपासून कोळसा तयार करतात. त्यापासून ॲक्टिव्हेटेड कार्बन तयार करता येतो. याचा उपयोग वनस्पती तेल शुद्ध करणे, पाण्याचे शुद्धीकरण, द्रावकाचा उतारा, सोन्याचा उतारा, विषारी वायूपासून संरक्षणासाठी वापरण्यात येणारा गॅस मास्कमध्ये केला जातो.
परदेशात करवंटी कोळश्याला चांगली मागणी आहे.

शहाळे विक्री :

  • पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील बागायतदार शहाळ्याची विक्री करतात. बागायदार व्यापाऱ्यांना वार्षिक कराराने नारळाची झाडे देतात. त्यामुळे पाडप ते विक्रीचे नियोजन व्यापारी पहातात. त्यामुळे शहाळे विक्री हा चांगला व्यवसाय आहे. पालघरमध्ये सहकारी संस्थामार्फत शहाळयाची विक्री होते. तेथेही शहाळे पाडप ते विक्री संस्थेमार्फत केली जाते.
  • कोकणात पर्यटकांची संख्या वाढत असल्याने शहाळयाचा तुटवडा भासत असून शहाळी वेळप्रसंगी कर्नाटकातून आणावी लागतात. सध्या शहाळी काढणारे लोक उपलब्ध नसल्याने बागायतदारांच्यासमोर मजुरांची अडचण आहे.

नारळ करवंटी, काथ्यापासून शोभेच्या वस्तू :
करवंटी तसेच काथ्यापासून विविध शोभेच्या वस्तू तयार केल्या जातात. याला देश-परदेशात चांगली मागणी आहे.

संपर्क ः डॉ. दिलीप नागवेकर, ९४२११३७७६९
(लेखक प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, जि. रत्नागिरी येथे कार्यरत होते. )

इतर कृषी प्रक्रिया
केळीच्या जैवविविधतेत तमिळनाडूची श्रीमंतीऑगस्ट महिन्यात तमिळनाडू राज्याची राजधानी चेन्नई...
उसापासून साखर निर्मितीची प्रक्रिया जागतिक पातळीवर साखर उद्योग उत्तम विकसित झाला असून...
करटोलीपासून प्रक्रिया पदार्थ करटोली ही रानभाजी असून, त्याच्या विशिष्ट चवीसाठी...
कापूस पऱ्हाट्यांपासून ब्रिकेट, पेलेट...पांढरे सोने या नावाने ओळखले जाणारे कापूस पीक...
मिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...
जांभळापासून बनवा जॅम, जेली, टॉफी,पावडरजॅम     परिपक्व जांभळाची फळे निवडून...
नाचणी प्राक्रियेत संधीनाचणी हे पीक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत...
व्हॅनिलामुळे दूध लागते अधिक गोडगोड दुधामध्ये व्हॅनिला स्वादाचा अंतर्भाव केला...
आरोग्यवर्धक पौष्टिक राजगिराधान्यांच्या तुलनेत राजगिऱ्यामध्ये कॅल्शिअम हे...
औषधी अन् आरोग्यदायी करवंदकरवंदामध्ये नैसर्गिकरीत्या कॅल्शिअम भरपूर...
बेल फळापासून बनवा जॅम, कॅन्डी, स्क्वॅशबेलाचे फळ अतिशय गुणकारी आहे. बेलफळांचा वापर...
आरोग्यास उपयुक्त कुळीथआयुर्वेदशास्त्राने कुळथास आजारी व्यक्‍तींसाठी...
आरोग्यदायी शेवगा भुकटीचे उपयोगशेवगा वनस्पतीचे इंग्रजी नाव ड्रमस्टिक असे असून,...
केळीपासून बनवा जेली, प्युरी, ज्यूस केळीमध्ये अनेक पोषणमूल्ये आहेत. केळी शरीरातील...
उभारणी दूधप्रक्रिया उद्योगाचीप्रक्रिया प्रकल्पामध्ये दूध संकलन, गुणवत्ता...
प्रक्रियेसाठी भाताचा कोंडाभात कोंड्यामधील पोषक घटकांचे सक्रिय स्वरूप...
उभारूयात बांबू प्रक्रिया उद्योगलेखमालेतील मागील काही भागांत आपण बांबूची व्यापारी...
प्रक्रिया उद्योगात मक्याला मागणी मक्याचा औद्योगिक प्रक्रियेमध्ये वापर वाढतो आहे....
AGROWON_AWARDS : ज्वारी उत्पादनांची...अॅग्रोवन स्मार्ट कृषी उद्योजक पुरस्कार...
प्रक्रिया, औषधीनिर्मितीमध्ये जांभळाला...जांभूळ हा मधुमेहावरील नैसर्गिक उपाय आहे. त्याच्या...