agricultural stories in Marathi, agrowon, rabbi jowar plantation | Page 2 ||| Agrowon

नियोजन रब्बी ज्वारी लागवडीचे...

डॉ. विजय अमृतसागर, डॉ. निळकंठ मोरे
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

रब्बी ज्वारी लागवडीसाठी मूलस्थानी जलसंधारण केल्यानंतर उताराला आडवी मशागत करून जमिनीतील चांगल्या ओलाव्यावर पेरणी करावी. जमिनीच्या खोली व प्रकारानुसार रब्बी ज्वारीच्या जातींची निवड करावी. माती परिक्षणानुसार रासायनिक खतांची मात्रा द्यावी.

रब्बी ज्वारी लागवडीसाठी मूलस्थानी जलसंधारण केल्यानंतर उताराला आडवी मशागत करून जमिनीतील चांगल्या ओलाव्यावर पेरणी करावी. जमिनीच्या खोली व प्रकारानुसार रब्बी ज्वारीच्या जातींची निवड करावी. माती परिक्षणानुसार रासायनिक खतांची मात्रा द्यावी.

  • रब्बी ज्वारीचे चांगले उत्पादन घेण्यासाठी कोरडवाहू तंत्रज्ञान व नवीन जातींचा जाणीवपूर्वक वापर केल्यास उत्पादनात २०-२५ टक्‍क्‍यांनी वाढ होते.
  • रब्बी ज्वारीसाठी मूलस्थानी जलसंधारण केल्यानंतर उताराला आडवी मशागत करून जमिनीतील चांगल्या ओलाव्यावर पेरणी करावी.
  • जमिनीच्या खोली व प्रकारानुसार रब्बी ज्वारीच्या जातींची निवड करावी. उदा. हलक्‍या जमिनीसाठी अनुराधा, मध्यम जमिनीसाठी फुले चित्रा, फुले सुचित्रा, परभणी मोती व मालदांडी ३५-१ तसेच भारी जमिनीसाठी फुले वसुधा, फुले यशोदा, पी के व्ही क्रांती, परभणी मोती या जातींची निवड करावी.
  • बागायती ज्वारीसाठी फुले रेवती, फुले वसुधा आणि हुरड्यासाठी फुले मधुर या जातींची लागवड करावी.
  • पेरणीपूर्वी एक किलो बियाण्यास ४ ग्रॅम गंधक, २५ ग्रॅम ॲझोटोबॅक्‍टर आणि २५ ग्रॅम पीएसबी या जीवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी. म्हणजे उगवण चांगली होऊन जोमदार पीक येते.
  • पेरणीच्या वेळी ५० किलो नत्र,२५ किलो पालाश, २५ किलो पालाश प्रतिहेक्‍टरी पेरून द्यावेत.
  • जमिनीतील ओलावा जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी पेरणीनंतर एक निंदणी करून तिसऱ्या, पाचव्या व आठव्या आठवड्यात कोळपणी करावी. त्यामुळे ताटांना माती लागते आणि बाष्पीभवन कमी होण्याबरोबरच ताटे पडत नाहीत व खडखड्या रोगाचे नियंत्रणही करता येते.
  • कोरडवाहू ज्वारी फुलोऱ्यात असताना एखादे संरक्षित पाणी दिल्यास उत्पन्नात ३० ते ३५ टक्‍क्‍यांनी वाढ मिळते.
  • बागायती रब्बी ज्वारीसाठी पाणी व्यवस्थापन करताना २८ ते ३० दिवसांनी पहिले पाणी, पीक पोटरी पडून फुलोऱ्यात असताना (७०-७५) दुसरे पाणी आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत (९०-९५) तिसरे पाणी द्यावे.

संपर्क ःडॉ. विजय अमृतसागर, ९४२१५५८८६७
(विभागीय कृषी संशोधन केंद्र, सोलापूर.)
 


इतर तृणधान्ये
भात पिकासाठी सुधारित लागवड व्यवस्थापनभारतातील प्रमुख अन्नधान्याखालील पिकक्षेत्रापैकी...
धान्य, चाऱ्यासाठी बाजरीबाजरी हे पीक पाण्याच्या ताणाला सहनशील आणि...
भरघोस मका उत्पादनासाठी सुधारीत पद्धतीमहाराष्ट्रात रब्बी हंगामापेक्षा खरीप हंगामात मका...
तंत्र खरीप ज्वारी लागवडीचे..पेरणी १५ जून ते १० जूलै दरम्यान करावी. पेरणीसाठी...
साठवणूकीतील कीडी रोखण्यासाठी उपाययोजनाशेतीमालाच्या साठवणुकीच्या किफायतशीर आणि...
बाजरी मूल्यवर्धनातून वाढवा नफाबाजरीच्या पिठाचा वापर इतर पिठात मिसळून केल्यास...
आरोग्यदायी नाचणीनाचणीमध्ये कॅल्शियमबरोबरीने लोह, नायसीन, थायामीन...
असे करा ज्वारीवरील खोडकिडीचे नियंत्रण..ज्वारी हे मानवी खाद्य आणि पशुखाद्यासाठी कडबा अशा...
असे करा गव्हावरील तांबेरा रोगाचे...गहू पिकाचा हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटून गेले...
असे करा ज्वारी, गव्हावरील खोडमाशीचे...रब्बी हंगामातील ज्वारी व गहू पिकावर खोडमाशीचा...
कृषी सल्ला : तूर, हरभरा, ज्वारी, कांदा...तूर शेंगा पक्वतेची अवस्था शेंग माशी, घाटे अळी...
असे करा गहू पिकावरील खोडमाशी व मावा...गहू पिकात बुटक्या आणि मध्यम बुटक्या वाणांचा...
उशिरा गहू पेरणीसाठी जाती व नियोजनया वर्षी परतीच्या पावसाने अधिक काळ मुक्काम...
नियोजन गव्हाच्या उशिरा पेरणीचे बागायत उशिरा पेरणीची शिफारस १६ नोव्हेंबर ते १५...
गहू पिकावरील किडींचे वेळीच करा नियंत्रणगहू पिकांच्या उत्पादनात घट येण्यामध्ये किडींचा...
आहारात असावी आरोग्यदायी बाजरीगहू खाण्याचे प्रमाण वाढत गेल्याने ज्वारी, बाजरी,...
मित्रबुरशींच्या संवर्धनातून लष्करी...सध्या राज्याच्या विविध भागात अनुकूल हवामानामुळे...
पेरणी पद्धतीने भात लागवडभाताची लागवड १५ जुलै पर्यंत पूर्ण करावी. दोन...
ज्वारी वाणाची विविधता : मूल्यवर्धनातून...कित्येक वर्षांपासून शेतकऱ्यांनी ज्वारीचे विविध...
मका लागवड तंत्रज्ञानपेरणी     खरीप हंगाम ः १५...