द्राक्ष कलम करण्याची पद्धती

द्राक्ष कलम करण्याची पद्धत
द्राक्ष कलम करण्याची पद्धत

खुंटरोपाची निवड

डॉगरीज, डीग्रासेट, रामसे किंवा साल्ट ग्रीक, ११०आर, सेंटजॉर्ज आणि टेलकी ५ ए.,१६१३ आणि फ्रिडम जमिनीच्या प्रकारानुसार खुंटरोपाची निवड

  • जास्त सूत्रकृमीचा प्रादुर्भाव आणि क्षारांचे प्रमाण जास्त असणाऱ्या जमिनीसाठी ः डॉगरीज, डीग्रासेट, रामसे, फ्रिडम आणि १६१३ या खुंटरोपाची निवड करावी.
  • क्षार सहनशील खुंटरोप ः रामसे किंवा साल्ट ग्रीक, डॉगरीज आणि डीग्रासेट
  • कमी पाणी असणाऱ्या जमिनीसाठी खुंट रोपाची निवड ः जास्त सहनशील-११०आर, कमी सहनशील- सेंटजॉर्ज
  • खुंट कसे तयार करावे ?

  • खरड छाटणी झाल्यानंतर कलम बांधवयाच्या जातीची खुंट रोपाची काडी घ्यावी. निवडलेली काडी गोलाकार व पक्व असावी. काडीवर किमान ४ डोळे असावे.
  • काडी लावण्यासाठी ८ x १५ सेंमी आकाराची नर्सरी पिशवी वापरावी.
  • नर्सरी पिशवीत माती, चांगले कुजलेले शेणखत आणि स्फुरद या खताची मात्रा २:१:१ या प्रमाणात भरावी.
  • निवडलेल्या खुंट रोपाची काडी लागवडीपूर्वी एक दिवस अगोदर पाण्यामध्ये बुडवून ठेवावी. यामुळे काडीवरील डोळे लवकर फुटतात.
  • निवडलेली काडी नर्सरी पिशवीमध्ये लावण्यापूर्वी कार्बेन्डाझीम २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणामध्ये ५ मिनिटे बुडवून घ्यावी. - नर्सरीमधील खुंट रोप २-३ महिन्यांनंतर आधी आखणी केलेल्या शेतामध्ये योग्य अंतरावर स्थलांतरीत करावे.
  • कलम बांधण्यासाठी खुंटरोपाचे वय खुंटरोप लागवडीपासून ८ ते ९ महिने वयाचे असावे. ते गोलाकार व पेन्सीलच्या जाडीचे असावे. कलम काडीची निवड

  • कलम काडी एप्रिल छाटणीपासून सुमारे १२० दिवसांची असावी.
  • काडीचा रंग विटकरी असावा.
  • निवडलेल्या कलम काडीवर किमान दोन चांगले फुगलेले डोळे असावेत.
  • कलम काडीची जाडी ८-१० मिमी असावी.
  • कलम करताना लागणारे साहित्य ः कलम चाकू, प्लॅस्टिक टेप कलम करण्याचा योग्य काळ

  • १५ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर.
  • वातावरणातील आर्द्रता ८० टक्क्यांच्या वर असते, असा काळ कलम करण्यासाठी योग्य समजावा. आर्द्रता ८०% किंवा त्यापेक्षा अधिक असल्याची खूण म्हणजे या काळात बागेमध्ये फिरताना किंवा काम करताना घाम जास्त येतो. या काळात केलेले कलम यशस्वी होते.
  • कलम करण्याची पद्धत पाचर कलम -

  • निवडलेल्या खुंट रोपावर जमिनीपासून १ फूट उंचीवर कट करावे. त्यावर साधारण मधोमध दोन इंचाचा उभा काप घ्यावा.
  • कलम काडीवर दोन इंचाचा तिरका काप घ्यावा. कलम काडीची पाचर खुंट रोपावर घट्ट बसवून घ्यावी. त्यावर प्लॅस्टिक टेप हवेचा शिरकाव होणार नाही, अशा पद्धतीने घट्ट बांधावा.
  • कलम यशस्वी झाले किंवा नाही कसे ओळखावे? साधारणतः ८-९ दिवसांनंतर कलम काडीवरील डोळे फुटायला सुरवात होते किंवा फुगलेला डोळा तांबूस रंगाचा दिसतो कलम केल्यानंतर घ्यावयाची काळजी कलम केल्यानंतर ३-४ दिवसांमध्ये कलम काडीवरील डोळे फुगून नवीन फूट बाहेर पडण्यास सुरवात होते. त्या वेळी उडद्या कीड डोळे कुरतडून खाते. कलम यशस्वी होत नाही. अशा वेळी शिफारशीत अांतरप्रवाही कीटकनाशकाची फवारणी करावी. कलमाच्या जोडाखालील म्हणजेच खुंट रोपावरील येणाऱ्या फुटी वेळोवेळी काढून टाकाव्यात. त्यामुळे कलम काडीवरील डोळे लवकर फुटण्यास मदत होईल. कलम जोडावरील गुंडाळलेले प्लॅस्टिक हे कलम काडीच्या आत मध्ये जाणार नाही, याची काळजी घ्यावी. ज्या ठिकाणी प्लॅस्टिक काडीच्या आत शिरले असेल, तेथील प्लॅस्टिक सुईच्या साह्याने कापून काढावे.

    संपर्क ः सतीश फाळके, ८००७१४०२४४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com