फक्त फळ तुमचे, बाकी सारे मातीचे..!

भास्करराव सावे यांच्या सेंद्रिय शेती पद्धतीनुसार त्यांचे संपूर्ण कुटूंब शेतीमध्ये मार्गक्रमणा करतात. भास्करराव सावे यांच्या सेंद्रिय शेती पद्धतीनुसार त्यांचे संपूर्ण कुटूंब शेतीमध्ये मार्गक्रमणा करतात.
भास्करराव सावे यांच्या सेंद्रिय शेती पद्धतीनुसार त्यांचे संपूर्ण कुटूंब शेतीमध्ये मार्गक्रमणा करतात. भास्करराव सावे यांच्या सेंद्रिय शेती पद्धतीनुसार त्यांचे संपूर्ण कुटूंब शेतीमध्ये मार्गक्रमणा करतात.

 नैसर्गिक शेतीचे प्रणेते म्हणून संपूर्ण देशात परिचित असलेले माझे वडील भास्कर सावे (गुरुजी) यांच्याकडून मी नैसर्गिक शेतीची संपूर्ण दीक्षा घेतली. आज वडील हयात नसले तरी त्यांचेच संस्कार आम्ही पुढे सुरू ठेवले आहेत.

देहरी, गुजरात, (डहाणूपासून सुमारे तीन किलोमीटर) येथे तीन ठिकाणी विभागलेले सुमारे ६५ एकर क्षेत्र आहे. गेल्या ५० वर्षांत इथल्या मातीला, झाडांना रासायनिक खते, कीडनाशके किंवा कोणत्याही रसायनांचा पुसटसा स्पर्शही झालेला नाही. तरीही ४० वर्षांहून अधिक वयाची हजारो झाडे आज समृद्धी लेऊन आनंदाने नांदताहेत. यात आंबा, केळी, फणस, चिकू, पपई, सुपारी, नारळ, भात, कडधान्ये आदी कितीतरी नावे घेता येतील. सर्व फळे, धान्ये आम्हाला उत्कृष्ट स्वाद आणि त्याचबरोबर आरोग्याचा ठेवा बहाल करतात. त्यांच्याबरोबरीने आम्हालाही समाधानी ठेवतात.

मातीचे आरोग्य यालाच सर्वोच्च प्राधान्य मातीचे आरोग्य शाश्वत ठेवण्याला माझ्या बाबांनी (सावे गुरुजी) सर्वोच्च प्राधान्य दिले. बाबांनी दिलेल्या शिकवणीनुसार माती हा सजीव घटक आहे. त्यात तुम्ही रसायनांचा वापर केला, तर ती निर्जीव होऊन जाते. आपण शेणखत, कंपोस्ट किंवा कोणतेही नैसर्गिक घटक देतो ते पिकाचे नव्हे; तर मातीचे अन्न आहे. माती सजीव असेल तरच ती हे घटक व्यवस्थितरीत्या स्वीकारते. तरच पुढे पिकांचेही चांगले पोषण होते. आमच्या मातीत तुम्हाला गांडुळांनी प्रयोगशाळाच थाटलेली पाहायला मिळेल. विविध प्रकारचे लाभदायक जीवाणूही प्रचंड संख्येने पाहायला मिळतील. गांडुळे, जीवाणू क्रियाशील असणे हेच माती सजीव असण्याचे लक्षण आहे. तुम्ही जंगले बारकाईने अभ्यासा. इथे पाऊस पडतो केवळ तीन ते चार महिने. मग वर्षातील उर्वरित आठ महिने ही झाडे हिरवीगार कशी काय राहतात? तर हे जीवाणूच त्यांना सातत्याने अन्न उपलब्ध करून देणारे किमयागार आहेत.

पिकांचे अवशेष मातीला परत द्या झाडांचे बी आणि फळे केवळ यावर तुमचा अधिकार आहे. बाकी पिकाचे सारे भाग पुन्हा मातीला (भूमातेला) परत द्यायचे असे बाबा नेहमी म्हणत. आमच्या बागेत केळीचे, नारळाचे झाप, त्यांची पाने, चिकूच्या पानांचा गालिचा, भाताचा पेंढा असे पिकाचे अवशेष आम्ही मातीत गाडतो.  आमच्याकडे अनेक वर्षांपासून चार ते पाच फुटांपेक्षा उंच असलेला गहू पाहण्यास मिळतो. त्याची वाढ इतकी कशी काय होते याबाबत अनेक शास्त्रज्ञांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. तुमच्याच शेती परिसरातील नैसर्गिक स्रोतांचा किंवा निविष्ठांचा वापर केलात तर बाहेरून काही आणून शेतात वापरण्याची गरजच नाही असे बाबांचे तत्त्वज्ञान होते.

विकृतीचा होतो नाश पिकावर एखादा रोग पडतो, असे सर्वसामान्यपणे म्हटले जाते. आम्ही त्याला विकृती असे म्हणतो. तुमची माती जर अन्नद्रव्यांनी समृद्ध असेल तर पिकाची प्रतिकारशक्तीही तितकीच मजबूत राहते. त्यामुळे ती विकृतीही दीर्घकाळ टिकत नाही, असा आमचा अनुभव आहे.  

संपर्क  ः नरेशभाई सावे, ०९४२७४७७९०४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com