agricultural stories in Marathi, agrowon, summer mung plantation | Agrowon

तंत्रज्ञान वैशाखी मूग लागवडीचे

डॉ. हनुमान गरुड, डॉ. भगवान आसेवार, श्रीमती सारिका नारळे
मंगळवार, 29 जानेवारी 2019

उन्हाळ्यातील जास्त तापमान मूग पिकाच्या वाढीसाठी उत्तम असून, या काळात मुगाचे चांगले उत्पादन मिळू शकते. उन्हाळी हंगामासाठी शिफारशीत सुधारीत वाणांची निवड करावी.
मूग पिकाला मध्यम ते भारी, उत्तम निचऱ्याची जमीन आवश्यक असते. या पिकाला जास्त मशागतीची आवश्यकता लागत नाही. एक हलकी नांगरट व वखराच्या दोन पाळ्या देऊन पेरणी करता येते.

सुधारीत वाणांची निवड –
उन्हाळी मुगाची पेरणी करण्यासाठी खालील वाणांची निवड करावी.

उन्हाळ्यातील जास्त तापमान मूग पिकाच्या वाढीसाठी उत्तम असून, या काळात मुगाचे चांगले उत्पादन मिळू शकते. उन्हाळी हंगामासाठी शिफारशीत सुधारीत वाणांची निवड करावी.
मूग पिकाला मध्यम ते भारी, उत्तम निचऱ्याची जमीन आवश्यक असते. या पिकाला जास्त मशागतीची आवश्यकता लागत नाही. एक हलकी नांगरट व वखराच्या दोन पाळ्या देऊन पेरणी करता येते.

सुधारीत वाणांची निवड –
उन्हाळी मुगाची पेरणी करण्यासाठी खालील वाणांची निवड करावी.

  • वाण ः कालावधी (दिवस) ः उत्पन्न (क्विं/हे.) ः प्रमुख वैशिष्ट्ये
  • कोपरगाव ः ६० ते ६५ ः ८-१० ः टपोरे हिरवे चमकदार दाणे
  • एस-८ ः ६० ते ६५ ः ९-१० ः हिरवे चमकदार दाणे, खरीप व रब्बी हंगामासाठी योग्य
  • फुले एम-२ ः ६० ते ६५ ः ११-१२ ः मध्यम हिरवे दाणे, खरीप व उन्हाळी हंगामासाठी
  • बीएम-४ ः ६० ते ६५ ः  १०-१२ ः मध्यम हिरवे दाणे, खरीप व उन्हाळी हंगामासाठी

पेरणी –
वैशाखी मुगाची पेरणी १५ फेब्रुवारी ते १५ मार्चदरम्यान करावी. दोन ओळीतील अंतर ३० सें. मी. असावे. बी पेरणीपूर्वी रायझोबीयम व स्फुरद विरघळवणारे जीवाणू संवर्धक २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यास चोळावे. प्रति हेक्टरी १५ ते २० किलो बियाणे वापरावे.

खत व्यवस्थापन –
मुगासाठी शेवटच्या वखरणीअगोदर ६-८ टन प्रति हेक्टरी शेणखत किंवा कंपोस्ट द्यावे.
पेरणीच्या वेळी २० किलो नत्र आणि ४० -५० किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे.

आंतरमशागत व तणनियंत्रण –
हे पीक कमी कालावधीचे असल्याने उभ्या पिकामध्ये वेळीच आंतरमशागत करणे गरजेचे आहे. पेरणीनंतर ३ ते ४ आठवड्यांनी एक कोळपणी वा एक खुरपणी करून घ्यावी. त्यामुळे आंतरमशागतीसोबतच तणांचे नियंत्रण होण्यास मदत होते.

पाणी व्यवस्थापन –
उन्हाळी मुगासाठी पेरणीनंतर १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या एकूण ४ ते ५ पाळ्या द्याव्यात. पीक फुलावर येण्याच्या वेळी तसेच दाणे भरण्याच्या वेळी पाणी देणे आवश्यक असते. जेव्हा फक्त एकच पाणी उपलब्ध असेल त्या वेळी मात्र मुगास पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी पाणी द्यावे.

डॉ. भगवान आसेवार, ९४२००३७३५९
(वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे डॉ. गरुड हे वरिष्ठ संशोधन फेलो असून, डॉ. आसेवार हे प्रमुख शास्त्रज्ञ आहेत.)
 


इतर कडधान्ये
कडधान्ये ः प्रथिने, ऊर्जेचा उत्तम स्रोतकडधान्ये पोषणातील सर्वांत महत्त्वाचा घटक आहेत....
तंत्रज्ञान हरभरा लागवडीचे...जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी पीक...
हरभरा पिकाची सुधारित लागवडहरभऱ्यामध्ये देशी वाण व काबुली वाण असे दोन प्रकार...
तुरीवरील किडींचे एकात्मिक नियंत्रण...सध्याच्या परिस्थितीत तूर पीक कळ्या लागण्याच्या...
हरभरा पिकाची तंत्रशुद्ध पद्धतीने लागवडकोरडवाहू तसेच ओलीताखाली हरभऱ्याच्या विजय,...
रुंद वरंबा सरी पद्धतीने हरभरा लागवडहरभरा लागवडीसाठी रुंद वरंबा सरी पद्धतीचा वापर...
हरभऱ्याच्या अधिक उत्पादनासाठी फुले...महात्मा फुले कृषि विदयापिठाने कंबाईन हार्वेस्टरने...
प्रकाश संश्लेषण, पाणी वापर...चवळी पिकांच्या पर्णसंभारामध्ये प्रकाश संश्लेषण...
तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रणमागील काही दिवसापासून सतत ढगाळ हवामान...
मुग, उडीद पिकाची सुधारित लागवडखरीप हंगामामध्ये मुग व उडीद पिकाची लागवड मुख्य व...
तंत्र तूर लागवडीचे..जमिनीत वाफसा येताच जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा...
मूग आणि उडीदाची सुधारीत पध्दतीने लागवडजमिनीत वापसा येताच जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात (१५...
हवामान बदलानुसार कडधान्य वाणनिर्मितीची...पीक उत्पादनासाठी पाणी व माती या दोन गोष्टी फार...
गरजेनुसार कडधान्य वाण विकसित करण्याची...कडधान्य पिकांचे आहारातील महत्त्व व वाढत्या...
..अशी आहे डाळनिर्मितीची प्रक्रियामागील भागात मिनी डाळ मिल व त्या माध्यमातून डाळ...
कृषी सल्ला : तूर, हरभरा, ज्वारी, कांदा...तूर शेंगा पक्वतेची अवस्था शेंग माशी, घाटे अळी...
तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रणकाही दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण तुरीवरील...
बीबीएफ यंत्रानेच करा हरभरा पेरणीरुंद वरंबा सरी यंत्राद्वारे गरजेनुसार ६० ते १५०...
योग्य वेळी करा कडधान्य पेरणीमूग, उडीद :     मध्यम ते...
तयारी खरिपाची : वेळेवर मुगाची लागवड...जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा माॅन्सूनचा पुरेसा...