अकोले, जि.
ताज्या घडामोडी
द्राक्ष बागेतील अतिथंडीचे परिणाम, उपाययोजना
द्राक्षलागवडीखालील भागात (मुख्यतः नाशिक जिल्हा) किमान तापमानात फार मोठी घट होताना दिसून येत आहे. काही ठिकाणी १ अंशापर्यंत तापमान कमी झाले असून, त्याचा बागेवर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. वाढलेल्या थंडीमुळे खालील समस्या बागेमध्य उद्भवू शकतात.
पिंक बेरीची विकृती
ज्या बागेत द्राक्षघडात पाणी उतरायला अजून १०-१५ दिवस आहेत, अशा बागेत पिंक बेरी विकृती जास्त प्रमाणात दिसून येईल. फळकाढणी जवळ येत असलेल्या बागेत हे प्रमाण कमी असेल किंवा नसेल.

उपाययोजना ः
शेकोटी पेटवणे ः बागेमध्ये जागोजागी शेकोटी पेटवून तापमानात वाढ करून घेता येईल.
पाणी वाढवणे ः यामुळे बागेतील तापमानात वाढ करून घेता येईल.
बोदावर मल्चिंग करणे ः यामुळे मुळाच्या परिसरातील तापमान वाढवून घेता येईल. परिणामी जमिनीतून अन्नद्रव्ये उचलण्याच्या कामांमध्ये अडचणी येणार नाहीत. मण्यांचा आकार वाढणे सुरू राहील.
प्लॅस्टिक बागेत टाकणे ः यामुळे बागेतील तापमान वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचाली सुरळीत राहण्यास मदत होईल. पिंक बेरीची समस्या टाळणे शक्य होईल.
बागेतील पाने करपणे
कमी तापमानामुळे बागेतील पाने करपण्याचीही समस्या निर्माण होऊ शकते. बागेत पानांचे कार्य सुरळीत राहण्याकरिता किमान तापमान हे १५ अंश सेल्सिअसच्या पुढे आवश्यक असते. परंतु, तापमान फारच कमी झाल्यास पानांमधील पेशींच्या विकासावर विपरीत परिणाम होतात. पानांच्या पेशी या वेळी मरतात. त्यामुळेच पानांत असलेले हरितद्रव्य सुकत व शेवटी पाने करपल्यासारखी किंवा जळाल्यासारखी दिसून येतात. ज्या बागेमध्ये फळछाटणी होऊन ६०-७० दिवस झाले आहेत व पाने करपण्याची लक्षणे दिसत आहेत, अशा बागांमध्ये पुढील काळात घडाच्या विकासात अडचणी येऊ शकतात.
उपाययोजना ः
- पुढील काळात पुन्हा काही दिवस तापमान कमी होण्याची शक्यता असल्यास बागेत शेडनेटचा वापर करावा.
- ज्या वेळी कमाल तापमान २५ ते ३० अंश सेल्सिअसच्या दरम्यान असते व थोडेफार उन्हे असतात, अशा वेळी १२ः६१ः० किंवा फक्त युरिया १.५ ते २ ग्रॅम प्रती लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी.
- काही वेळा बागेत उन्हाच्या वेळी नुसती पाण्याची फवारणीसुद्धा पानांमधील पेशी जिवंत ठेवण्यास मदत करते.
संपर्क ः डॉ. आर. जी. सोमकुंवर, ०२०-२६९५६०६०
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)
- 1 of 1022
- ››