agricultural stories in Marathi, agrowon, sugercane wooly aphid management | Agrowon

उसावरील लोकरी माव्याचे एकात्मिक नियंत्रण

बोकन एस. सी., डॉ. बी. व्ही. भेदे
शुक्रवार, 29 मार्च 2019

जुलै २००२ मध्ये सांगली जिल्ह्यात उसावर सर्वप्रथम लोकरी माव्याची नोंद झाली. त्यानंतर या किडीचा प्रादुर्भाव बहुतांश सर्व ऊस क्षेत्रावर दिसून येत आहे.

किडींची ओळख :
मादीच्या पोटातून नुकतीच बाहेर पडलेली बाल्यावस्थेतील पिल्ले ही पिवळसर किंवा हिरवट पिवळसर रंगाची असून, अतिशय चपळ असतात. बाल्यावस्थेमध्ये चार वेळा कात टाकली जाते. तिसऱ्या अवस्थेपासून किडीच्या पाठीवर पांढऱ्या लोकरी सारखे तंतू दिसून येतात. लोकरी माव्याचे प्रौढ हे काळे असून, पारदर्शक पंखाच्या दोन जोड्या असतात.

नुकसानीचा प्रकार :

जुलै २००२ मध्ये सांगली जिल्ह्यात उसावर सर्वप्रथम लोकरी माव्याची नोंद झाली. त्यानंतर या किडीचा प्रादुर्भाव बहुतांश सर्व ऊस क्षेत्रावर दिसून येत आहे.

किडींची ओळख :
मादीच्या पोटातून नुकतीच बाहेर पडलेली बाल्यावस्थेतील पिल्ले ही पिवळसर किंवा हिरवट पिवळसर रंगाची असून, अतिशय चपळ असतात. बाल्यावस्थेमध्ये चार वेळा कात टाकली जाते. तिसऱ्या अवस्थेपासून किडीच्या पाठीवर पांढऱ्या लोकरी सारखे तंतू दिसून येतात. लोकरी माव्याचे प्रौढ हे काळे असून, पारदर्शक पंखाच्या दोन जोड्या असतात.

नुकसानीचा प्रकार :

  • लोकरी मावा उसाच्या पानावरील रस शोषतो. कीडग्रस्त पानाच्या मुख्य शिरेच्या दोन्ही बाजूला व पानावर पिवळसर ठिपके दिसतात. पाने कोरडी पडून वाळतात, त्यामुळे ऊस कमकुवत होतो. वाढ खुंटून उत्पादन व साखर उताऱ्यात घट येते.
  • लोकरी माव्याच्या शरीरातून बाहेर टाकलेल्या मधासारख्या चिकट द्रवामुळे पानावर काळ्या रंगाच्या परोपजिवी बुरशींची वाढ होते.  संपूर्ण पान काळे पडल्याने त्यांची अन्न निर्मितीची प्रक्रिया मंदावते.

नियंत्रण
मशागतीय उपाय :

  • कीडग्रस्त भागात उसाची पट्टा अथवा रुंद सरी पद्धतीने लागवड करावी. प्रादुर्भाव झाल्यानंतर नियंत्रणाचे उपाय करणे सोपे होते.
  • कीडग्रस्त ऊस बेण्यासाठी वापरू नये. बेणे निवडून झाल्यानंतर उसाची पाने जाळून टाकावीत.
  • ऊस लागवडीपूर्वी बेणे प्रक्रिया करावी. मॅलाथिऑन ३ मि.ली. प्रति लिटर पाणी या द्रावणाणध्ये बेणे १५ मिनिटे बुडवून घ्यावे.
  • रासायनिक खताचा संतुलीत वापर करावा. नत्रयुक्त खतांचा वापर जास्त प्रमाणात केल्यास किडीला प्रोत्साहन मिळते.
  • मावाग्रस्त उसाची हिरवी अथवा कोरडी पाने एका शेतातून दुसऱ्या शेतात किंवा एका भागातून दुसऱ्या भागात नेऊ नयेत.

जैविक उपाय :

  • कोनोबाथ्रा ॲफिडीव्हारा १००० अळया किंवा मायक्रोमस इगोरोटास २५०० अळ्या किंवा क्रायसोपर्ला कार्निया या मित्रकिटकांची २५०० अंडी प्रति हेक्टरी सोडाव्यात. क्रायसोपर्ला कार्निया हा परभक्षक मित्रकिटक मऊ शरीराच्या किडीवर उपजीविका करतो. मित्र किटक शेतात सोडल्यानंतर किटकनाशकाची फवारणी ३ ते ४ आठवडे करू नये.
  • कडूनिंब आधारित किटकनाशक ॲझाडिरॅक्टीन (५ टक्के) ३७५ मि.ली. प्रति ७५० लिटर पाणी या प्रमाणे प्रति हेक्टरी फवारणी करावी.
  • उसात किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास व त्याच्या नियंत्रणासाठी किटकनाशकांचा वापर केलेला असल्यास त्यानंतर १५ दिवसांनी परभक्षक किटक सोडावेत. परभक्षक किटकाच्या अळ्या किडीस नष्ट करतात. प्रादुर्भावग्रस्त उसात फक्त परभक्षक सोडल्यास कीड नियंत्रण त्वरित होते.

रासायनिक उपाय :
जास्तीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, फवारणी प्रतिलिटर पाणी
क्लोरपायरीफॉस (२० टक्के इ.सी.) ०.७५ ते १.५ मि.लि. किंवा ॲसिफेट २ ग्रॅम.

टीप ः मोठ्या उसात गटूर किंवा पावर पंप वापरुन फवारणी करावी. त्यामुळे किटकनाशकांचे द्रावण जास्त दाबाने फवारले जाऊन किड त्वरित मरते. द्रावणास चिकटपणा येण्यासाठी उत्तम दर्जाचे चिकटद्रव्य १ मि.ली प्रति लिटर द्रावणामध्ये मिसळावे.

 ः बोकन एस. सी.
(पीएच.डी. स्कॉलर), ९९२१७५२०००
 ः डॉ. बी. व्ही. भेदे
(सहाय्यक प्राध्यापक), ७५८८०८२०२८

(कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)


इतर नगदी पिके
सुधारित पद्धतीने खोडवा उसाचे व्यवस्थापन खोडवा उसाची योग्य जोपासना केल्यास लागवडीएवढेच...
सुरु उसाला द्या शिफारशीत खतमात्रा रासायनिक खते प्रत्येक वेळी सेंद्रिय खतांमध्ये...
उसासाठी सेंद्रिय खत, सूक्ष्म...जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी हिरवळीची पिके...
उसाला द्या शिफारशीनुसार खतमात्रारासायनिक खते जमिनीवर पसरून न देता चळी घेऊन किंवा...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
ऊस पीक सल्ला१) साधारणपणे १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत...
गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी ...सध्या कापूस पीक हे फुलोरा ते बोंडे लागण्याच्या...
कपाशीतील बोंड सडणे विकृतीचे व्यवस्थापनमागील दोन वर्षांपासून राज्यातील विदर्भ, मराठवाडा...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
नारळ बागेत मसाला पिकांची लागवड    नारळ बागेमध्ये नारळाच्या...
गुलाबी बोंड अळीला रोखण्यासाठी एकात्मिक...गुलाबी बोंड अळ्यांना खाण्यासाठी व पतंगाना अंडी...
आडसाली उसासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य...
ऊस बियाणे निर्मितीसाठी ‘सुपरकेन नर्सरी...अलीकडे प्रो ट्रे किंवा पिशव्यांमध्ये उसाची रोपे...
दुष्काळाशी लढा देत हळदीची उत्कृष्ट शेतीअमळनेर (जि. जळगाव) येथील अश्पाक मुनीर पिंजारी व...
डाळिंब बागेतील मर रोगाचे नियंत्रणडाळिंब लागवड शक्यतो गादी वाफ्यावर करावी, त्यामुळे...
खरीप कांदा लागवड तंत्रज्ञानविशेषतः विदर्भात रब्बी हंगामातील कांद्याचे...
खरीप नियोजन : कपाशीतील असमतोल वाढ,...गेल्या काही वर्षांमध्ये कपाशी लागवड समस्यांत वाढ...
ऊसवाढीच्या टप्‍प्यानुसार द्या पुरेसे...जमिनीच्या प्रकारानुसार योग्य ठिबक सिंचन पद्धतीची...
ऊस पीक व्यवस्थापन सध्याच्या काळात जमिनीतील ओलावा टिकवणे, पाण्याचा...
दर्जेदार कृषी उत्पादनासाठी...आपण शेती उत्पादनामध्ये बऱ्यापैकी स्वयंपूर्ण झालो...