agricultural stories in Marathi, agrowon, Crop Advice | Agrowon

कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू, नारळ, सुपारी, वेलवर्गीय भाज्या

कृषी विद्या विभाग, दापोली
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

भात

भात

  • पावसाचे प्रमाण कमी असल्याने भातखाचरांमध्य पाण्याची पातळी योग्य ठेवावी. त्यासाठी योग्य ती बांधबंदिस्ती करून घ्यावी. कमी पावसाच्या स्थितीत भातपिकावर निळ्या भुंगेऱ्याचा प्रादुर्भाव अनेक ठिकाणी दिसत आहे. असा प्रादुर्भाव दिसून येताच, त्यांच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रतिलिटर पाणी
  •  क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) ४ मिलि किंवा लॅंबडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के) अर्धा मिलि
  •  हेक्टरी पाचशे लिटर द्रावणांची फवारणी करावी.
  • भातपिकामध्ये सुरळीतील अळीचाही प्रादुर्भाव आढळून येत आहे. असा प्रादुर्भाव आढळल्यास, नियंत्रणासाठी शेतामध्ये पाणीपातळी ठेवून, एक जड दोर आडवा फिरवत न्यावा. त्यामुळे सुरळ्या पाण्यात पडतात. एक-दोन तासानंतर शेतातील पाणी एका बाजूने काढून द्यावे. त्या कोपऱ्यात गोळा झालेल्या सुरळ्या गोळा करून योग्य पद्धतीने नष्ट कराव्यात.  पिकाच्या लागवडीला एक महिना झाला असल्यास, नत्राचा दुसरा हप्ता हेक्टरी ४० किलो याप्रमाणे देऊन घ्यावा.

नागली
सध्या बऱ्याच ठिकाणी रोपवाटिका तयार असून, पुनर्लागवडीचा कालावधी आहे. पुनर्लागवडीसाठी ३० दिवसांची रोपे वापरावीत. रोपांची लागवड २० बाय १५ सेंमी अंतरावर ठोंबा पद्धतीने उथळ आणि उभी लावावीत. ठोंबे उताराच्या आडव्या दिशेने करावेत. लागवड करताना हेक्टरी ४० किलो नत्र, ४० किलो स्फुरद अशी मात्रा ठोंबाच्या मध्ये द्यावीत.  

आंबा
१० वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाच्या हापूस आंबा झाडांना आकारमानानुसार पॅक्लोब्युट्राझॉल द्यावे. त्यासाठी प्रत्येक झाडाला पूर्व-पश्चिम आणि दक्षिण उत्तर व्यास मोजून त्याची सरासरी काढावी. प्रतिमीटर सरासरी व्यासासाठी पॅक्लोब्युट्राझोल ३ मिली या प्रमाणे द्यावे. पॅक्लोब्युट्राझोलची प्रत्येक झाडासाठी आवश्यक मात्रा तीन ते पाच लिटर पाण्यात मिसळून १० ते १२ सें.मी. खोल असे सम अंतरावर २५ ते ३० खड्डे करून त्यात वरील द्रावण सम प्रमाणात ओतावे. नंतर खड्डे मातीने बुजवून टाकावे. पावसाची तीव्रता अधिक असेलल्या दिवसात  पॅक्लोब्युट्राझोल देऊ नये.

काजू
काजूच्या ४ वर्षांवरील झाडांना प्रत्येक ४ घमेले शेणखत किंवा हिरवळीचे खत, २ किलो युरीया, १.५ सिंगल सुपर फॉस्फेट आणि ५०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश ही खते झाडाच्या विस्ताराच्या थोडी आत बांगडी पद्धतीने चर खोदून द्यावीत.

नारळ आणि सुपारी

  • बागेमधील अतिरिक्त पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी चर खोदून घ्यावेत.
  • तीन वर्षांवरील प्रत्येक सुपारीच्या झाडास १ घमेले शेणखत किंवा कंपोस्ट खत, १२ किलो हिरवळीचे खत, १६० ग्रॅम युरिया, ५०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, १२५ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश असा खताचा पहिला हप्ता द्यावा.
  • नारळावर गेंडा भुंगा व सोंड्या भुंगा या किडींच्या प्रादुर्भावाकडे लक्ष द्यावे. गेंडा भुंग्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक म्हणून शेतातील शेणखताच्या खड्ड्यामध्ये दर दोन महिन्यांना शिफारशीत कीडनाशकाची फवारणी करून घ्यावी.

वेलवर्गीय भाज्या

  • वेलवर्गीय भाज्यांना काठीचा आधार द्यावा. भाजीपाला क्षेत्रातील तणांची काढणी करून पीक स्वच्छ ठेवावे. प्रतिगुंठा क्षेत्रासाठी ७२० ते ८५० युरिया खताचा एक तृतीयांश हप्ता द्यावा. मंडपाची व्यवस्था करावी.
  • वेलवर्गीय भाजीपाला पिकांवर फळमाशींचा प्रादुर्भाव होतो. त्याच्या नियंत्रणासाठी रक्षक सापळे हेक्टरी ४ या प्रमाणात लावावेत.
  • हवामान अंदाजानुसार पावसाचे प्रमाण कमी असल्याने आंबा, काजू व अन्य रोपवाटिकांना सिंचनाची व्यवस्था करावी.

टीप ः पावसाची तीव्रता कमी असताना खते द्यावीत.

संपर्क ः ०२३५८ - २८२३८७
(कृषी विद्याविभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)


इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करु...सोलापूर : ‘‘अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतपिकांचे...
खानदेशात पावसाने दाणादाण सुरूचजळगाव ः खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात मध्यम...
जिगाव प्रकल्पग्रस्तांना मिळणार योग्य...बुलडाणा ः जिगाव प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला...
सोलापुरात नुकसानग्रस्तांसाठी `रयत’चे...सोलापूर : सोलापूरसह संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे...
साताऱ्यात रब्बीची १२ टक्के क्षेत्रावर...सातारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने झोडपल्याने...
एफआरपी एकरकमी देणार की तुकडे होणार?सातारा : यावर्षीच्या ऊस हंगामासाठी एक ते दोन...
कृषी योजनांच्या अंमलबजावणीत अकोला अव्वलअकोला ः जिल्ह्यात कृषी विभागामार्फत राबविलेल्या...
पीक नुकसानीची मदत निश्‍चित मिळेल ः मलिकपरभणी : ‘‘हवामान विभागाने रविवार (ता.२५)...
रयत क्रांती संघटनेतर्फे जागरण गोंधळ...पुणे ः  रयत क्रांती संघटनेतर्फे...
इथेनॉल पूर्णत्वासाठी ‘कादवा’ला सहकार्य...नाशिक : ‘‘अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उत्तम...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पुन्हा मुसळधार...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यात अनेक दिवसांची...
नाथाभाऊ काय चीज आहे, दाखवून देऊ : शरद...मुंबई: नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने...
शेतकऱ्यांना मदत करण्याचीच भूमिका : शहालातूर : ‘‘कृषी उत्पन्न बाजार समितीने अडचणीच्या...
धान्य खरेदीसाठी नोंदणीचे निर्देशच नाहीत जळगाव ः जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून शासकीय धान्य...
मदतीच्या घोषणेचे स्वागत, पण तोकडीः डॉ....नगर ः राज्यात अतिवृष्टीने नुकसानग्रस्त...
जलसंधारणाच्या `बुलडाणा पॅटर्न`चा डंकाअकोला ः महामार्ग तयार करताना त्यासाठी लागणारे...
सोयाबीनचे मूल्यवर्धित पदार्थसोयाबीनपासून सोया-दूध, सोया पनीर, पीठ आणि...
परभणीत रताळी १३५० रूपये प्रतिक्विंटलपरभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
कापूस उत्पादकांचे शोषण थांबवा: विजय...नागपूर: देशात कापसाचे दर कमी होत असतानाच...
फवारणीनंतर १८ एकरातील कपाशीने टाकल्या...अकोला ः जिल्ह्यातील म्हातोडी येथील शेतकऱ्याने...