agricultural stories in Marathi, agrowon, pest management inchilly nursary | Agrowon

मिरची रोपवाटिकेतील पीक संरक्षण

डॉ. प्रमोद मगर, डॉ. सुरेश नेमाडे
गुरुवार, 7 फेब्रुवारी 2019

सध्या अनेक ठिकाणी रोपवाटिका ते फळे लागण्याच्या स्थितीमध्ये मिरची पिके शेतात दिसून येत आहेत. रोपवाटिका व पिकाच्या सुरवातीच्या स्थितीमध्ये मर रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवतो. त्यांच्या नियंत्रणासाठी रोपवाटिकेपासूनच उपाययोजना कराव्यात.

सध्या अनेक ठिकाणी रोपवाटिका ते फळे लागण्याच्या स्थितीमध्ये मिरची पिके शेतात दिसून येत आहेत. रोपवाटिका व पिकाच्या सुरवातीच्या स्थितीमध्ये मर रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवतो. त्यांच्या नियंत्रणासाठी रोपवाटिकेपासूनच उपाययोजना कराव्यात.

 • रोपवाटिकेत मिरची लागवड करण्यापूर्वी बीज
 • प्रक्रिया करावी. त्यात मर रोग (डंपिग ऑफ) व अन्य बुरशीजन्य रोगापासून संरक्षणासाठी सर्वप्रथम शिफारशीत रासायनिक बुरशीनाशकाची, त्यानंतर मावा, तुडतुडे, फुलकिडे या रसशोषक किडीपासून संरक्षणासाठी रासायनिक कीटकनाशकाची आणि सर्वांत शेवटी जैविक घटकांची बिजप्रक्रिया करावी.

काळजी

 • बीजप्रक्रिया थंड ठिकाणी सावलीमध्ये करावी.
 • सर्व बियाण्यास बीजप्रक्रियेचा घटक एकसमान लावून सावलीतच सुकवावे. नंतर पेरणी करावी.
 • रोपवाटिकेत पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत.
 • मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतणाऱ्या भागामध्ये ज्या शेतकऱ्यांनी ट्रायकोडर्मा या घटकाची बीजप्रक्रिया न करताचे पेरणी केली असल्यास, गादीवाफ्यावर ट्रायकोडर्मा व्हीरिडी ५ किलो प्रति हेक्टर  या प्रमाणे  १५० किलो शेणखतामध्ये मिसळून जमिनीतून द्यावे.  
 • बीजप्रक्रिया किंवा जमिनीतून कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाचा वापर केलेला नसल्यास, लागवडीनंतर १५ दिवसाने आवश्यकतेनुसार, फवारणी प्रति लिटर पाणी
  डायमिथोएट (३० टक्के ई.सी.) २ मिलि किंवा इथिऑन (५० टक्के ई.सी.) २.५ मिलि किंवा इमिडाक्लोप्रीड (१७.८ एस.एल.) ०.५ मिलि अधिक मॅन्कोझेब (७५ टक्के) ३ ग्रॅम.

बीजप्रक्रिया (केंद्रीय कीटकनाशक मंडळ, फरिदाबाद शिफारशीनुसार)   

 

प्रकार   घटकाचे नाव  प्रमाण (प्रतिकिलो)    रोग किंवा कीड संरक्षण
बुरशीनाशक  मेटॅलॅक्झिल एम (३१.८ टक्के ई.एस.) २ मिलि  मर  रोग
बुरशीनाशक   कॅप्टन (७५ टक्के डब्लू.पी.) (ड्रेचिंगद्वारे)  २० ते ३० ग्रॅम मर रोग
कीटकनाशक  इमिडाक्लोप्रिड (७० टक्के डब्लूएस) १० ते १५ ग्रॅम  मावा, तुडतुडे, फुलकिडे
कीटकनाशक  थायामेथोक्झाम (३० टक्के एफएस)     ७ मिलि फुलकिडे
जैविक घटक सुडोमोनास फ्ल्युरोसन्स (०.५ टक्के डब्ल्यू. पी.) (TNAU Strain)  १० ग्रॅम  मर रोग
  जैविक बुरशीनाशक   ट्रायकोडर्मा व्हीरिडी (१ टक्के डब्ल्यू. पी.) ८ ग्रॅम   मर रोग
जैविक बुरशीनाशक  ट्रायकोडर्मा व्हीरिडी (१ टक्के डब्ल्यू. पी.) (TNAU Strain)    ४ ग्रॅम   मर रोग
जैविक बुरशीनाशक  ट्रायकोडर्मा व्हीरिडी (५ टक्के एस.सी.) २ मिलि मर रोग

 

   
लागवडीवेळी रोप प्रक्रिया   

 • मिरचीचे रोपे लागवड करण्यापूर्वी
 • डायमिथोएट (३० टक्के ई.सी.) २ मिलि किंवा इथिऑन (५० टक्के ई.सी.) २ मिलि किंवा इमिडाक्लोप्रीड (१७.८ एस.एल.) ०.५ मिलि या पैकी एका कीटकनाशकासोबत मिसळून
 • मॅन्कोझेब (७५ टक्के डब्ल्यू.पी.) ३ ग्रॅम किंवा कॅप्टन (५० टक्के डब्ल्यू.जी.) ३ ग्रॅम या पैकी एक बुरशीनाशकांची प्रति लिटर पाणी या प्रमाणे मिसळलेल्या द्रावणामध्ये रोपाचे शेंडे ५ मिनिटे बुडवून घ्यावेत.
 • त्यानंतर त्याच रोपांची मुळे ५ मिनिटांकरिता ०.५ ते १ टक्के ट्रायकोडर्मा द्रावणात बुडवून नंतर शेतात लागवड करावी.
 • रोप लागवडी पश्चात पीक संरक्षण
 • शेत तणमुक्त ठेवून किडींच्या पर्यायी खाद्य वनस्पतींचा नाश करावा.
 • शेतात झेंडू, मका यासारखी सापळा पिकांची लागवड करावी. मिरची पिकामध्ये कांदा आंतरपिक किंवा मिश्र पीक टाळावे. ज्वारीच्या पिकानंतर मिरचीचे पीक घेणे टाळावे.
 • नत्रयुक्त व इतर खतांचा अवाजवी वापर करू नये.
 • सुरवातीच्या काळात फळ पोखरणार्‍या अळ्या व लष्करी अळ्या दिसताच वेचून रॉकेल मिश्रीत पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा.
 • रस शोषक किडीच्या नियंत्रणाकरिता पिकाच्या समकक्ष उंचीवर ३० x ४० सेंमी आकाराचे ४० पिवळे किंवा निळे चिकट सापळे प्रतिएकर क्षेत्रावर लावून त्यावर चिकट पदार्थ म्हणून एरंडी तेल किंवा पांढरे ग्रीस लावावे. (फुलकिडे निळ्या रंगाकडेसुद्धा जास्त प्रमाणात आकर्षित होतात.)
 • फळ पोखरणाऱ्या अळी  व लष्करी अळींचे सर्वेक्षणासाठी प्रती हेक्टर १० कामगंध सापळे पिकापेक्षा दीड फूट जास्त उंचीवर लावावेत. त्यातील प्रलोभने कालावधीनंतर त्वरीत बदलावीत.
 • कामगंध सापळ्यात नर पतंग आढळून येताच, ट्रायकोग्रामा चिलोणीस परोपजीवी मित्रकीटकाची ६०,००० अंडी (३ ट्रायकोकार्ड) तीन ते चार वेळा प्रतिएकर शेतात १० दिवसांच्या अंतराने सोडावीत.
 • रस शोषक किडींच्या जैविक व्यवस्थापणाकरिता लेडी बर्ड बीटल (ढाल कीटक)चे संवर्धन करावे.
 • कीड व रोगांचे नियमित निरीक्षण करावे. किडींची आर्थिक नुकसान पातळी जाणून घ्यावी.  
 • प्राथमिक स्वरूपाचा किडींचा प्रादुर्भाव आढळल्यास सर्वप्रथम ५ टक्के निंबोळी अर्कची फवारणी करावी. मावा व फुलकिडीचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लागवडीनंतर एका आठवड्याने, कार्बोफ्युरॉन (३ टक्के दाणेदार) ३३ किलो प्रतिहेक्टर याप्रमाणे जमिनीतून रिंग पद्धतीने द्यावे.
 • मिरची वरील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी, बॅसिलस थुरीनजिएंसिस प्रकार गॅलरी (विशिष्ठ उपजाती-१५९३ M sero type H ५९ ५b) (१.३ टक्के एफ. एस.) हे जैविक कीटकनाशक १.५ ते २ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

 संपर्क : डॉ. प्रमोद मगर, ७७५७०८१८८५
(डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाअंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ)


इतर मसाला पिके
हळद पिकातील प्रमुख रोगांचे नियंत्रणस ध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
हळद पिकातील प्रमुख रोगांचे नियंत्रणसध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
हळदीवरील पाने खाणारी, गुंडाळणारी अळी...सध्या हळद पिकाची शाकीय वाढ होण्याचा कालावधी आहे....
हळद पिकातील प्रमुख किडीचे नियंत्रणसध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
सुधारित पद्धतीने हळद लागवडीचे नियोजनठिबक सिंचनासारख्या आधुनिक सिंचन सुविधा उपलब्ध...
हळदीचे अपेक्षित उत्पादनासाठी सुधारित...हळद लागवडीसाठी मध्यम प्रतीची, काळी, पाण्याचा...
हळद पिकांसाठी बेणे निवड महत्त्वाची   पूर्वमशागतीनंतर पाण्याच्या...
हळद लागवडीची पूर्वतयारीहळद लागवडीसाठी योग्य जमिनीची, बेण्याची निवड ही...
हळदीपासून मूल्यवर्धीत पदार्थांची...हळद ही अन्नपचन, पित्तशामक व रक्तशुद्धी करणारी आहे...
साठवण हळद बेण्याची ...जेठा गड्डा, बगल गड्डा, आणि हळकुंडे लागवडीसाठी...
मिरचीवरील किडींचा प्रादुर्भाव ओळखा,...मिरची पिकावर प्रादुर्भाव करणाऱ्या किडींमध्ये कळी-...
मिरची रोपवाटिकेतील पीक संरक्षणसध्या अनेक ठिकाणी रोपवाटिका ते फळे लागण्याच्या...
हळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाचीलोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी...
हळद शिजविण्यासाठी वापरा बॉयलरकाढणीनंतर हळदीवर ४ ते ५ दिवसांमध्येच शिजविण्याची...
सुधारित पद्धतीने हळदीची काढणीहळद काढणी अगोदर १५ ते ३० दिवस पाणी देणे बंद करावे...
योग्य वेळी करा मिरीची काढणीमिरी घोसामधील एक ते दोन मणी पिवळे अगर नारंगी...
योग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...
हळदीवरील रोगांचे नियंत्रण व्यवस्थापन हळदीचे गड्डे तयार होण्याची ही योग्य वेळ आहे. जर...
हळदीवरील किडीचे करा वेळीच नियंत्रण हळदीचे गड्डे तयार होण्याची ही योग्य वेळ आहे. जर...
मसाला पिकांना द्या पुरेसे पाणीमसाला पिकांना पाण्याचा ताण सहन होत नाही, हे...