agricultural stories in Marathi, agrowon, crop advice (Rahuri region) | Agrowon

कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ, वेलवर्गीय भाजीपाला, फळबाग रोपवाटिका
कृषी विद्या विभाग, दापोली
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

भात

भात

 •  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर येण्याची अवस्था.
 •  भात पीक पक्वतेच्या अवस्थेत पोचत आहे, अशा स्थितीत भात पिकाला सिंचनाची आवश्यकता असते. पावसाची उघडीप असल्यास पिकाला पाणी देण्याची व्यवस्था करावी.
 • सुरवातीच्या काळात मुसळधार पाऊस झाल्यानंतर पुढील काळातील उघडिपीमुळे खोलगट भागातील भात शेतीमध्ये पाणी साचून राहते. अशा भात खाचरांमध्ये तपकिरी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. रोपाच्या चुडात १० तुडतुडे आढळल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी  
  अॅसिफेट (७५ टक्के) २.२५ ग्रॅम किंवा
  फिप्रोनिल (५ टक्के) २ मि.लि. किंवा
  इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के) ०.२ मि.लि.
 • खाचरात पाणी जास्त काळ साठू देऊ नये. बांध फोडून पाणी पुढे जाऊ द्यावे. नवीन पाणी साठवण्याची व्यवस्था करावी.
 • निळे भुंगेरे नियंत्रणासाठी,
  फवारणी प्रति लिटर पाणी
  लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (२.५ टक्के) ०.६ मि.लि.
  टीप ः फवारणी करताना कीटकनाशकाचे द्रावण चुडाच्या बुंध्यावर पडेल, याची दक्षता घ्यावी.
 •  जिवाणूजन्य करपा प्रादुर्भाव दिसत असल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी
  स्ट्रेप्टोमायसीन* ०.५ ग्रॅम अधिक कॉपर ऑक्सिक्लोराईड २.५ ग्रॅम.

नागली
    अवस्था ः फुटवे येण्याची.
पावसाची उघडीप असल्यास पाण्याच्या उपलब्धतेनुसार सिंचनाची व्यवस्था करावी.

आंबा
नवीन पालवीवर शेंडे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कीडग्रस्त पालवी अळीसहीत नष्ट करावी.
फवारणी प्रति लिटर पाणी
क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मि.लि.

नारळ

 •  गेंडा भुंगा या किडीच्या नियंत्रणासाठी, बागेतील काडी कचरा वेचून स्वच्छता ठेवावी.
 •  बागेतील शेणखताच्या खड्ड्यामध्ये गरजेनुसार क्लोरपायरीफॉस २ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. यामुळे नारळातील गेंडा भुंगा या किडीच्या नियंत्रणाला मदत होते.

वेलवर्गीय भाजीपाला
अवस्था ः फळधारणा
वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये विविध ठिकाणी पाने खाणारी अळी, तांबडे भुंगे, तुडतुडे, मावा अशा किडींचा प्रादुर्भाव दिसत आहे.
किडीपासून संरक्षणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी
डायमेथोएट १.५ मि.लि.

फळबाग रोपवाटिका ः
    पाण्याच्या उपलब्धतेनुसार सिंचनाची व्यवस्था करावी.
    बुरशीजन्य रोगाच्या प्रतिबंधासाठी फळ रोपवाटिकेतील कलमांना कार्बेन्डाझीम २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणाची प्रति रोप ५० मि.लि. या प्रमाणात आळवणी करावी.

 ः ०२३५८ - २८२३८७
(कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.)

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...