गुजरात राज्यातील पिखोर (ता. केशोद, जि. जुनागड) या लहानशा गावातील भरतभाई अग्रावत हे शेतीसाठी लागणाऱ्या छोट्या अवजारे निर्मितीतील संशोधक.
भरतभाईंचे वडील अमृतभाई यांचा गावामध्येच लहानसा फॅब्रिकेशनचा व्यवसाय. त्यामुळे गावपरिसरातील शेतकऱ्यांच्या अवजारांची दुरुस्ती त्याचबरोबरीने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार लहान अवजारे तयार करून देत होते. वडिलांच्या बरोबरीने लहानपणापासून अवजारे, यंत्रे दुरुस्ती करता करता भरतभाईंनादेखील नवीन संकल्पना सुचू लागल्या. यातूनच त्यांनी शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन छोट्या अवजारांची निर्मिती सुरू केली. भरतभाईंनी ग्रामीण भागातील लोकांच्या अडचणी लक्षात घेऊन कूक स्टोव्ह, पाणी उपसण्यासाठी लहान पवनचक्की तयार केली. याचबरोबरीने आंतरमशागत आणि पेरणीसाठी मजुरांची कमतरता आणि लहान शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन अांतरमशागत आणि पेरणी यंत्राचीदेखील निर्मिती केली. या यंत्राला शेतकऱ्यांच्याकडून चांगली मागणी आहे. हे यंत्र विकसित करण्यासाठी ग्यान संस्थेने त्यांना तांत्रिक आणि आर्थिक मदत केली आहे. असे आहे अांतरमशागत आणि पेरणी यंत्र
संपर्क : ०७९- २६७६९६८६ (ग्यान संस्था, अहमदाबाद, गुजरात)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.