agricultural stories in Marathi, agrowon, grapes advice | Page 2 ||| Agrowon

द्राक्ष : नवीन वाढ करण्यासाठी आवश्यक उपाययोजना
डॉ. आर. जी. सोमकुंवर
गुरुवार, 28 मार्च 2019

द्राक्षबागेमध्ये मागील हंगामामध्ये कलम केलेल्या बागेमध्ये रि कट घेणे आवश्यक असेल. आवश्यक त्या प्रकारची फूट मिळत नसल्यामुळे व मागील हंगामामध्ये काडी परिपक्व झाल्यामुळे या वेळी रि कट घेऊन नवीन खोड व ओलांडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असेल. या वेळी नवीन वाढ करण्याकरिता आवश्यक बाबी व उपाययोजनांची माहिती घेऊ.

 फुटींची निवड करणे ः

द्राक्षबागेमध्ये मागील हंगामामध्ये कलम केलेल्या बागेमध्ये रि कट घेणे आवश्यक असेल. आवश्यक त्या प्रकारची फूट मिळत नसल्यामुळे व मागील हंगामामध्ये काडी परिपक्व झाल्यामुळे या वेळी रि कट घेऊन नवीन खोड व ओलांडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असेल. या वेळी नवीन वाढ करण्याकरिता आवश्यक बाबी व उपाययोजनांची माहिती घेऊ.

 फुटींची निवड करणे ः

  • रि कटनंतर नवीन फुटी निघण्याकरिता कलम काडीवर ४-५ डोळ्यावर हायड्रोजन सामनामाइडचे पेस्टिंग केले जाते. त्यामुळे सर्वच फुटी निघतात. नवीन वेल तयार करण्याकरिता काडीवर फक्त एक फूट आवश्यक असते. या वेळी निघालेल्या सर्वच फुटी राखल्यास पुढे ओलांड्याकरीरिता फुटींची वाढ करून घेण्यामध्ये अडचणी येतील. रि-कट घेतल्यानंतर काडीच्या वरील बाजूस रोगाचा प्रसार होण्याची शक्यता अधिक असते. द्राक्ष वेलीमध्ये शेंड्याच्या प्रभुत्वाची स्थिती (त्याला इंग्रजीमध्ये अपाईकल डॉमिनन्स म्हणतात.) आढळून येते. या गोष्टींचा विचार करता नवीन फुटीचा वापर करतेवळी काळजी घेणे गरजेचे असते. नवीन खोड तयार करण्याकरिता बांबूस बांधताना दुसऱ्या क्रमांकाची फूट निवडावी.
  • यासोबत खालची फूट ही ३ ते ४ पानांवर पिंचिंग करावी. खोड तयार करतेवेळी स्टॉप अँड गो पद्धतीने वाढ करून घ्यावी. या वेळी नवीन फूट ९ ते १० पाने अवस्थेत ६ ते ७ पानांवर थांबवावी. यानंतर या फुटीवर निघालेल्या बगल फुटा ३ ते ४ पानांवर पिचिंग कराव्यात. वरची फूट ही पुन्हा बांबूस बांधून घ्यावी. असे केल्यास खोड पहिल्याच वर्षी जाड होऊन पुरेसे अन्नद्रव्य गोळा करण्यास सक्षम राहिल.

 अन्नद्रव्य आणि पाणी व्यवस्थापन ः

  • सध्याच्या तापमानाचा विचार करता वातावरणातील दिवसाचे तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत बऱ्याच भागात दिसून येईल. या तापमानात बाष्पीभवनाचा वेगसुद्धा जास्त असेल. याचाच अर्थ वेलीची पाण्याची गरज वाढेल. यावेळी बऱ्याचशा बागेत पाण्याची आवश्यक ती पूर्तता शक्य होणार नाही. तेव्हा बागेत बोदावर मल्चिंग करावे. यामुळे मुळाच्या वातावरणामध्ये थंडावा राहिल. बोद झाकले असल्यामुळे जमिनीतून पाणी वाया जाणार नाही. मुळींचा विकास चांगला होईल.
  • नवीन फूट ही खोड तयार करण्याकरिता वाढवायची झाल्यास नत्राचा वापर करणे महत्त्वाचे आहे. अशावेळी केवळ नत्र किंवा नत्र, स्फुरद दोन्ही उपलब्ध असलेल्या ग्रेडचा वापर करावा. या वेळी पालाशयुक्त ग्रेडचा वापर केल्यास वाढ खुंटण्याची समस्या उद्भवू शकते.
  • बागेमध्ये सिंचनासाठी पाण्याची कमतरता असल्यास सकाळी किंवा सायंकाळी पाणी द्यावे.

 ः डॉ. आर. जी. सोमकुंवर, ०२०-२६९५६०६०
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)

इतर फळबाग
ढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचे...बागेत कमी झालेले तापमान, निघालेल्या बगलफुटीमुळे...
डाळिंबबागेतील मररोगाची लक्षणे कसे ओळखाल...डाळिंबबागेमध्ये मररोगाचा प्रादुर्भाव आणि प्रसार...
द्राक्षवेल अचानक सुकण्याच्या समस्येवर...सध्याच्या परिस्थितीत द्राक्षबागेतील सर्व भागात...
द्राक्षबागेतील स्ट्रोमॅशियम बारबॅटम...द्राक्षाच्या जुन्या बागांमध्ये खोडकिडीच्या...
भुरी नियंत्रणासह अन्नद्रव्य...सध्या बऱ्याच ठिकाणी तापमानामध्ये वाढ होताना दिसत...
संत्रा झाडे वाळण्याची कारणे जाणून करा...विविध संत्रा बागांमध्ये उन्हाळ्यात आणि पावसाळा...
गारपिटीनंतर द्राक्ष बागेची अधिक काळजी...द्राक्ष बागेमध्ये वाढीच्या विविध अवस्थेमध्ये...
कॅनोपीमध्ये वाढू शकतो भुरीचा प्रादुर्भावहवामान अंदाजानुसार येत्या आठवड्यामध्ये कोणत्याही...
आंबा पिकावरील फळमाशीचे व्यवस्थापनआंबा पिकावर सुमारे १८५ किडी आढळत असल्या तरी...
द्राक्ष फुटीच्या विरळणीबरोबर कीड...येत्या आठवड्यामध्ये कोणत्याही विभागामध्ये पावसाची...
केसर आंबा व्यवस्थापन या वर्षी केसर आंबा कलमांना मोठ्या प्रमाणावर...
आरोग्यदायी ड्रॅगन फ्रूटशरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
फणस व्यवस्थापनफणसाला नियमित फुले व फळे येतात. फणसामध्ये...
कागदी लिंबू लागवडकागदी लिंबू पिकाला मध्यम काळी, हलकी मुरमाड,...
द्राक्षबागेत नवीन फुटीवर किडींच्या...द्राक्ष बागेमध्ये सध्याच्या वातावरणाचा आढावा...
संत्र्यावर कोळशीचा प्रादुर्भाव, त्वरेने...सद्यस्थितीत अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांत...
फळबागांना आच्छादन, संरक्षित पाणी द्यासध्याच्या काळात पाणी कमतरता, सूर्यप्रकाश, गरम...
द्राक्षबागेत खरड छाटणीनंतर सूक्ष्म...द्राक्षबागेत या वेळी फळकाढणीचा हंगाम जोरात सुरू...
द्राक्ष : नवीन वाढ करण्यासाठी आवश्यक...द्राक्षबागेमध्ये मागील हंगामामध्ये कलम केलेल्या...