रसायनांच्या मातीतील प्रवासाचा वेध घेणे शक्य

रसायनांचा मातीतील वहन जाणणे शक्य
रसायनांचा मातीतील वहन जाणणे शक्य

मातीतून होणाऱ्या रसायनाच्या प्रवासाचा अंदाज मिळण्याची नवी आणि वेगवान पद्धती आर्हास विद्यापीठातील संशोधकांनी विकसित केली आहे. त्यामुळे रसायनांचा कृषी व अन्य क्षेत्रासाठी वापर करताना अधिक काळजी घेणे शक्य होईल. भूजल, जलस्राेत आणि एकूण पर्यावरणाच्या रक्षणासाठी सजग प्रयत्न करणे शक्य होईल. फवारणीदरम्यान मातीवर पडलेल्या कीडनाशके व त्यापासून विघटनानंतर तयार होणारी उत्पादने मातीमध्ये किती दीर्घकाळ राहतात? त्यांना भूजलापर्यंतचा किंवा निचरा प्रणालीपर्यंत प्रवास पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागतो? हे प्रश्न दिसायला साधे दिसत असले तरी त्याची उत्तरे ही त्या ठिकाणी कार्यरत विविध घटकांवर अवलंबून असतात. विशेषतः रसायनाचा मातीतून प्रवास हा मातीच्या पोत आणि संरचनेवर अवलंबून असतो. प्रयोगशाळेमध्ये मातीच्या पृष्ठभागापासून तळापर्यंत होणारा प्रवास मोजण्यात येतो. अर्थात, प्रयोगशाळेमध्ये या चाचण्या करण्यासाठी वेळ, मनुष्यबळ आणि खर्चही मोठ्या प्रमाणात होतो. आर्हास विद्यापीठातील संशोधक शिला कटूवाल, मारीया क्नाडेल, पर मोल्डरप, त्रिने नोरगार्ड, मोगेन्स एच. ग्रीव्हे, लिस डब्ल्यू, डी जोंगे यांच्या गटाने मातीला कोणताही धक्का न लावता त्यातील रसायनांच्या प्रवासाचा अंदाज मिळवण्यासाठी दृश्‍य/ जवळच्या अवरक्त (व्हिजिबल/ नीअर इन्फ्रारेड) स्पेट्रोस्कोपी तंत्राचा वापर केला आहे. काय आहे हे तंत्रज्ञान?

  • व्हिजिबल/ नीअर इन्फ्रारेड हे तंत्रज्ञान वेग मोजण्यासाठी वापरले जाते. त्याचप्रमाणे त्यासाठी आवश्यक ती माहिती गोळा करण्याचा खर्चही अत्यल्प असतो. मातीच्या मूलभूत गुणधर्म उदा. चिकण माती, सेंद्रिय कर्ब यांच्या संख्यात्मक मापनासाठी त्याचा वापर होऊ शकतो.
  • डेन्मार्क येथील प्रक्षेत्रामध्ये सहा प्रातिनिधिक मातीच्या उभ्या भागांमध्ये रसायनाची द्रावणे (सोल्युट्स) कशा प्रकारे प्रवास करतील, याचा अंदाज घेण्यासाठी या तंत्राचा वापर केला. त्याविषयी माहिती देताना प्रो. लिस वोल्लेसेन डि जोंगे यांनी सांगितले, की आम्हाला व्हिजिबल/ नीअर इन्फ्रारेड या तंत्राद्वारे विरघळलेल्या रसायनांचे वस्तुमान अचूकतेने मोजणे शक्य असल्याचे दिसून आले. त्यामुळे भविष्यामध्ये विद्राव्य रसायनांच्या मोजमापासाठी आणि सर्वेक्षणासाठी नवे तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकेल.
  • हे संशोधन नेचर च्या सायंटिफिक रिपोर्टसमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
  • संशोधनाचे महत्त्व ः

  • मातीमध्ये होणारा रसायनांचा निचरा नेमकेपणाने जाणणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये शेतीमध्ये रसायनांचा वापर वाढत गेला असून, त्याचे प्रदूषण जलस्रोतांपर्यंत पोचत आहे. त्याच विपरीत परिणाम जलचरांसह मानवी आरोग्यावर आणि एकूणच पर्यावरणावर होत आहेत. अशा रसायनांचे अंश भूजल, विहिरीच्या पाण्यामध्ये दिसून येत असून, रसायनांच्या वापरावर युरोपिय महासंघाने अनेक बंधने आणलेली आहेत.
  • भूजलापर्यंत रसायने पोचण्यामध्ये माती हे माध्यम आहेत. मातीच्या गुणधर्मानुसार ही रसायने व त्याची विविध द्रावणे ही गाळली जातात. त्यामध्ये मातीची संरचना महत्त्वाची असते. संरचनेमध्ये मातीचा पोत, सेंद्रिय घटक, कार्बोनेटस, विविध धातूंची ऑक्साईड्स , वातावरण, जमिनीचा वापर आणि व्यवस्थापन पद्धती अशा अनेक मूलभूत गुणधर्मांचा समावेश असतो.
  • माती संपृक्त होण्याच्या स्थितीमध्ये असताना पाणी आणि त्यात विद्राव्य रसायनांचे समपातळीमध्ये वहन होते किंवा विशिष्ठ अशा मार्गाने मातीतून वेगवेगळ्या अंशामध्ये वस्तूमान विनिमय होतो.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com