कोंबड्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी प्रमाणात असेल, तसेच समतोल आहार, शुद्ध हवेची कमतरता,
तेलबिया पिके
उन्हाळी भुईमुगावरील कीड नियंत्रण
उन्हाळी भुईमुगावर खालील विविध अळ्यांचा प्रादुर्भाव होतो. या अळ्यांच्या नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना कराव्यात.
पाने पोखरणारी अळी ः
लहान अळ्या पानाच्या आत शिरून, वरील पापुद्रा सलग ठेवून आतील हरीतद्रव्य खात नागमोडी मार्गाने पुढे सरकतात. प्रादुर्भावग्रस्त पाने दुरून चमकतात. पाने वाकडी तिकडी होतात आणि वाळतात.
उपाययोजना : फवारणी प्रतिलिटर पाणी
डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के प्रवाही) १ मि.ली किंवा लॅंबडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.४ ते ०.६ मि.ली किंवा क्विनालफाॅस (२५ टक्के प्रवाही) २ मि.ली.

पाने गुंडाळणारी अळी :
लहान अळ्या पाने पोखरतात. पुढे त्या जवळपासची पाने एकत्र करून किंवा एकाच पानाच्या दोन कडा एकत्र करून गुंडाळी तयार करतात. अशा गुंडाळीत राहून त्या पाने खातात. तीव्र प्रादुर्भावाच्या स्थितीत पीक जळाल्यासारखे दिसते. या किडीमुळे पीक उत्पादनात २४ ते ९२ टक्के घट झाल्याच्या नोंदी आहेत. ही कीड सोयाबीन, मूग आणि लुसर्न या पिकांचेही नुकसान करते.
उपाययोजना :
- पीक ४० दिवसांपर्यंत तणविरहित ठेवावे.
- पिकाची योग्य फेरपालट करावी.
- शेतात अथवा बांधावर बावचीची झाडे असल्यास ती उपटून त्याचा नाश करावा.
- आर्थिक नुकसान संकेत पातळी - दोन अळ्या प्रती झाड किंवा एक अळी प्रती मीटर ओळ.
- फवारणी प्रतिलिटर
- लॅंबडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.४ ते ०.६ मि.ली किंवा क्विनालफाॅस (२० टक्के प्रवाही) २.८ मि.ली.
संपर्क ः डाॅ. ए. व्ही. कोल्हे, ९९२२९२२२९४
( कीटकशास्त्र विभाग, डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)
- 1 of 3
- ››