कुक्कुटपालन सल्ला

कुक्कुटपालन सल्ला
कुक्कुटपालन सल्ला
  • कोंबड्यांना पावसाळ्यातील वातावरणामुळे विविध आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी त्यांना लसीकरण करावे.
  • पोल्ट्री शेडच्या परिसरात स्वच्छता ठेवावी. पावसाचे पाणी साचून दलदल होणार नाही याची काळजी घ्यावी. पावसाचे पाणी सहजपणे वाहून जाण्यासाठी शेडच्या आजूबाजूला चर खोदावी.
  • शेडला प्लॅस्टिकचे पडदे वापरावेत. पडदे शेडच्या पायापासून ते दीड फूट अंतर सोडून बाजूच्या लोखंडी जाळीला दोरीने मजबूत बांधलेले असावेत.
  • पडद्यांची उघडझाप पावसाप्रमाणे करावी, जेणेकरून दिवसा पाऊस नसेल आणि सूर्यप्रकाश असेल तेव्हा पडदे उघडावेत. यामुळे शेडमधील वरील बाजूने शेडमध्ये हवा खेळती राहून वातावरण चांगले राहते.
  • ओल्या गादीमुळे शेडमधील वातावरण दूषित होते. त्याचप्रमाणे ओलसर गादीमध्ये रोगजंतूंची वाढ झपाट्याने होते, अशावेळी कोंबड्या विविध रोगास बळी पडण्याची शक्यता असते.
  • जास्त प्रमाणात ओल्या झालेल्या गादीचा तेवढाच भाग काढून टाकावा, त्या ठिकाणी नवीन गादी टाकावी.
  • गादीमधील आर्द्रतेचे प्रमाण कमी असावे. जास्त झाल्यास तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार गादीमध्ये चुना मिसळावा.
  • शेडमध्ये माश्यांचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • कोंबडी खाद्य तपासून घ्यावे. खाद्य ठेवण्याची जागा स्वच्छ व कोरडी असावी, तसेच खराब झालेले कोंबडी खाद्य कोंबड्यांना देऊ नये.
  • कोंबड्यांना स्वच्छ पाणी पुरवावे. पाण्यात तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार जंतुनाशके योग्य प्रमाणात मिसळावीत.
  • लोखंडी पाण्याची टाकी असल्यास ती गंजू नये म्हणून तिला आतून रेड ऑक्साइड लावून घ्यावे. तसेच सिमेंटची टाकी असल्यास तिला चुना लावून घ्यावा जेणेकरून टाकीमध्ये शेवाळ वाढणार नाही.
  • शेडमध्ये हवा नेहमी खेळती राहील याची दक्षता घ्यावी. जवळपास ३० फूट रुंदी असलेल्या शेडमध्ये हवा व्यवस्थितपणे खेळती राहते तसेच योग्य प्रमाणात सूर्यप्रकाशही पोचतो.
  • नवीन शेडची उभारणी करताना...

  • शेडची उभारणी बाहेरील जमीन सपाटीपेक्षा १-२ फूट उंच करावी, जेणेकरून पावसाळ्यात बाहेरील पाणी शेडमध्ये येणार नाही.
  • शेडच्या रुंदीच्या बाजूने छपरापर्यंत उंच भिंती बांधाव्यात. त्या भिंतीत सहा फूट उंचीचे व तीन फूट रुंदीचे दरवाजे ठेवावेत.
  • शेडच्या लांबीच्या बाजूने १-२ फूट उंचीच्या विटांच्या भिंती बांधाव्यात. त्यावर ६-७ फूट उंचीची जाळी बसवावी जेणेकरून हवा खेळती राहील आणि पक्षी घरात मोकळा सूर्यप्रकाश राहील.
  • लांबीच्या दोन्ही बाजूस समान अंतरावर आठ फूट उंचीचे लोखंडी अथवा कॉंक्रिटचे खांब उभे करावेत.
  • दोन्ही बाजूंस छताचा पत्रा साधारणपणे ३-३ ते १/२ फूट बाहेर काढावा, जेणेकरून शेडमध्ये येणारा पाऊस अडवला जाईल.
  • शेडच्या मध्य भागाची उंची १२-१५ फूट व बाजूची उंची ७-८ फूट ठेवल्यास पक्षिघराच्या छतास योग्य ढाळ (उतार) मिळून पावसाचे पाणी पटकन ओघळून जाते.
  • संपर्क ः अजय गवळी, ८००७४४१७०२ (के. के. वाघ कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com