आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून पशुपालनात सुलभता

आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून पशुपालनात सुलभता
आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून पशुपालनात सुलभता

नेदरलॅंड येथील पिएट जॅन थिबाऊडीअर (वय ३१ वर्षे) यांनी ऑस्ट्रेलियातून कुरणातील गवताचे मापन करणारे तंत्रज्ञान मागवले. ते ट्रॅक्टरच्या पुढे मॉवरवर बसवले असता कापल्या जाणाऱ्या किंवा कुरणामध्ये उभ्या असलेल्या गवताची उंची मोजली जाते. त्याच्या आधारे कुरणाचा नकाशा मिळतो. ज्या ठिकाणी गवताची उंची कमी आहे, त्या भागामध्येच खतांचा वापर करता येतो. पर्यायाने सरसकट खतांचा वापर करण्याची गरज राहत नाही. त्याचप्रमाणे दूध काढण्यासाठी डेन्मार्क येथील फार्मवरून जुने रोटरी मिल्किंग पार्लरही विकत घेतले. जगभरातून आवश्यक ते तंत्रज्ञान मागवून, त्याचा वापर केल्याने पशुपालनातील कष्ट आणि खर्च कमी करण्यात यश मिळाले. पिएट जॅन थिबाऊडीअर हे लेम्मेर भागातील शेतकरी असून, आपल्या माता पित्यासह १०० हेक्टर शेत आणि १८५ संकरीत गाईंचा सांभाळ करतात. प्रतिवर्ष प्रतिगाय सरासरी ८७०० किलो गवताची आवश्यकता असते. त्यातून ४.५ टक्के फॅट आणि ३.६५ प्रथिने मिळतात. हे प्रमाण सरासरी १० हजार किलो, ५ टक्के फॅट आणि ४ टक्के प्रथिने इथपर्यंत वाढवण्याचे ध्येय त्यांनी ठेवले आहे. त्यांचे वडील ल्युट आणि आई कॉबी यांच्या काळात काही वर्षांपूर्वीपासून मुक्त चरणाऱ्या गाईऐवजी एका जागेवर बंदिस्त गोठ्यामध्ये गोपालनाला सुरवात केली. मात्र, बाजारपेठेच्या मागणीप्रमाणे कुरणामध्ये चरणाऱ्या गाईंच्या दुधाला वाढीव दर मिळू लागला. (०.३४ युरो अधिक १.५० युरो बोनस)

चराई पद्धतीचा प्रथमच केला अवलंब ः

  • दरम्यानच्या काळात दुग्ध व्यवसाय सोडणाऱ्या शेजाऱ्याच्या ४५ गाई आणि आणखी २५ हेक्टर जमीन त्यांना कराराने मिळाली. ही संधी आणि कुरणामध्ये चराईमुळे वाढीव मिळणारा दर याचा फायदा घेण्याच्या उद्देशाने कुरणांमध्ये चराईला सुरवात केली. वडिलापासूनच्या सुमारे १० वर्षांच्या काळात गाई पहिल्यांदा गोठ्याबाहेर पडल्या. त्यामुळे दोन्ही कळपांना चराईचे वळण लावण्यासाठी अधिक कष्ट करावे लागल्याचे पीएट यांनी सांगितले.
  • या दरम्यान कुरणाच्या व्यवस्थापनामध्ये असलेल्या त्रुटी त्यांना जाणवू लागल्या. त्या कमी करण्याच्या उद्देशाने त्यांनी काम सुरू केले.
  • प्रतिदोन वेळा त्यांच्या गाईंचे दूध काढले जाते. सुमारे ६ तास चराई असते. हे प्रमाण सुमारे १२ तास आणि हंगामामध्ये १५० दिवसांपर्यंत करण्याचे ठरवले. प्रतिलिटर दुधामागे खाल्या जाणाऱ्या गवतांचा खर्च २ युरो पडतो. मात्र, अधिक चांगल्या व्यवस्थापनातून तो कमी करणे शक्य असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यासाठी शोध सुरू झाला. ऑस्ट्रेलियामध्ये अर्जन हल्समॅन यांच्याकडे गवताच्या वाढीवर लक्ष ठेवणारे उपकरण मिळाले. ते मॉवर वर लावल्यास सेन्सर्सद्वारे माहिती गोळा करते. त्यात गवताची उंची आणि ज्या भागातून मॉवर चालले आहे, तेथील गवताच्या उत्पादनाचा अंदाज मिळतो. तसेच मातीचा पीएच आणि आर्द्रता याविषयी माहिती मिळते. परिणामी, प्रतिहेक्टर २ ते २.५ हजार किलो गवत (कोरडे वजन) अधिक मिळण्यास मदत झाले.
  • ज्या भागामध्ये गवताची वाढ कमी आहे, त्या भागामध्ये खतांचे नियोजन करता येते.
  • अत्याधुनिक यंत्राचा शोध व वापर ः इंटरनेटवरून सर्च करून मिळवलेल्या पहिल्या यंत्राच्या वापरात चांगले यश मिळाले. त्यामुळे पिएट यांची उत्साह वाढला. त्यांनी इंटरनेटवरूनच डेन्मार्क येथील एका फार्मवरील जुने रोटरी मिल्किंग पार्लरही विकत घेतले. ते त्यांना स्वस्तात मिळाले. त्यात एका वेळी २६ गाईंचे दूध काढले जाते. परिणामी दिवसातून दोन वेळा गायींचे दूध काढण्याची प्रक्रिया सोपी झाली.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com