agricultural stories in Marathi, agrowon smart organic farmer, Shyamsundar Jaugude, kelwade, dist. pune | Agrowon

AGROWON_AWARDS : देशी, परदेशी ३० भाज्यांसह फळांची बहरली सेंद्रिय शेती

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 मे 2019

ॲग्रोवन स्मार्ट सेंद्रिय शेती पुरस्कार
शेतकरी - श्‍यामसुंदर जायगुडे
केळवडे, ता. भोर, जि. पुणे

ॲग्रोवन स्मार्ट सेंद्रिय शेती पुरस्कार
शेतकरी - श्‍यामसुंदर जायगुडे
केळवडे, ता. भोर, जि. पुणे

केळवडे (जि. पुणे) येथील शेतकरी श्यामसुंदर जायगुडे यांनी शंभर टक्के सेंद्रिय शेती करत, त्यापासून उत्पादीत सेंद्रिय उत्पादनांची विक्री यांची सांगड घातली आहे. शेतीमध्ये ३० प्रकारच्या देशी परदेशी भाज्या, फळझाडांची लागवड असून, बांधावरील शेतीच्या माध्यमातून शेतीबरोबरच उत्पन्नांमध्येही शाश्वतता आणली आहे.

पुणे जिल्ह्यातील केळवडे (ता. भोर) येथील श्‍यामसुंदर जायगुडे हे शंभर टक्के सेंद्रिय पद्धतीने शेती करणारे शेतकरी आहे. त्यांच्याकडे हंगामानुसार सुमारे ३० प्रकारच्या देशी आणि परदेशी भाजीपाल्याची लागवड असते. जवळच असलेल्या पुणे आणि मुंबई बाजारपेठेचा अभ्यास करून लागवड आणि विक्रीचे नियोजन त्यांनी साधले आहे. अनेक वर्षांपासून भाज्यांची विक्रीसाठी पाच कंपन्यांसोबत करार केला असल्याने त्यातून दराची शाश्वती मिळाली आहे. पाच एकरमध्ये फळबाग लागवड करताना चिकू आणि लाल गराचे पेरू यांना प्राधान्य दिले आहे.

जायगुडे यांचे शेतीतील प्रयोग

 • एकूण एकत्रित कुटुंबाची शेती- २७ एकर. (दोन ठिकाणी शेती)
 • यातील १३ एकर- शंभर टक्के सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला- वर्षभर किमान ३० प्रकारचा भाजीपाला
 • उदा. पालक, शेपू, कांदा व लसूण (पातीसाठी), कढीपत्ता, बटाटा, गाजर, बीट, कारले, दोडके, दुधी भोपळा, घोसावळे, पडवळ, वांगी, टोमॅटो
 • दोन एकर- परदेशी (एक्सॉटिक) भाजीपाला. उदा. ब्रोकोली, आइसबर्ग, रेड कोबी, चायना कोबी, सेलरी, पार्सेली, लीक, लेट्यूस, चेरी टोमॅटो, पॅशन फ्रूट (मंडपावर), अमेरिकन बीन्स
 • संपूर्ण उत्पादनासाठी पाच कंपन्यांसोबत करार शेती- त्यामुळे दर बांधलेले.
 • प्रत्येक पिकातून किती उत्पन्न मिळाले पाहिजे, याचे आडाखे ठरवले असून, त्यानुसार नियोजन केले जाते.

नावीन्यतेचा ध्यास

 • पाच एकरांत कालीपत्ती चिकू १६०, लाल गराच्या पेरूची सघन पद्धतीने ४५० झाडे
 • फळबागेत भाज्यांचे आंतरपीक घेत असल्याने उत्पन्न सुरू राहते.
 • सांबर ओनियनसह मसाल्याच्या रोपांचीही लागवड केली आहे.

विक्रीसाठी विविध पद्धतीचा अवलंब ः

पाच कंपन्यांसोबत करार शेती केली असून, परदेशी भाज्यांची विक्री हंगामानुसार ठरलेल्या दरांनी केली जाते. त्याच गावातील कृषी भरारी शेतकरी बचत गटामार्फत आठवडी बाजारात स्टॉल लावतात. पुणे शहरातील निवासी सोसायटीत सेंद्रिय माल विक्रीसाठी मुलांसोबत प्रयोग राबवले आहे. यातून सेंद्रिय उत्पादनाच्या विक्रीसाठी सातत्याने कार्यरत.

तांत्रिक वैशिष्ट्ये

 • संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने शेतीचे नियोजन.
 • दरवर्षी रोटाव्हेटरने कमीत कमी मशागत. पालापाचोळा, पिकांचे अवशेष बारीक करून गाडले जातात.
 • बागेत झाडाखाली खड्डा तयार करून दरवर्षी पाच ते सहा टनांपर्यंत गांडूळ खतनिर्मिती. गांडूळ कल्चरचे अनेक शेतकऱ्यांना मोफत वाटप.
 • किडींच्या नियंत्रणासाठी मिश्रपीक पद्धती, चिकट सापळे, गंधसापळे, जैविक कीडनाशकांचा वापर. शेतात मित्रकीटकांची संख्या वाढविण्यावर भर असतो.
 • गरजेपुरते ठिबक केले असून, मातीच्या कणातील प्रत्येक जिवाणूंसाठीही पाणी आवश्यक असल्याचे त्यांचे मत. शेतीचा प्रत्येक भाग जिवंत राहण्यासाठी शेणस्लरी सोडली जाते.

बांधावरही खजाना

 • जायगुडे यांच्या शेतीचे बांध हे आकाराने मोठे आणि बहुविविधतेने नटलेले आहेत.
 • शेवगा- १५० झाडे. बांधीव दर- ८० रुपये प्रतिकिलो. पाल्याची विक्रीही यंदा आयुर्वेदिक कंपनीला ८० रुपये प्रतिकिलो दराने केली.
 • लिची- पाच झाडे. प्रतिवर्ष २२ ते ३५ किलो फळे- २५० ते ३०० रु. प्रतिकिलो दर मिळतो.
 • बहाडोली जांभूळ- प्रतिझाड १५० ते ३०० किलो उत्पादन- १२० रुपये प्रतिकिलो दर.
 • नरेंद्र सात आवळा- ६५ झाडे- ६० रुपये प्रतिकिलो दर. राय आवळ्याची ८ झाडे. खाण्यासाठी मोठी मागणी
 • अॅव्हाकॅडोची ९० झाडे. उत्पादन सुरू झाले आहे.
 • आकाराने मोठी, सीडलेस थाय लेमनची (लिंबू) ५२ झाडे. सोळाव्या महिन्यातच प्रतिझाड ८ ते १० किलो फळे मिळण्यास सुरवात. किलोला ८० रु. दर.
 • आंब्याची १० झाडे. त्यातील एक श्रावण कैरीचे. त्याला श्रावणात फळे येतात. सातशे ते एक हजार ग्रॅम वजनाच्या फळांना गेल्या वर्षी शंभर रुपये प्रतिकिलो दर मिळाला.
 • नदीकिनारी शेतीत मेसी बांबूची आठ बेटे. प्रतिबेटातून दरवर्षी ५० ते ६० बांबू मिळतात. प्रतिबांबू शंभर रु. दर. पिवळ्या शोभेच्या प्रतिबांबूस १८० ते २०० रुपये दर. मात्र, मागणी थोडी कमी.
 • बांधावरील शेतीचेच चांगले उत्पन्न हाती येते. महत्त्वाचे म्हणजे बांधावरील झाडांमुळे शेताच्या आतील तापमान स्थिर राहते. पक्ष्यांची संख्या वाढते. त्याचा पीक संरक्षणात फायदा होतो.

पुरस्कार

 • महाराष्ट्र शासनाच्या प्रगतिशील शेतकरी पुरस्कार २०१३, नॅशनल इनिशेटिव्ह ऑन क्लायमेट रिसायलेंट ॲग्रीकल्चर यांचा स्मार्ट फार्मर पुरस्कार २०१४, बळिराजा शेतकरी संघाचा राज्यस्तरीय बळीरत्न पुरस्कार २०१६, बारामती येथील केव्हिकेचा प्रयोगशील शेतकरी पुरस्कार २०१७ असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
 • कुटुंबीयांसह बंधू ॲड. माणिकराव आणि बहीण मंदाताई पांगारे यांची शेतीमध्ये मार्गदर्शनासह मोलाची मदत होते.

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
व्यवसाय स्वातंत्र्यावर गदा नकोचशेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याबाबतची एक चळवळ...
क्रयशक्ती वाढविणारा हवा अर्थसंकल्पकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण १ फेब्रुवारी...
कमी फॅटचे दुध पिल्यास म्हतारपण कमी होतं...कमी फॅट(मेद)युक्त दुधाचा आहारामध्ये वापर केल्यास...
विदर्भ, कोकणात आज हलक्या पावसाचा अंदाज पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांअभावी राज्यात थंडी...
नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीत ५७...नाशिक : राज्यातून होणाऱ्या द्राक्ष निर्यातीत...
दूध उत्पादक महत्त्वाचा दुवा: हरिभाऊ...औरंगाबाद : जिल्हा दूध संघाच्या एकूणच...
अर्जेंटिनाला होणार आंबा निर्यात पुणे : कोकणातील हापूस आणि मराठवाड्यातील केशर...
गावरान अळूची फायदेशीर व्यावसायिक शेतीसुमारे पंधरा गुंठ्यांत देशी गावरान अळूची शेती...
व्यवस्थापनाला मार्केटिंगची जोड देत...पॅालिहाउसमधील फूलशेतीसाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेले...
‘पोकरा’ प्रकल्पात कृषी यांत्रिकीकरणाचे...अकोला  ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
पोपटराव पवार, राहिबाई पोपेरे यांना...नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून शनिवारी (ता. २५)...
कोयना धरणाच्या पोटात होणार आणखी एक धरणकोयनानगर, जि. सातारा ः येथील कोयना धरणाची...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत केवळ १४...औरंगाबाद : संकटांशी दोन हात करून आपली शेती जिवंत...
खानदेशात रब्बीत अत्यल्प पीक कर्जवाटपजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामातील पेरण्या जवळपास...
वटवाघळांचा मोर्चा आता द्राक्ष बागांकडेपुणे: वटवाघळांची वस्तीस्थाने आणि अधिवास...
गटाने तयार केला `कोकणरत्न' ब्रॅंडकुर्धे (जि. रत्नागिरी) गावातील श्री नवलाई देवी...
रासायनिक अवशेषमुक्त शेती हेच भवितव्य:...नाशिक : रासायनिक खते व कीटकनाशकांच्या...
विदर्भ, कोकणात उद्यापासून पावसाचा अंदाजपुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...
कौशल्य, कृषी, उद्योग विभाग देतील...परभणी: पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि...
शेतकरीविरोधी कायद्यांबाबत सहा महिन्यांत...पुणे : शेतकरी आत्महत्यांना पूरक ठरणारे कायदे रद्द...