agricultural stories in marathi, agrowon, Grapes advice, powdery mildew in grape vineyard | Agrowon

ढगाळ वातावरणामध्ये भुरी प्रादुर्भावाची शक्यता
डॉ. एस. डी. सावंत
गुरुवार, 17 मे 2018

सांगली, सोलापूर येथील द्राक्ष विभागामध्ये येत्या आठवड्यामध्ये आज आणि उद्या (१७, १८ तारखेपर्यंत) वातावरण ढगाळ राहील. १८ तारखेपासून २१ तारखेपर्यंत अधूनमधून एक दोन ठिकाणी पावसाची शक्यता राहील. सांगली विभागामध्ये पळशी, खानापूर, विटा, तासगाव या सर्व भागामध्ये सर्वसाधारणपणे १८ व त्यानंतर २१, २२ तारखेला हलक्या पावसाची शक्यता आहे. सोलापूर भागामध्ये याच दिवसामध्ये सांगलीप्रमाणे अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल.

सांगली, सोलापूर येथील द्राक्ष विभागामध्ये येत्या आठवड्यामध्ये आज आणि उद्या (१७, १८ तारखेपर्यंत) वातावरण ढगाळ राहील. १८ तारखेपासून २१ तारखेपर्यंत अधूनमधून एक दोन ठिकाणी पावसाची शक्यता राहील. सांगली विभागामध्ये पळशी, खानापूर, विटा, तासगाव या सर्व भागामध्ये सर्वसाधारणपणे १८ व त्यानंतर २१, २२ तारखेला हलक्या पावसाची शक्यता आहे. सोलापूर भागामध्ये याच दिवसामध्ये सांगलीप्रमाणे अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल.

सध्याच्या परिस्थितीमध्ये नवीन फुटी फुटत आहेत आणि शेंडा चालू आहे. अधूनमधून पाऊस पडला तरी वातावरणामध्ये जास्त आर्द्रता वाढत नाही. ती ४० ते ५० टक्क्यापेक्षा अधिक राहत नाही. अशा वातावरणामध्ये करपा रोगाची फारशी शक्यता नाही. परंतू मागील आठवड्यामध्ये सांगितल्याप्रमाणे बहुतांशी ठिकाणी वातावरण ढगाळ राहत असल्यामुळे पुन्हा भुरीचाच जास्त धोका दिसतो. ज्या ज्या ओलांड्यावर जास्त फुटी आलेल्या असतील, तिथे आतील बाजूला भुरी वाढण्याची शक्यता आहे. या भुरीच्या नियंत्रणासाठी सल्फर (८० डब्ल्यूजी) दीड ते दोन ग्रॅम प्रति लिटर प्रमाणात वापर करावे. सांगलीच्या काही भागामध्ये वाळवा, तासगाव भागामध्ये मागील एक दोन दिवसामध्ये हलक्या गारा पडून वादळी पाऊस झाल्याचे समजते. बऱ्याचशा ठिकाणी या गारामुळे नवीन फुटीच्या हिरव्या काड्यावर कमी जास्त प्रमाणात जखमा झालेल्या आहेत. बरीचशी पानेही फाटलेली आहेत. खरे पाहता या कोवळ्या हिरव्या काड्यावरील जखमा कालांतराने भरून निघतील. फाटलेल्या पानांनी फारसा फरक पडणार नाही. नवीन चांगली पाने येऊन, ती ढगाळ वातावरण व पावसामुळे जोमाने वाढतील. झाडावर ताण कमी होईल. भुरीव्यतिरिक्त अन्य कोणत्या रोगाची त्वरीत शक्यता नसल्यामुळे सध्या भुरीसाठी सल्फरव्यतिरिक्त अन्य कोणत्याही बुरशीनाशकाच्या फवारणीची जरूरी नाही. १८ ते २१ च्या दरम्यान जर बागेमध्ये पाऊस झाला, तर या सर्व बागांमध्ये बुरशीजन्य करपा रोगाची शक्यता वाढेल. म्हणून २० ते २१ तारखेनंतर पाऊस झालेल्या ठिकाणी करपा रोगाच्या नियंत्रणासाठी थायोफिनेट मिथाईल ०.७५ ग्रॅम अधिक मॅन्कोझेब २ ग्रॅम (टॅक्स मिक्स) प्रति लिटर या प्रमाणे फवारावे. या पावसाआधी याची फवारणी केल्यास बुरशीनाशक पावसाने धुवून जाईल व पुन्हा २१, २२ तारखेनंतर फवारणी करणे आवश्यक होईल. म्हणूनच २१ तारखेनंतर फवारणी करण्याचा सल्ला देत आहोत.
नाशिक भागामध्ये पावसाची विशेष शक्यता नाही. परंतू वातावरण अधूनमधून ढगाळ राहणार आहे. वर नमूद केल्याप्रमाणे ढगाळ वातावरणामुळे भुरीसाठी योग्य ती फवारणी करणे आवश्यक आहे. दिंडोरी व जवळपासच्या भागामध्ये १७,१८ तारखेला कदाचित काही भागामध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसाची तीव्रता पाहूनच पाऊस संपल्यानंतर वरीलप्रमाणे फवारणीचा निर्णय घ्यावा.
 

इतर ताज्या घडामोडी
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...
पक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर  : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...
पुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे  ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...
‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर  ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...
जनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई  : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...
भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा   ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...
अमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती   ः जिल्ह्यातील चौदाही...
समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक...अमरावती  : समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या...