वनस्पतीयुक्त भिंती सांगतील घराचे आरोग्य

वनस्पतीयुक्त भिंती सांगतील घराचे आरोग्य
वनस्पतीयुक्त भिंती सांगतील घराचे आरोग्य

वनस्पतिशास्त्र आणि इमारत आरेखनशास्त्र या दोहोंचा तसा पाहता काही संबंध दिसत नाही. फारतर घराचे सुशोभीकरणाच्या अनुषंगाने पूरक म्हणून वनस्पतिशास्त्राचा विचार होतो मात्र, भविष्यामध्ये या दोन शाखांच्या एकत्रिकरणाचा परीणाम मानवी आरोग्य टिकवण्यासाठीही होऊ शकतो. घरामध्ये राहणाऱ्या माणसांच्या आरोग्याचा सातत्यपूर्ण आढावा ते घर चांगल्या प्रकारे घेऊ शकेल, या विचारातून टेनिसी विद्यापीठातील कृषी संस्था संशोधन करत आहेत. त्यासाठी खास जनुकीय सुधारित घरगुती वनस्पती विकसित करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहे. या वनस्पती घरे किंवा कार्यालयांतील व्यक्तींच्या आरोग्यासाठी वेळीच धोक्याचे, सावधानतेचे संदेश देऊ शकतील. ही संकल्पना सायन्स या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.

आलिशान, देखणे घर ही प्रत्येकाची इच्छा असते. त्याबरोबरच ते आरोग्यपूर्ण असावे, हेही पाहिले जाते. टेनिसी विद्यापीठातील युटू हर्बर्ट कृषी महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र विभागातील प्रो. नील स्टुअर्ट आणि त्यांचे सहकारी भविष्यातील अत्याधुनिक घरांमध्ये जनुकीय सुधारित वनस्पतींच्या साह्याने या साऱ्या बाबी एकत्रित आणू पाहत आहेत. नील यांना ही कल्पना त्यांची पत्नी सुझान आणि इंटेरिअर आर्किटेक्चरचे सहायक प्रो. राणा अबुद्द्येह यांच्याशी झालेल्या संवादातून सुचली. यातील जैविक सेन्सर ही कल्पना तशी जुनीच असली तरी पर्यावरणातील अशा सेन्सरचा वापर प्रत्यक्ष घरामध्ये अंतर्गत सुशोभीकरणासाठी करण्याची कल्पना नावीन्यपूर्ण आहे. त्यासाठी जुनकीय सुधारणा तंत्रातून फायटोसेन्सर घरगुती वापराच्या वनस्पतीमध्ये अंतर्भूत करण्याचेही त्यांचे नियोजन आहे.

संकल्पना ः

  • विविध प्रकारच्या वातावरणामध्ये अगदी सामान्य वनस्पतीही वेगळे गुणधर्म दाखवतात. उदा. वातावरणामध्ये नायट्रोजनचे प्रमाण अधिक किंवा कमी असणे. खास तयार केलेल्या फिल्टरद्वारे त्याकडे पाहिल्यास हे बदल स्पष्ट दिसतात. भिंतीवरील वनस्पतींच्या समोर असे फिल्टर काचेच्या स्वरूपामध्ये लावल्यास वनस्पतींच्या रंगांमध्ये झालेला फरक डोळ्यांनाही दिसू शकेल. हा बदल जर आरोग्यासाठी हानिकारक पातळीपर्यंत पोचत असल्यास त्वरित त्यावर उपाययोजना करता येतील. भविष्यामध्ये हे तंत्रज्ञान व्यावसायिकरीत्या उपलब्ध करण्याचे नियोजन नील स्टुअर्ट करत आहेत.
  • घरामध्ये फुललेली फुले ही मानसिक स्वास्थ्यांसाठी चांगली असतातच, मात्र त्याबरोबरच आपल्या घरातील स्थितीबाबतही भाष्य करू शकतात. त्यांची भाष्य करण्याची पद्धती वेगळी असते. त्याविषयी माहिती देताना नील स्टुअर्ट म्हणाले, की नैसर्गिकरीत्याही वनस्पती बाह्य स्थितीविषयी आपले मत आपल्या अवयवातील रंग, गंध यातून दर्शवत असते. पानांचे रंग बदलतात. मात्र, त्याही आधी त्यातून वेगवेगळी रसायने बाहेर फेकली जातात. (जी संप्लवनशील असल्याने त्वरीत हवेत विरून जातात.) आता हे गुणधर्म अधिक वेगाने व स्पष्ट दर्शवण्यासाठी योग्य त्या जनुकांचा अंतर्भाव या वनस्पतींमध्ये करण्याचे नियोजन केले आहे.
  • अशा जैवसेन्सरचे प्रमाण अधिक असण्याच्या दृष्टीने वनस्पतींयुक्त भिंतीचे प्रारुप उत्तम ठरेल, अशा विश्वास संशोधकांना आहे. ते सजावटीच्या दृष्टीनेही निसर्गाच्या अत्यंत जवळ नेणारे ठरू शकते, असा दावा अबुद्द्येह यांनी केला. अशा संरचनेतून जागेची बचत साधण्याबरोबरच घराचा एकात्मिक भाग बनून जातील.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com