खाद्य मिश्रण यंत्र, डाटा फ्लो तंत्राचा 'डेअरी'साठी प्रभावी वापर

खाद्य मिश्रण यंत्र, डाटा फ्लो तंत्राचा प्रभावी वापर
खाद्य मिश्रण यंत्र, डाटा फ्लो तंत्राचा प्रभावी वापर

सिन्नर (जि. नाशिक) येथील जनक कुंदे या अभियंता युवकाने शंभर संकरीत गायींच्या गोठ्याचे विविध तंत्रज्ञानाच्या साह्याने यशस्वी व्यवस्थापन केले आहे. त्यात प्रामुख्याने जनावरांच्या रवंथ क्रियेवर आधारीत तंत्रासह खाद्य, आरोग्य, पाणी व्यवस्थापन यांसह निर्जंतुकीकरण या घटकांना मुख्य स्थान दिले आहे.

संगणकीय प्रणालीद्वारे नोंदी गोठ्यातील पशुधन व संबंधित कामकाज ‘डाटा फ्लो’ या संगणकीय प्रणालीद्वारे नियंत्रित होते. त्यासाठी प्रत्येक गाईच्या मानेच्या पट्ट्याला टॅग लावला आहे. त्याला सेन्सरची जोड दिली आहे. टॅगची किंमत ११ हजार रुपये आहे. हा सेन्सर संगणकाला जोडण्यात आला आहे. सेन्सरद्वारे गायीच्या हालचालींची नोंद टिपली जाते. ती संगणकाला स्वयंचलित पद्धतीने फीड केली जाते. या यंत्रणेत ॲंटेनादेखील महत्त्वाची भूमिका बजावतो. या प्रणालीत नोंदी स्वतंत्र टिपण्याची गरज भासत नाही. प्रत्येक जनावराला थंडी, उष्णता आदी तापमान बदलांचा सामना करावा लागतो. त्यानुसार त्यांच्या दूध देण्याच्या क्षमतेवर परिणाम होत असतो. या सर्व नोंदी डाटा फ्लो टिपत असल्याने गायींचे चोख व्यवस्थापन करणे शक्य होते. गायीला किती उन्हाचा सामना करावा लागतो? गाय ताणावर आहे का असा बारीकसारीक बाबींपासून पाणी, खाद्य, दिलेले दूध अशा सर्व बाबींची माहिती समजून येते. मोबाईलवर मॅसेजद्वारे देखील ही माहिती मिळण्याची सोय आहे.

टाइम रिपोर्टिंग

  • गाई विण्याच्या वेळा, दुधाची अपेक्षित मर्यादा, गाईचे कृत्रिम रेतन करण्याबाबत वेळा व व्यवस्थापन, एकूण पशुधनापैकी किती गाई कधी विणार, किती दूध देणार या सूचना देखील प्रणालीद्वारे दिल्या जातात. सर्व नोंदी दिवस, आठवडा व महिनानिहाय स्वरुपात अवगत होतात. माहितीचा ‘बॅक अप’ घेता येतो. त्यामुळे त्याचा गरजेनुसार केव्हाही वापर करणे शक्य होते. इस्त्रायली तंत्रज्ञानावर हा सारा प्रकल्प चार कोटी रुपयांचा असल्याचे जनक यांनी सांगितले. संपूर्ण संगणकीकृत कामकाज, मनुष्याकरवी हाताळणी न होता ( हॅन्ड अनटच) मिल्क पार्लर, अल्प मनुष्यबळ आणि अधिक काम ही यां तंत्राची मुख्य वैशिष्ट्ये आहेत.
  • खाद्य नियोजन सांगणारे ‘टीएमआर मशीन’

  • यामध्ये वाळलेला, ओला चारा व पशुखाद्य असे तीन प्रकारचे खाद्य यांचे मिश्रण केले जाते.
  • एकावेळी एक टन खाद्याचे मिश्रण या यंत्राद्वारे करण्यात येते.
  • उदाहरण घ्यायचे ठरवले तर १० ते १०० दिवस वयोगटातील २० गायी निवडून त्यांचा गट तयार केला जातो. प्रति गाय साधारण ३० ते ३५ किलो खाद्य द्यायचे असते. अशावेळी सहाशे किलो खाद्य यंत्राद्वारे देण्याची पद्धत पार पाडली जाते. या यंत्राला वजनकाटा दिलेला असतो. हे ट्रॅक्टरचलित यंत्र आहे.
  • पाण्याचे ॲटोमेशन गायींना पिण्याच्या पाण्यासाठी चार अत्याधुनिक स्टेनलेस स्टील टाक्या बसविल्या आहेत. एका मुख्य स्टोरेज टाकीतून पाइपलाइन द्वारे या टाक्या जोडलेल्या असतात. प्रत्येक टाकीत ‘फ्लड व्हॉल्व्ह’ बसवलेला असतो. गायींनी पाणी घेतल्यानंतर टाकीतील पाण्याची पातळी कमी झाल्यास या व्हॉल्व्हद्वारे पाण्याचे पुनर्भरण होते. यामध्ये शुद्ध व स्वच्छ पाण्यासाठी आरओ यंत्रणेचा वापर केला आहे. इस्त्रायली गायीला विविध टॅग सिस्टीम

  • जनक यांनी गायीच्या मानेच्या पट्ट्याला टॅग बांधला आहे तसे एकाहून अधिक टॅग इस्त्रायल देशातील संकरीत गायींना बांधण्यात येतात. याद्वारे दूध उत्पादकता, फॅट, प्रथिने, लॅक्टोज टक्केवारी, जनावराचे वजन, घेतलेले खाद्य आदी विविध बाबींची नोंद ठेवण्यात येते. या देशातील बहतांश डेअरी फार्मसमध्ये वासरे, दुधाळ गायी, दूध आटलेल्या गायी अशा वर्गीकरणानुसार टीएमआर यंत्रांचा वापर केला जातो.
  • या यंत्रणेमुळे पार्लरची रचना, खाद्य उपकरणाची देखभाल यावरील खर्चात बचत होते.
  • दूध देण्याच्या वेळेतही विलंब होत नाही. यात मजूरबळही कमी लागते. यंत्राची कार्यक्षमता चांगली असते. जागाही कमी लागते.
  •  : जनक कुंदे, ९८२२०३००६६, ७०५७०६०२५०.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com