agricultural stories in Marathi, agrowon, ipm for harbhara ghateali | Agrowon

हरभऱ्यावरील घाटेअळीचे एकात्मिक नियंत्रण
वाय. बी. मात्रे, आर. बी. डाके, डॉ. डी. आर. कदम
मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018

हरभऱ्याच्या उत्पादनक्षम लागवडीमध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे घाटे अळीचा प्रादुर्भाव. ही घाटे अळी हरभरा पिकावर आपले २ जीवनक्रम पूर्ण करते. त्यामुळे नुकसानीची पातळी वाढते.

घाटे अळीच्या अवस्था ः अंडी - अळी - कोष – पतंग

प्रादुर्भावाची वैशिष्ट्ये :

हरभऱ्याच्या उत्पादनक्षम लागवडीमध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे घाटे अळीचा प्रादुर्भाव. ही घाटे अळी हरभरा पिकावर आपले २ जीवनक्रम पूर्ण करते. त्यामुळे नुकसानीची पातळी वाढते.

घाटे अळीच्या अवस्था ः अंडी - अळी - कोष – पतंग

प्रादुर्भावाची वैशिष्ट्ये :

 • विशेषतः पीक कळी व फुलोरा अवस्थेत आल्यावर अळीचा अधिक प्रादुर्भाव. मात्र, घाटे व परिपक्व होणाऱ्या दाण्यावरील प्रादुर्भाव जास्त नुकसान कारक ठरतो.
 • हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव ४० टक्के पर्यंत आढळतो.
 • साधारणतः एक अळी ३० - ४० घाट्याचे नुकसान करते.
 • काबुली हरभऱ्यावर देशी वाणापेक्षा घाटे अळीचा अधिक प्रादुर्भाव आढळतो.
 • टपोऱ्या देशी वाणावर लहान दाण्यांच्या वाणापेक्षा घाटेअळीचा जास्त प्रादुर्भाव आढळून येतो.
 • दाट पेरलेल्या हरभऱ्यामध्ये घाटे अळीचा प्रादुर्भाव अधिक होतो.

घाटेअळी एकात्मिक कीड नियंत्रण :

 • उन्हाळ्यात जमिनीची खोल चांगली नांगरणी करावी, त्यामुळे किडीचे कोष उघडे पडतात. पक्षी ते वेचून खातात. यासाठी पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी चार-पाच दिवस आधी सकाळी लवकर थोडा भात शिजवून शेतात रिकाम्या जागी धुर्यावर विखरून टाकावा.
 • पक्षी थांबे एकरी १० ते २० प्रमाणात लावावेत किंवा पेरतेवेळी ज्वारी किंवा मक्‍याचे दाणे टाकावे. याकडेही पक्षी आकर्षित होतात. त्यावर बसून पक्षी अळ्यांचा फडशा पाडतात.
 • शिफारशीत आणि रोगास प्रतिकारक्षम वाण लागवडीसाठी निवडावे, तसेच शिफारशीत अंतरावर पेरणी करावी.
 • घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी गंधसापळ्यांचा वापर करावा.
 • हरभरा पिकात आंतरपीक किंवा मिश्र पद्धतीचा अवलंब करावा.
 • मुख्य पिकाभोवती झेंडू या सापळा पिकाची एक ओळ लावावी.
 • वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर करावा. अळीचा प्रादुर्भाव दिसताच,
  निंबोळीअर्क ( ५%,) किंवा अॅझाडीरॅक्टिन (३०० पीपीएम) ५ मिली प्रति लिटर पाणी.
 • जैविक कीटकनाशक एचएएनपीव्ही हेक्टरी ५००एल.ई म्हणजेच ५०० मिली विषाणू प्रति ५०० लिटर पाण्यात मिसळावे. त्यामध्ये ५०० मिली चिकटद्रव्य आणि ५० ग्रॅम उत्तम दर्जाची नीळ टाकून फवारणी करावी. ही फवारणी शेतात प्रथम-द्वितीय अवस्थेतील अळ्या असताना केल्यास अतिशय प्रभावी ठरते.
 • बिव्हेरिया बॅसियाना (१ टक्के विद्राव्य) ३ किलो प्रति हेक्टरी प्रति ५००लिटर पाणी किंवा ६ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

रासायनिक नियंत्रण : फवारणी प्रमाण प्रति लिटर पाणी

१) क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मिली किंवा
२) ईमामेक्टीन बेंझोएट (५ टक्के) ०.४५ ग्रॅम किंवा
३) डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के प्रवाही) १ मिली. किंवा
४) लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) १.२५ मिली किंवा
५) क्लोरअँन्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के प्रवाही) ०.२५ मिली किंवा
६) फ्लूबेंडीअमाईड (४८ टक्के प्रवाही) ०.२५ मिली किंवा
७) क्लोरपायरीफॉस (२० टक्के) २.५ मिली.

(लेखक वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील कीटकशास्त्र विभागात वाय. बी. मात्रे, आर. बी. डाके हे पी. एचडीचे विद्यार्थी असून, डॉ. डी. आर. कदम हे सहयोगी प्राध्यापक आहेत.)

इतर कडधान्ये
योग्य वेळी करा कडधान्य पेरणीमूग, उडीद :     मध्यम ते...
तयारी खरिपाची : वेळेवर मुगाची लागवड...जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा माॅन्सूनचा पुरेसा...
तंत्रज्ञान वैशाखी मूग लागवडीचेउन्हाळ्यातील जास्त तापमान मूग पिकाच्या वाढीसाठी...
हरभऱ्यावरील घाटेअळीचे एकात्मिक नियंत्रणहरभऱ्याच्या उत्पादनक्षम लागवडीमध्ये सर्वात मोठी...
तुरीवर पिसारी पतंगाचा प्रादुर्भावकिडीचे शास्त्रीय नाव ः इक्झेलॅस्टीस ॲटोमोसा १...
तुरीमध्ये आंतरमशागत महत्त्वाची...तूर पेरणीनंतर तिसऱ्या आठवड्यात एक कोळपणी करून...
कर्बोदके, प्रथिनांचा उत्तम स्राेत ः...प्रथिनांसाठी कडधान्य हे समीकरण जसे सर्वश्रुत आहे...
तूर पिकावरील कीड-रोगांचे वेळीच नियंत्रण...मुळकूज : रोगकारक बुरशी : रायझोक्टोनिया खोडकूज...
अनियमित पावसात तूर रोपनिर्मिती,...राज्यात तूर हे खरिपातील महत्त्वाचे पीक आहे....
तंत्र मटकी, हुलगा लागवडीचेमटकी व हुलगा ही दोन पिके कमी पावसातही चांगले...
कृषी सल्लामार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू...
शिफारशीत मूग जातींची निवड महत्त्वाची...गेल्या काही वर्षांमध्ये मुगाचे दर वाढते असल्याने...
कामगंध सापळ्याद्वारे करा घाटेअळीला अटकाव सध्या हरभरा पीक फुलोरा किंवा...
तूर पीक संरक्षण सल्ला तूर पिकावर सुमारे २०० किडींच्या प्रादुर्भावाची...
हरभऱ्यावरील घाटेअळीचे नियंत्रणघाटेअळी ही हरभरा पिकाची प्रमुख कीड आहे. एक अळी...
तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे... सध्याची पीक व कीड प्रादुर्भाव अवस्था...
लोहयुक्त कुळीथ खाकराकुळीथ हे लोहाचा उत्कृष्ट स्रोत आहे. कुळीथ हे...
रब्बी पिकांतील रासायनिक तणनियंत्रणपिकांच्या अधिक उत्पादनासाठी योग्य वेळेत...
आंतरपीक पद्धतीतून वाढवा उत्पन्नआंतरपीक पद्धतीमुळे जमिनीची सुपीकता वाढते....
नियोजन हरभरा लागवडीचे...जिरायती क्षेत्रात जमिनीतील उपलब्ध ओलावा व बागायती...