agricultural stories in Marathi, agrowon, integrated pest management of mealy bug in cotton | Page 2 ||| Agrowon

कपाशीवरील पिठ्या ढेकणाचे एकात्मिक व्यवस्थापन

डॉ. दा. स. पोखरकर, डॉ. पं. वि. पाटील
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

पिठ्या ढेकूण ही कीड पिकात शिरल्यानंतर त्याचे नियंत्रण करणे कठीण जाते. पिठ्या ढेकणाची मादी २५० ते ६०० अंडी, पिशवीसारख्या आवरणात घालते. यातील बऱ्याचशा अंड्यांतून पिले निघालेली असतात, तर काही अंडी घातल्यानंतर लगेच उबतात. अशी पिले व अंडी पांढरट व काळपट मादीच्या पोटाखाली आढळतात. अधूनमधून पिले मादीच्या अंगावर व सभोवताली फिरताना दिसतात. अंडी लांबट पांढऱ्या रंगाची व सूक्ष्मदर्शकाखाली तांदळाच्या दाण्यासारखी दिसतात. पिले २२ ते २५ दिवसांत प्रौढ होतात. त्यांच्या शरीराभोवती मऊ केस व त्यालगतच्या मेणामध्ये करवतीसारखी नक्षी दिसते. मिलीबगचा जीवनक्रम साधारणतः एक महिन्यात पूर्ण होतो.

पिठ्या ढेकूण ही कीड पिकात शिरल्यानंतर त्याचे नियंत्रण करणे कठीण जाते. पिठ्या ढेकणाची मादी २५० ते ६०० अंडी, पिशवीसारख्या आवरणात घालते. यातील बऱ्याचशा अंड्यांतून पिले निघालेली असतात, तर काही अंडी घातल्यानंतर लगेच उबतात. अशी पिले व अंडी पांढरट व काळपट मादीच्या पोटाखाली आढळतात. अधूनमधून पिले मादीच्या अंगावर व सभोवताली फिरताना दिसतात. अंडी लांबट पांढऱ्या रंगाची व सूक्ष्मदर्शकाखाली तांदळाच्या दाण्यासारखी दिसतात. पिले २२ ते २५ दिवसांत प्रौढ होतात. त्यांच्या शरीराभोवती मऊ केस व त्यालगतच्या मेणामध्ये करवतीसारखी नक्षी दिसते. मिलीबगचा जीवनक्रम साधारणतः एक महिन्यात पूर्ण होतो. एक वर्षात १२ ते १५ पिढ्या होतात.

नुकसानीचा प्रकार

 • कपाशी व्यतिरिक्तच्या हंगामात ही कीड अन्य पिके, जास्वंदासारखी फुलझाडे आणि प्रामुख्याने गाजर गवत, रानभेंडी, आघाडा या सारख्या तणांवर उपजीविका करते. पुढे कपाशीचे पीक उपलब्ध झाल्यानंतर पिकात येते. खाद्य उपलब्ध नसल्यास पीक अवशेषात पडून राहते.
 • या किडीचा प्रादुर्भाव साधारणतः सप्टेंबर-ऑॅक्टोबर महिन्यापासून सुरवात होते.
 • सुरवातीच्या काळामध्ये पिठ्या ढेकूण कपाशी पानांच्या खालील बाजूने रस शोषण करतो. नंतर कोवळे शेंडे व फुले, बोंडे यांचे नुकसान करतो. या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्यास शेतामध्ये पिठ्या ढेकूणग्रस्त असलेली झाडे पूर्णपणे पांढरी झालेली दिसतात. तसेच ढेकूण आपल्या शरीरातून एक प्रकारचा चिकट द्रव बाहेर टाकतात. त्यामुळे पाने,कळी यावर वॅप्नोडियम नावाची काळी बुरशी येते. उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.

व्यवस्थापन ः

 1. शेताजवळील शोभिवंत झाडे (उदा. जास्वंद, क्रोटॉन इ.) झाडावरील पिठ्या ढेकणाचा बंदोबस्त करावा. अधिक प्रादुर्भावग्रस्त झाडांचा अधिक प्रादुर्भावग्रस्त भाग किंवा संपूर्ण झाड उपटून नष्ट करावे.
 2. पिठ्या ढेकणाचा प्रादुर्भाव सुरवातीला शेताच्या कडेच्या झाडावरच कमी क्षेत्रात होतो. तेव्हा फक्त प्रादुर्भावग्रस्त भागावरच कीटकनाशकाचा वापर करावा. संपूर्ण शेतातील पिकावर फवारणी करण्याची गरज नाही.
 3. पिठ्या ढेकणावर उपजीविका करणारे क्रिप्टोलिमस मॉन्ट्रोझायरी व इतर ढालकिडे, क्रायसोपा हे परभक्षी व लॅप्टोमेस्टिकस डॅक्टोलोपी, अॅनागायरस कमाली हे परोपजीवी किटक निसर्गात आढळून येतात. त्यांचे संवर्धन करावे.
 4. मित्रकिडी अधिक क्रियाशील असल्यास रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळावा. त्याऐवजी जैविक किटकनाशके उदा. व्हर्टिसिलीयम लेकॅनी, मेटारायझीम अॅनिसोप्ली ५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. जैविक कीटकनाशकांचा वापर वातावरणात आर्द्रता अधिक असताना करावा. संध्याकाळी फवारणी करावी.
 5. आवश्यकता भासल्यास मित्रकीटकास कमी हानिकारक असलेली रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा. उदा. बुप्रोफेझीन २ मिली प्रतिलिटर पाणी.
 6. प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर गेल्यास नियंत्रणासाठी, फवारणी प्रतिलिटर पाणी.
  बुप्रोफेझीन (२५ एस.सी.) २ मिलि. किंवा
  डायमेथोएट (३० ई.सी.) १.३ मिलि. किंवा फ्लोनिकॅमीड (५० डब्ल्यू जी.) ०.४ ग्रॅम.

या किडीच्या अंगावर मेणचट आवरण असल्यामुळे फवारणी करतांना कीटकनाशकासोबत २० ग्रॅम धुण्याची पावडर किंवा फिश ऑइल रोझीन सोप प्रति १० लिटर पाण्यात मिसळावी.

डॉ. पंकज पाटील, ७५८८९२११९६
(संशोधन सहयोगी - क्रॉपसॅप, कृषी कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)


फोटो गॅलरी

इतर नगदी पिके
ऊस पीक सल्ला१) साधारणपणे १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत...
गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी ...सध्या कापूस पीक हे फुलोरा ते बोंडे लागण्याच्या...
कपाशीतील बोंड सडणे विकृतीचे व्यवस्थापनमागील दोन वर्षांपासून राज्यातील विदर्भ, मराठवाडा...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
नारळ बागेत मसाला पिकांची लागवड    नारळ बागेमध्ये नारळाच्या...
गुलाबी बोंड अळीला रोखण्यासाठी एकात्मिक...गुलाबी बोंड अळ्यांना खाण्यासाठी व पतंगाना अंडी...
आडसाली उसासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य...
ऊस बियाणे निर्मितीसाठी ‘सुपरकेन नर्सरी...अलीकडे प्रो ट्रे किंवा पिशव्यांमध्ये उसाची रोपे...
दुष्काळाशी लढा देत हळदीची उत्कृष्ट शेतीअमळनेर (जि. जळगाव) येथील अश्पाक मुनीर पिंजारी व...
डाळिंब बागेतील मर रोगाचे नियंत्रणडाळिंब लागवड शक्यतो गादी वाफ्यावर करावी, त्यामुळे...
खरीप कांदा लागवड तंत्रज्ञानविशेषतः विदर्भात रब्बी हंगामातील कांद्याचे...
खरीप नियोजन : कपाशीतील असमतोल वाढ,...गेल्या काही वर्षांमध्ये कपाशी लागवड समस्यांत वाढ...
ऊसवाढीच्या टप्‍प्यानुसार द्या पुरेसे...जमिनीच्या प्रकारानुसार योग्य ठिबक सिंचन पद्धतीची...
ऊस पीक व्यवस्थापन सध्याच्या काळात जमिनीतील ओलावा टिकवणे, पाण्याचा...
दर्जेदार कृषी उत्पादनासाठी...आपण शेती उत्पादनामध्ये बऱ्यापैकी स्वयंपूर्ण झालो...
उसावरील लोकरी माव्याचे एकात्मिक नियंत्रणजुलै २००२ मध्ये सांगली जिल्ह्यात उसावर सर्वप्रथम...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
थंडी, धुक्यांमुळे कांदा पिकावरीस...सध्या थंडीचा कडाका चांगलाच वाढलेला असून, धुकेही...
कांदा पिकावरील किडीचे नियंत्रणसध्या थंडीचा कडाका चांगलाच वाढलेला आहे. या काळात...