agricultural stories in Marathi, agrowon, control of thrips on onion | Page 2 ||| Agrowon

कांदा पिकावरील फुलकिडीचे नियंत्रण

डॉ. डी. आर. कदम, व्ही. जी. सवडे
रविवार, 9 डिसेंबर 2018

कांदा पीक हे प्रामुख्याने खरीप, रब्बी हंगामात घेतले जाते. त्याच्या उत्तम वाढीसाठी १० ते २५ अंश सेल्सिअस तापमान आणि ७० ते ८० टक्के आर्द्रता पोषक असते. मात्र, दमट आणि ढगाळ हवामानामध्ये त्यावर प्रामुख्याने फुलकिडे, खोड कुरतडणारी अळी, वाळवी आणि हुमणी यांचा प्रादुर्भाव आढळतो. त्यात फुलकिड्याचा (थ्रिप्स) चा प्रादुर्भाव राज्यातील बहुतांश भागात आढळून येत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी वेळीच प्रयत्न करणे आवश्यक आहे.

कांदा पीक हे प्रामुख्याने खरीप, रब्बी हंगामात घेतले जाते. त्याच्या उत्तम वाढीसाठी १० ते २५ अंश सेल्सिअस तापमान आणि ७० ते ८० टक्के आर्द्रता पोषक असते. मात्र, दमट आणि ढगाळ हवामानामध्ये त्यावर प्रामुख्याने फुलकिडे, खोड कुरतडणारी अळी, वाळवी आणि हुमणी यांचा प्रादुर्भाव आढळतो. त्यात फुलकिड्याचा (थ्रिप्स) चा प्रादुर्भाव राज्यातील बहुतांश भागात आढळून येत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी वेळीच प्रयत्न करणे आवश्यक आहे.

 • प्रामुख्याने रब्बी हंगामात फुलकिडे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. कोरडी हवा आणि पंचवीस ते तीस अंश सेल्सिअस तापमानात ही कीड झपाट्याने वाढते.
 •  आकाराने अत्यंत लहान. पूर्ण वाढ झालेल्या फुलकिडीचा आकार सुमारे १ मिलीमीटरपर्यंत असतो.
 •  रंग पिवळसर तपकिरी असून, शरीरावर फुलीच्या आकाराचे गर्द चट्टे असतात.
 •  मादी पानावर पांढऱ्या रंगाची ५० ते ६० अंडी घालते. त्यामधून चार ते सात दिवसांत पिले बाहेर पडतात. पिल्लांचा जगण्याचा कालावधी साधारणपणे सहा ते सात दिवसांचा असतो. डिसेंबर महिन्यात २३ दिवसांपर्यंत असू शकतो.
 •  पिले आणि प्रौढ रात्रीच्या वेळी पाने खरडून पानातून येणारा रस शोषतात. परिणामी पानांवर पांढुरके ठिपके दिसतात, त्यालाच शेतकरी ‘टाक्या’ म्हणून ओळखतात. नंतर पाने वाकडी होऊन वाळतात.
 •  पिकाच्या सर्वच अवस्थेत किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. रोपावस्थेत फुलकिडी तीव्र प्रादुर्भाव झाल्यास पाने वाळून कांदे पोसत नाहीत. पानावर झालेल्या जखमांमधून काळा करपा, जांभळा करपा अशा बुरशीचा पानात सहज शिरकाव होतो.  
 •  कोरडी हवा आणि २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमानात फुलकिडे वेगाने वाढतात. रब्बी हंगामात कांदा पिकावर प्रादुर्भावाचे प्रमाण अधिक राहून, पिकाचे ३० ते ४० टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान होऊ शकते.

नियंत्रण उपाययोजना

 • कांदा पिकाची तृणधान्य किंवा गळीत पिकासोबत फेरपालट करावी.
 • लावणीपूर्वी पंधरा दिवस अगोदर शेताच्या कडेने मक्याच्या दोन ओळी लावाव्यात, त्यामुळे फुलकिडीचा उपद्रव कमी होतो.
 • लागवड करतेवेळी रोपांची मुळे कार्बोसल्फान २ मिली प्रतिलिटर पाणी या द्रावणात २ तास बुडवून लागवड करावी.

किडींचा प्रादुर्भाव दिसू लागताच,

 •  सुरवातीच्या काळात पाच टक्के निंबोळी अर्क किंवा कडूनिंब आधारित कीटकनाशक ॲझाडिरेक्टिन (३०० पीपीएम) ५ मि.लि. प्रतिलिटर या प्रमाणात फवारणी करावी.
 •  लागवडीनंतर ३० दिवसांनी ६५ ते ७० टक्के आर्द्रता असताना, व्हर्टिसिलियम लेकॅनी ५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणे ८ ते १० दिवसांच्या अंतराने एक ते दोन फवारण्या कराव्यात.

तीव्र प्रादुर्भाव असल्यास, रासायनिक नियंत्रण (फवारणी प्रतिलिटर पाणी)
फिप्रोनिल (५ एस. सी.) २ मिली किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ ई.सी.) १ मिली.
टीप ः फवारणी करतेवेळी प्रतिलिटर १ मिली उत्तम दर्जाच्या चिकटद्रव्य कीटकनाशकासोबत मिसळावे.  

 ः  डॉ. डी. आर. कदम, ९४२१६२१९१०    
  ः व्ही. जी. सवडे, ९६७३११३३८३

(लेखक डॉ. कदम हे कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, येथे सहयोगी प्राध्यापक असून, श्री. सवडे हे आचार्य पदवीचे विद्यार्थी आहेत.)


इतर नगदी पिके
ऊस पीक सल्ला१) साधारणपणे १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत...
गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी ...सध्या कापूस पीक हे फुलोरा ते बोंडे लागण्याच्या...
कपाशीतील बोंड सडणे विकृतीचे व्यवस्थापनमागील दोन वर्षांपासून राज्यातील विदर्भ, मराठवाडा...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
नारळ बागेत मसाला पिकांची लागवड    नारळ बागेमध्ये नारळाच्या...
गुलाबी बोंड अळीला रोखण्यासाठी एकात्मिक...गुलाबी बोंड अळ्यांना खाण्यासाठी व पतंगाना अंडी...
आडसाली उसासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य...
ऊस बियाणे निर्मितीसाठी ‘सुपरकेन नर्सरी...अलीकडे प्रो ट्रे किंवा पिशव्यांमध्ये उसाची रोपे...
दुष्काळाशी लढा देत हळदीची उत्कृष्ट शेतीअमळनेर (जि. जळगाव) येथील अश्पाक मुनीर पिंजारी व...
डाळिंब बागेतील मर रोगाचे नियंत्रणडाळिंब लागवड शक्यतो गादी वाफ्यावर करावी, त्यामुळे...
खरीप कांदा लागवड तंत्रज्ञानविशेषतः विदर्भात रब्बी हंगामातील कांद्याचे...
खरीप नियोजन : कपाशीतील असमतोल वाढ,...गेल्या काही वर्षांमध्ये कपाशी लागवड समस्यांत वाढ...
ऊसवाढीच्या टप्‍प्यानुसार द्या पुरेसे...जमिनीच्या प्रकारानुसार योग्य ठिबक सिंचन पद्धतीची...
ऊस पीक व्यवस्थापन सध्याच्या काळात जमिनीतील ओलावा टिकवणे, पाण्याचा...
दर्जेदार कृषी उत्पादनासाठी...आपण शेती उत्पादनामध्ये बऱ्यापैकी स्वयंपूर्ण झालो...
उसावरील लोकरी माव्याचे एकात्मिक नियंत्रणजुलै २००२ मध्ये सांगली जिल्ह्यात उसावर सर्वप्रथम...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
थंडी, धुक्यांमुळे कांदा पिकावरीस...सध्या थंडीचा कडाका चांगलाच वाढलेला असून, धुकेही...
कांदा पिकावरील किडीचे नियंत्रणसध्या थंडीचा कडाका चांगलाच वाढलेला आहे. या काळात...