मिरचीवरील किडींचा प्रादुर्भाव ओळखा, उपाययोजना करा

मिरचीवरील किडींचा प्रादुर्भाव ओळखा, उपाययोजना करा
मिरचीवरील किडींचा प्रादुर्भाव ओळखा, उपाययोजना करा

मिरची पिकावर प्रादुर्भाव करणाऱ्या किडींमध्ये कळी-फूल पोखरणारी अळी, पाने खाणारी, पोखरणारी अळी आणि रस शोषक किडी, असे तीन गट पडतात. सध्या अनेक ठिकाणी सुरवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये असलेल्या मिरचीमध्ये हेलिकोव्हर्पा, लष्करी अळी यांसह फुलकिड्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. फळे खाणाऱ्या किंवा पोखरणाऱ्या किडी हेलिकोव्हर्पा अळी (हिरवी अळी) ः १) किडीसाठी ढगाळ वातावरण पोषक असून, अनुकूल वातावरणामध्ये प्रादुर्भावामध्ये वाढ होते. २) अंडी अवस्था (५ ते ६ दिवस) ः हिरवट पिवळ्या रंगाची आणि चकचकीत अंडी कोवळ्या पानावर अलग अलग घातलेली दिसतात. ३) अळी अवस्था (सुमारे १५ दिवस) ः पोपटी ते हिरव्या रंगाच्या लहान अळ्या प्रथम कोवळी पाने, देठ खातात. पुढे फलधारणा झाल्यावर फळांना गोलाकार छिद्र पडून फळांतील गाभ्यावर उपजीविका करतात. ४) कोष अवस्था (हवामानानुसार ८ ते १२ दिवस) ः मातीच्या वेष्टनामध्ये कोष केले जातात. ५) प्रौढ अवस्था ः मादी पतंग तिच्या संपूर्ण आयुष्यात सरासरी ५०० ते ७०० अंडी देते. पाने खाणारी अळी (लष्करी अळी) १) अंडी अवस्था (४-५ दिवस) ः अंडी गोलाकार पांढऱ्या रंगाची असून, कोवळ्या पानाच्या खालील बाजूला तपकिरी रंगाच्या पुंजक्यात समूहाने आढळतात. २) अळी अवस्था (१४-२० दिवस) ः अंड्यातून लहान काळपट अळ्या बाहेर पडतात. त्या रात्रीच्या वेळी कोवळी पाने, शेंडे, रसाळ कोवळे खोड, फुले, फळे खाऊन लक्षणीय नुकसान करते. ३) कोष अवस्था ( ९ ते १२ दिवस) ः पूर्ण वाढ झालेली अळी मातीच्या वेष्टनात किंवा पाला-पाचोळ्यात कोषावस्थेत जाते. कोष लालसर रंगाचा असतो. ४) प्रौढ अवस्था ः कोषातून बाहेर पडल्यानंतर २ ते ४ दिवसांनी नर-मादी पतंग मिलनास सज्ज होतात. एक मादी तिच्या संपूर्ण आयुष्याक्रमात २०० ते ३५० अंडी देते. या किडीचा एकूण आयुष्यक्रम ३०-४० दिवसांचा असतो. रसशोषक किडी ः मिरचीवर मावा, फुलकिडे, पांढरी माशी आणि कोळी या रसशोषक किडींचा प्रामुख्याने प्रादुर्भाव दिसून येतो. सध्याच्या स्थितीमध्ये फुलकिड्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. फुलकिडे ः १) एक मिमीपेक्षा लहान आणि निमुळते लांबट आकार, पंखविरहित, रंग फिक्कट पिवळे किंवा करडा असतो. २) किडीची मादी संपूर्ण आयुष्यक्रमामध्ये सरासरी ३०-३५ अंडी घालते. अंडी अवस्था (चार ते पाच दिवस), पिल्लावस्था (८ ते १० दिवस) असून, पूर्ण वाढलेले फुलकीडे १०-१५ दिवस जगतात. कोषावस्था आभासी प्रकारची असून, ३ ते ५ दिवसांची असते. नुकसानः १) पानाच्या खालचा भाग खरवडल्यानंतर स्त्रवणाऱ्या रसाचे फुलकिडे शोषण करतात. कीडग्रस्त पाने वरच्या बाजूस मुरडली जातात व पानांचा आकार द्रोणासारखा दिसतो. २) किडीचा प्रादुर्भाव पीक रोप अवस्थेत असतानाच सुरू होऊन परिपक्व होईपर्यंत राहतो. ३) प्रादुर्भाव सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात आढळतो. ४) फुलकिड्यांचा तीव्र प्रादुर्भावामध्ये झाडाची पाने चुरडली जात असल्याने त्याला चुरडा मुरडा या नावानेही ओळखले जाते. अशा झाडास मिरच्यांचे प्रमाण कमी असते. झाडाची वाढही खुंटते. नियंत्रण उपाय ः १) किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपेक्षा अधिक आढळल्यास ः फवारणी प्रतिलिटर पाणी (टीप ः कंसामध्ये कीटकनाशकाचा प्रतीक्षा कालावधी दिला आहे.) फुलकिडे ः ॲसिटामाप्रिड (२०% एस.पी.) ०.१५ ग्रॅम (३ दिवस) किंवा थायाक्लोप्रीड (२१.७ % एस.सी.) ०.४५ मिलि (७ दिवस) फुलकिडे, मावा ः स्पायरोटेट्रामेट (१५.३१ % ओ.डी.) ०.८ मिलि (५ दिवस) मावा, तुडतुडे, फुलकिडे ः इमिडाक्लोप्रीड (१७.८% एस.एल.)०.२५ मिलि (४० दिवस) मावा, पांढरीमाशी ः पायरोप्रोक्झिफेन (१०% इ.सी.)१.६ मिलि (७ दिवस) मावा, कोळीः क्विनॉलफॉस (२५% इ.सी.) २ मिलि कोळीः डायमिथोएट (३० % इ.सी.) १.८ मिलि किंवा प्रोपरगाईट (५७% इ.सी.) २.४ मिलि (७ दिवस) पिवळे कोळीः

  • बुप्रोफेझिन (२५% एस.सी.) ०.६ ते०.८ ग्रॅम (५ दिवस) किंवा
  • फेनपायरॉक्झिमेट (५% इ.सी.) १ ते १.२ मिलि (७ दिवस) किंवा
  • स्पायरोमेसिफेन (२२.९% एस.सी.) ०.५३ ते ०.८ मिलि (७ दिवस) किंवा
  • मिल्बेमेक्टिन (१% इ.सी.)०.६५ मिलि (७ दिवस)
  • फळ पोखरणारी अळीः

  • इंडोक्झाकार्ब (१४.५ % एस.सी.) ०.६६ ते १.१ मिलि (५ दिवस) किंवा
  • थायोडीकार्ब (७५% डब्ल्यू.पी.) २ ग्रॅम (६ दिवस) किंवा
  • फ्लूबेंडीअमाईड (२०% डब्ल्यू.जी.) ०.५ ग्रॅम (५ दिवस) किंवा
  • फ्लूबेंडीअमाईड (३९.३५% एस.सी.) ०.२५ मिलि (७ दिवस) किंवा
  • क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ % एस.सी.) ०.३ मिलि (३ दिवस)
  • फुलकिडे, फळ पोखरणारी अळीः

  • स्पीनोसॅड(४५% एस.सी.) ०.३२ मिलि (३ दिवस) किंवा
  • इमामेक्टिन बेंझोएट (१.५%) अधिक फिप्रोनील (३.५% एस.सी.) (संयुक्त कीटकनाशक) १ ते १.५ मिलि (२ दिवस) किंवा
  • फ्लूबेंडीअमाईड (१९.९२%) अधिक थायाक्लोप्रीड (१९.९२%) (संयुक्त कीटकनाशक) ०.५ मिलि (५ दिवस) किंवा
  • इंडोक्झाकार्ब (१४.५%) अधिक अॅसिटामिप्रीड (७.७% एस.सी.) १ मिलि (५ दिवस) किंवा
  • थायामिथोक्झाम (१२.६%) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रिन (९.५% झेड.सी.) ०.३ मिलि (३ दिवस)
  • फुलकिडे व कोळी ः इथिऑन (५० % इ.सी.) २ मिलि (५ दिवस) फुलकिडे, पांढरीमाशी व कोळी ः फेनप्रोपॅथ्रिन (३०% इ.सी.) ०.३३ मिलि (७ दिवस) फळ पोखरणारी अळी, पांढरीमाशी ः पायरीप्रोक्झिफेन (५%) अधिक फेनप्रोपॅथ्रिन (१५% इ.सी.) (संयुक्त कीटकनाशक) १ मिलि (७ दिवस) फुलकिडे, फळ पोखरणारी अळी व मावाः फिप्रोनील (५% एस.सी.) २ मिलि (७ दिवस) फुलकिडे, फळ पोखरणारी अळी, कोळी ः

  • लॅम्बडा सायहॅलोथ्रिन (५ % इ.सी.) ०.७५ मिलि (५ दिवस) किंवा
  • इमामेक्टिन बेंझोएट (५% एस.जी.) ०.४ ग्रॅम (३ दिवस) किंवा
  • प्रोफेनोफॉस (४०%) अधिक फेनपायरॉक्झिमेट (२.५% इ.सी.) २ मिलि (७ दिवस)
  • फुलकिडे, फळ पोखरणारी अळी व लष्करी अळी ः

  • स्पिनेटोरम (११.७ % एस.सी.) १ मिलि (७ दिवस) किंवा
  • सीन्ट्रानिलीप्रोल (१०.२६ % ओ.डी.) १.२ मिलि (३ दिवस)
  • टीप ः १) पहिल्या फवारणीनंतर आवश्यकतेनुसार १० दिवसांचे अंतराने पुढील फवारणी कीटकनाशक बदलून घ्यावी. २) फवारणीनंतर किमान १० ते १२ दिवस मिरची खाण्यासाठी वापरू नये. संपर्क ः डॉ. प्रमोद मगर, ७७५७०८१८८५ ( कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com