agricultural stories in Marathi, agrowon, snake bite in animals | Agrowon

ओळखा जनावरांमधील सर्पदंश...
अजय गवळी, संकेत पवार
रविवार, 19 ऑगस्ट 2018

पावसाळ्यात शेती, गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसरात
गवताची वाढ मोठ्या प्रमाणात होते. चराई क्षेत्रात सापांचा वावर आढळतो. अशा वेळी जनावरांना सर्पदंशाची शक्यता जास्त असते.  जनावरांना सर्पदंश झाल्यास पशुपालकांच्या लक्षात लवकर येत नाही. ज्या वेळी कुराणात चरत असताना जनावरांना सर्पदंश होतो, अशा जनावराच्या तोंडाभोवती, मानेखाली, कासेवर व खुराच्या मागील बाजूस सर्पदंशाच्या खुणा आढळून येतात. जखमेचा भाग सुजलेला असतो. अशा परिस्थितीमध्ये दुर्लक्ष केल्यास सर्पदंशाच्या मज्जातंतूवर परिणाम होतो. त्यामुळे श्वासोच्छवास बंद होऊन जनावर दगावण्याची शक्यता असते.
 

पावसाळ्यात शेती, गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसरात
गवताची वाढ मोठ्या प्रमाणात होते. चराई क्षेत्रात सापांचा वावर आढळतो. अशा वेळी जनावरांना सर्पदंशाची शक्यता जास्त असते.  जनावरांना सर्पदंश झाल्यास पशुपालकांच्या लक्षात लवकर येत नाही. ज्या वेळी कुराणात चरत असताना जनावरांना सर्पदंश होतो, अशा जनावराच्या तोंडाभोवती, मानेखाली, कासेवर व खुराच्या मागील बाजूस सर्पदंशाच्या खुणा आढळून येतात. जखमेचा भाग सुजलेला असतो. अशा परिस्थितीमध्ये दुर्लक्ष केल्यास सर्पदंशाच्या मज्जातंतूवर परिणाम होतो. त्यामुळे श्वासोच्छवास बंद होऊन जनावर दगावण्याची शक्यता असते.
 

 जनावरांना सर्पदंश झाल्यास

  • विषारी सापाने चावा घेतल्यास जनावर सैरभैर धावत सुटते.
  • सर्पदंश तीव्र असल्यास काही मिनिटांत जनावर चारा खाणे बंद करते.
  • डोक्यावर आपटी येते.
  • डोळ्याच्या बाहुल्या सुजतात. जनावर मान टाकते.
  • श्वसनास त्रास होतो. तोंडातून फेस येतो.

उपचार

  • सर्पदंश झाल्यावर जनावराच्या शरीरात विष पसरण्याची शक्यता असते.  प्रथम सर्पदंश झालेल्या वरील बाजूस घट्ट दोरी अथवा पट्टी बांधावी. जेणेकरून विष जनावराच्या शरीरात पसरणार नाही.
  • जखम स्वच्छ (निर्जंतुक)पाण्याने धुऊन घ्यावी. अस्वच्छ पाण्याचा वापर टाळावा.
  • सर्पदंश झालेल्या ठिकाणी चाकूने किंवा ब्लेडने कापून रक्त वाहू द्यावे. त्यामुळे विष शरीरात न पसरत रक्तप्रवाहाबरोबर शरीराबाहेर टाकले जाईल. खोलवर जखम होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • पुरेसा रक्तप्रवाह झाल्यानंतर त्यावर पोटॅशिअम परामॅग्नेट चोळावे, ज्यामुळे रक्तप्रवाह आटोक्यात येईल.

सर्पदंश टाळण्यासाठी उपाययोजना

  • गोठ्यात तसेच गोठ्याच्या परिसरात उंदरांचा प्रादुर्भाव होऊ नये याची काळजी घ्यावी.
  • गोठ्याच्या परिसरात अडगळ तयार करू नये.
  • सरपण, गोवऱ्या यांची साठवणूक गोठ्यापासून दूर करावी.
  • पावसाळ्यात गोठ्याच्या परिसरात गवतांची वाढ टाळावी.
  • कुराणात जनावरांना चरण्यासाठी घेऊन जाणे टाळावे.
  • कुराणातून चारून आल्यानंतर जनावरांचे व्यवस्थित निरीक्षण करावे. सर्पदंश झालेला असल्यास सर्पदंशाच्या खुणा आढळून येतात, जखमेचा भाग सुजलेला असतो. लगेच पशूतज्ज्ञांकडून उपचार करावेत.

अजय गवळी, ८००७४४१७०२
(पशुजैवतंत्रज्ञान विभाग, के. के. वाघ कृषी महाविद्यालय, नाशिक)

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याचा रब्बी हंगाम दीड लाख हेक्टरवर...अकोला  ः खरिपात पिकांचे नुकसान झाल्याने काही...
सोलापूर जिल्ह्यात नुकसानभरपाईसाठी २०४...सोलापूर : यंदा ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या...
पुणे : नुकसानग्रस्त भाजीपाला पिकांचे...पुणे ः मॉन्सुनोत्तर पावसामुळे पुणे विभागात नऊ...
अमरावती जिल्ह्यात ज्वारी ठरेल रब्बीत...अमरावती  ः मध्यम जमीन व सिंचनाच्या सोयी...
साहेब, संत्रा उत्पादकांचे प्रश्‍न सोडवा...नागपूर ः ‘‘दुचाकी, कार आणि घर घेण्यासाठी कर्जाचे...
परभणी : दूधातील घट ऑक्टोबरमध्येही कायमपरभणी : शासकीय दूध योजनेतंर्गंत येथील दुग्ध...
सातारा जिल्ह्यात भूजल पातळीत वाढसातारा ः जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टी,...
नगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्‍टर...नगर ः मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप...
कोल्हापूरच्या पूर्वेकडच्या भागात...कोल्हापूर : एकेकाळी सोयाबीनच्या उत्पादनात अग्रेसर...
ओला दुष्काळ जाहीर करा; बच्चू कडूंचे...मुंबई : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून...
गुलटेकडीत कांद्याच्या आवकेत घटपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
दक्षिण आफ्रिकेतील हापूस आंबा सांगलीतसांगली : आंब्याचा हंगाम सुरू होण्यास अद्याप...
परभणीत शेतकरी संघर्ष समितीचे रास्ता...परभणी ः जिल्ह्यात मॉन्सुनोत्तर पाऊस आणि...
पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचा कंपनीसमोर...पुणे ः मागील २०१८ या वर्षातील बीड जिल्ह्यातील...
पंतप्रधान मोदी आणि शिवसेनेत दरी निर्माण...मुंबई ः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना...
राज्यात लसूण ४२०० ते २० हजार रूपये...सांगलीत ४२०० ते १५००० रुपये सांगली : येथील...
राजकीय अस्थिरतेमुळे पूरग्रस्तांना मदतीस...कोल्हापूर: महापुरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना...
नवनवीन प्रपत्र, जिओ टॅगिंगच्या...बुलडाणा  ः अवकाळी पावसामुळे झालेल्या...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नी ‘...अकोला ः राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी...
शरद पवार करणार विदर्भातील पीक नुकसानीची...नागपूर ः राज्यात सत्तास्थापनेचे गुऱ्हाळ सुरू...