agricultural stories in Marathi, agrowon, TECHNOWON, Is LED light 'cold' light? | Agrowon

कृत्रिम प्रकाशासाठी सोडियम दिव्यांच्या तुलनेत एलईडी दिवे उपयुक्त
वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मार्च 2019

परदेशाप्रमाणेच आपल्याकडे शेवंतीसह विविध पिकांच्या उत्पादनामध्ये कृत्रिम प्रकाशाचा वापर वाढत आहे. यासाठी प्रामुख्याने सोडियम दिव्यांचा वापर केला जातो. अलीकडे एलईडी दिव्यांचाही वापर काही प्रमाणात होत आहे. मात्र, या दोन्ही दिव्यांसाठी लागणारी ऊर्जा आणि उत्पादकता वाढीसाठी होणारा फायदा, याचा विचार प्रामुख्याने होण्याची आवश्यकता आहे. जागतिक पातळीवर याबाबत सातत्याने संशोधन सुरू असून, त्यातील काही अंश...

परदेशाप्रमाणेच आपल्याकडे शेवंतीसह विविध पिकांच्या उत्पादनामध्ये कृत्रिम प्रकाशाचा वापर वाढत आहे. यासाठी प्रामुख्याने सोडियम दिव्यांचा वापर केला जातो. अलीकडे एलईडी दिव्यांचाही वापर काही प्रमाणात होत आहे. मात्र, या दोन्ही दिव्यांसाठी लागणारी ऊर्जा आणि उत्पादकता वाढीसाठी होणारा फायदा, याचा विचार प्रामुख्याने होण्याची आवश्यकता आहे. जागतिक पातळीवर याबाबत सातत्याने संशोधन सुरू असून, त्यातील काही अंश...

शेतीमध्ये पिकांना प्रकाश देण्यासाठी पूर्वी उच्च दाबाच्या सोडियम दिव्यांचा वापर केला जात असे. अलीकडे एलईडी तंत्रज्ञान आल्यानंतर त्याचाही शेतीमध्ये वापर वाढू लागला आहे. मात्र, या दोन्ही प्रकारच्या दिव्यातील फरक नेमकेपणाने जाणून घेतला पाहिजे.
१) सोडियम दिवे हे ८० ते ९० टक्के विद्युत ऊर्जेचे रूपांतर हे रॅडिएशनमध्ये करतात. त्यातील सुमारे ५० टक्के रॅडिएशन हे पीएआर प्रकाशाच्या स्वरूपात, तर उर्वरित ५० टक्के अवरक्त किरणांच्या स्वरूपामध्ये बाहेर पडते. त्यामुळे याला उष्णता प्रकिरणे (हीट रॅडिएशन) असेही म्हटले जाते.
२) एलईडी दिव्यांमध्ये सुमारे ६० टक्के ऊर्जा ही पीएआर प्रकार आणि उर्वरित ४० टक्के ऊर्जा ही एलईडीमागील बाजूला उष्णतेमध्ये रूपांतरित होते.

हीट रॅडिएशन म्हणजे काय?

  • वास्तविक ही शास्त्रीय कल्पना नाही. पीएआर प्रकाश आणि अवरक्त प्रकाशासह सर्व प्रकारच्या रॅडिएशन (प्रकिरणे)मध्ये विद्युत चुंबकीय प्रकारात असतात. अगदी रेडिओ तरंग आणि क्ष-किरणेही विद्युत चुंबकीय प्रकिरणे आहेत. त्यातील एकमेव फरक म्हणजे त्यांची तरंगलांबी. सर्वसाधारणपणे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम हा तीन भागांमध्ये विभागला जातो.
  • सर्व प्रकारच्या विद्युत चुंबकीय किरणांमुळे उष्णता तयार होते. किरणांची ही विशिष्ट तरंगलांबी विविध पदार्थांकडून शोषली जाते. उदा. मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये अन्नपदार्थाला उष्णता मिळते. सूर्यापासून आपल्यापर्यंत अल्पप्रमाणातील उष्णतेसह प्रकाश मिळतो. या दोन्हीची तरंगलांबी वेगवेगळी आहे. ही किरणे शोषली जाऊन पदार्थांच्या उष्णतेमध्ये वाढ होते.
  • पिकांच्या बाबतीत प्रकाश किरणांतील विविध भाग (स्पेक्ट्रम) शोषले जातात. काही भागांमुळे वनस्पतींचे तापमान वाढते. विविध भाज्यांकडून होणारे प्रकाशाचे शोषण खालील छायाचित्रात दिसते.
  • या चित्रात ७०० ते १२०० नॅनोमीटर दरम्यानची प्रकाश किरणे ही वनस्पतीकडून फारशी शोषली जात नाहीत.
  • पीएआरदरम्यान (४०० ते ७०० नॅनोमीटर) ची प्रकाशकिरणे जवळपास सर्व शोषली जातात. त्यातही निळ्या आणि लाल रंगाकडील प्रकाश (४५० नॅनोमीटर आणि ६६० नॅनोमीटर) यांचे शोषण उत्तम प्रकारे होते.
  • यावरून वनस्पतींच्या प्रकाश संश्लेषणासाठी पीएआर प्रकाश किरणे अत्यंत महत्त्वाची ठरतात. त्याचप्रमाणे पानांचे तापमान उष्ण ठेवण्यामध्येही त्यांची मोलाची भूमिका असते.
  • उच्च दाबाच्या सोडियम दिव्यांसाठी वापरल्या गेलेल्या एकूण ऊर्जेपैकी ४० टक्के ऊर्जाही पीएआर प्रकारच्या किरणांची निर्मितीत रूपांतरित होते. आणि ४० टक्के ऊर्जा ही अवरक्त किरणाच्या (नीअर इन्फ्रारेड) वापरली जाते. या अवरक्त किरणांपैकी ५० टक्के ऊर्जा ही वनस्पतीकडून शोषली जात नसल्याने वाया जाते. यावरून एकूण वापरल्या गेलेल्या ऊर्जेतील केवळ ६० टक्के भाग वनस्पतीकडून शोषला किंवा उष्णतेकरिता वापरला जातो.
  • एलईडी दिव्यामध्ये एकूण वापरल्या ऊर्जेतील ६० टक्के भाग पीएआर प्रकाशाच्या निर्मिती करतो. हा प्रकाश विशेषतः त्यातील लाल आणि निळ्या रंगाचा भाग वनस्पतीकडून पू्र्णतः शोषला जातो. हे प्रमाण सोडियम दिव्याइतकेच आहे.
  • हरितगृहामध्ये केलेल्या प्रयोगामध्ये सोडीयम दिव्याखाली असलेल्या वनस्पतींचे तापमान हे एलईडी दिव्याखाली असलेल्या वनस्पतींच्या तुलनेमध्ये १ ते २ अंश सेल्सिअसने वाढलेले आढळले. दोन्ही प्रकारामध्ये पीएआर प्रकाशांचे प्रमाण (फोटॉन फ्लक्स) हे समान ठेवले होते. अर्थात, एलईडी दिव्यांसाठी ऊर्जा अत्यंत कमी प्रमाणात लागते. परिणामी, कमी रॅडिएशन वनस्पतींपर्यंत पोचतात.
  • वनस्पतींचे तापमान वाढवायचे असल्यास, त्यासाठी अन्य पर्यायही उपलब्ध आहेत. उदा. प्रकाशाची पातळी वाढवणे, विविध उपकरणात वाढणाऱ्या उष्णतेचा वापर वनस्पतीच्या परिसरातील उष्णता वाढवण्यासाठी करणे इ.

निष्कर्ष ः एलईडी दिव्यामुळे वनस्पतींच्या उष्णतेत वाढ होत नाही, हा दावा खोटा ठरला. मात्र, सोडियम दिव्यांच्या तुलनेमध्ये उष्णतेचे प्रमाण लक्षणीय कमी होते. उलट ज्या ठिकाणी अधिक उष्ण तापमान आहे, त्या ठिकाणी सोडियम दिव्यांच्या तुलनेमध्ये एलईडी दिवे फायदेशीर ठरू शकतील. त्याचप्रमाणे पिकांसाठी उपयुक्त पीएआर प्रकाश पातळी एलईडी दिव्यातून योग्य प्रमाणात मिळत राहते.

 

इतर टेक्नोवन
जिवंत माशांच्या वाहतुकीसाठी वाहनाची...लुधियाना येथील केंद्रीय काढणी पश्चात अभियांत्रिकी...
यंत्रांच्या साह्याने सकस गोळीपेंड...नंदूरबार येथील कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके)...
जलरोधक ई कपड्याची निर्मिती लेसर...भविष्यामध्ये अंगावर वापरता येणाऱ्या उपकरणे,...
भट्टीशिवायही लेसरने जोडता येईल सिरॅमिक सध्या सिरॅमिकच्या जोडणीसाठी भट्टी किंवा अधिक...
झेंड्याद्वारे मिळवता येईल ऊर्जा वाऱ्यावर फडकणाऱ्या झेंड्यांनी आजवर अनेकांना...
ट्रॅक्‍टर देखभालीसह अवजारांची निवड...ट्रॅक्‍टरच्या निवडीच्या वेळी जमीनधारणा, मातीचा...
अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांनी स्विकारले...खरिपात भात व पुढे डिसेंबरच्या सुमारास भुईमूग अशा...
भातासोबत मत्स्यशेती करण्याचे तंत्र भात पिकामध्ये साचणाऱ्या पाण्यामध्ये मासेपालन...
पशुखाद्य निर्मितीसाठी आवश्यक यंत्रे माणसांप्रमाणेच पाळीव पशुपक्ष्यांच्याही पोषकतेच्या...
देवलापूरच्या संस्थेतर्फे देशी शेण,...नागपूर जिल्ह्यातील देवलापार येथील गोविज्ञान...
हळद पिकातील महिलांच्या कामांसाठी...हळद पिकातील लागवडीपासून काढणीपश्चात कामांतील...
दुधी भोपळ्यापासून गर, रस निर्मितीदुधी भोपळ्याचे आरोग्यदायी गुणधर्माविषयी अलीकडे...
सौर ऊर्जाचलित आळिंबी उत्पादन संयंत्र गेल्या काही वर्षांत शहरी ग्राहक तसेच हॉटेल...
स्वयंचलित सेन्सर मोजेल जमिनीतील ओलावा विज्ञान आश्रम (पाबळ, जि. पुणे) येथील फॅब-लॅबमध्ये...
ट्रॅक्टरची बाजारपेठेची आशादायक वाटचालशेतीमध्ये यंत्र असा उल्लेख जरी झाला तरी आपल्या...
ऊर्जाबचत करणारे सौर वाळवणी यंत्र,...पदार्थाची चव, रंग व गुणवत्ता कायम ठेवून कमीत कमी...
पोषक आहारात हवी फळे, भाज्यांची स्मुदीआरोग्यदायी आहारामध्ये दूध, फळे आणि भाज्यांचा...
पिकानुसार प्लॅस्टिक आच्छादन ठरेल...आच्छादनामुळे बाष्पीभवन कमी झाल्याने पिकाची...
खवा बनविण्याची सुधारित पद्धतपारंपरिक पद्धतीमध्ये खवा बनविण्यासाठी सातत्याने...
यंत्राने करा पेरणी, आंतरमशागतसध्या खरीप हंगामातील पेरणी सुरू झाली आहे. काही...