ऊर्जाबचत करणारे सौर वाळवणी यंत्र, सौरकंदील

ऊर्जाबचत करणारे सौर वाळवणी यंत्र, सौरकंदील
ऊर्जाबचत करणारे सौर वाळवणी यंत्र, सौरकंदील

पदार्थाची चव, रंग व गुणवत्ता कायम ठेवून कमीत कमी वेळेत पदार्थ सुकविण्यासाठी सोलर ड्रायरचा उपयोग होतो. पदार्थाच्या प्रकारानुसार व सोलर ड्रायरच्या रचनेनुसार त्यांची विभागणी प्रत्यक्ष सोलर ड्रायर, अप्रत्यक्ष सोलर ड्रायर, घुमटाकार किंवा टनेल टाइप ड्रायर या प्रकारामध्ये होते.सौरकंदील हे हलके व सहज वाहून नेता येणारे उपकरण आहे. पाच तासाच्या प्रभारीत कालावधीनंतर ३ ते ४ तास पर्यंत वापरता येतात.

सौर वाळवणी यंत्र (ड्रायर)

  • धान्य, फळे, भाजीपाला, औषधी वनस्पती, मसाला पिके इत्यादी पदार्थ सुरक्षितपणे साठवून ठेवण्यासाठी, त्यातील आर्द्रता कमी करणे आवश्यक आहे.
  • पदार्थाची चव, रंग व गुणवत्ता कायम ठेवून कमीत कमी वेळेत पदार्थ सुकविण्यासाठी सोलर ड्रायरचा उपयोग होतो.
  • पदार्थाच्या प्रकारानुसार व सोलर ड्रायरच्या रचनेनुसार त्यांची विभागणी प्रत्यक्ष सोलर ड्रायर, अप्रत्यक्ष सोलर ड्रायर, घुमटाकार किंवा टनेल टाइप ड्रायर या प्रकारामध्ये होते.
  • इनडायरेक्ट सोलर ड्रायर:
  • औषधी वनस्पती, मसाला पिके, द्राक्ष, मेथी, कोथिंबीर इत्यादी पदार्थावर सूर्याची किरणे पडल्यास त्यांचा रंग व सुगंध उडून जाण्याचा संभव असतो. हे लक्षात घेता पदार्थ सुकवण्यासाठी सौर ऊर्जेचा उपयोग इनडायरेक्ट सोलर ड्रायरद्वारे शक्य आहे.
  • संयंत्रामध्ये सौर संकलक हा अत्यंत महत्त्वाचा मुख्य भाग आहे. यामध्ये पदार्थ सुकवण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करून पदार्थापासून दूर गरम हवा तयार करण्यात येते.
  • या प्रणालीमध्ये सौर किरणे पदार्थांनी न शोषल्यामुळे पदार्थाचा रंग व सुगंध टिकून राहण्यास मदत होते.
  • डायरेक्ट टाइप सोलर ड्रायर

  • या प्रकारच्या सोलर ड्रायरमध्ये मुख्यतः धान्य, फळे व भाजीपाला सुकवला जातो. या सोलर ड्रायरमध्ये सूर्याची किरणे काचेच्या पारदर्शक आवरणामधून पदार्थांमध्ये शोषले जातात. त्यामुळे याला डायरेक्ट सोलर ड्रायर असे म्हणतात.
  • या प्रकरच्या सोलर ड्रायरचे मुख्य भाग म्हणजे सौर संकलन सुकवणी ट्रे, हवाबंद काचेचे आवरण आणि गरम हवा जाण्यासाठी चिमणी व स्टॅंडची व्यवस्था केलेली असते.
  • सौर संकलकाचा आतील भाग विशिष्ट पद्धतीने काळा करण्यात येऊन त्याचा उपयोग उष्णता शोषून घेण्यासाठी होतो.
  • सौर संकलकामधील गरम हवा व सूर्याची किरणे या दोन्हीमुळे पदार्थांची आद्रता कमी होऊन पदार्थ लवकर सुकण्यास मदत होते.
  • ड्रायरमध्ये कांदा, लसूण, आले, कडीपत्ता, भाजीपाला, कोथिंबीर, टोमॅटो चकत्या वाळवता येतात.
  • घुमटाकार सोलर ड्रायर

  • सोलर टनेल ड्रायरमध्ये सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद, मिरची, आवळा कॅंडी, बटाटा चिप्स, हिरवा भाजीपाला वाळवता येतो.
  • हे ड्रायर मोठ्या क्षमतेत उपलब्ध आहेत. याचे मुख्य भाग म्हणजे अर्धगोलाकर लोखंडी पाइपचा सांगाडा, त्यावर २०० मायक्राॅनची अल्ट्रा व्हायोलेट पाॅलिथिलीन फील्म, सिमेंट काॅंक्रीटचा पृष्ठभाग, पदार्थ वाळविण्यासाठी ट्रे, चिमणी इ.
  • सोलर टनेल ड्रायरमध्ये दिवसा ग्रीन हाउस इफेक्टद्वारे आतील तापमानात बरीच वाढ होते. आतील तापमान वातावरणातील तापमानापेक्षा ५ ते २० अंश सेल्सिअस अधिक राहते. भर दुपारी ते ६० ते ६५ अंश सेल्सिअसपर्यंत पोचते. वाढलेल्या तापमानाचा उपयोग धान्य/भाजीपाला, फळे, औषधी वनस्पती वाळवण्यासाठी करण्यात येतो.
  • ड्रायरमधील गरम हवा व सूर्याची किरणे या दोन्हीद्वारा पदार्थाची आद्रता लवकर कमी होते. या ड्रायरमध्ये अतिनील किरणे आत शिरत नसल्यामुळे पदार्थाची चव, रंग व गुणवत्ता टिकून राहते. कमी कालावधीत पदार्थ सुकल्यामुळे उच्च गुणवत्ता मिळते.
  • सौरकंदील

  • हे हलके व सहज वाहून नेता येणारे उपकरण आहे. पाच तासाच्या प्रभारीत कालावधीनंतर ३ ते ४ तास पर्यंत वापरता येतात.
  • सौरकंदील हे फोटोव्होल्टाइक माॅड्यूल्स, सीएफएल किंवा एलइडी, इनव्हर्टर, इलेक्ट्राॅनिक्स बॅटरीपासून बनविले जातात.सौरकंदील ५ ते ९ वॅट क्षमतेत उपलब्ध आहेत.
  • सौर पथदिवे

  • सौर पथदिव्याचे मुख्य घटक फोटोव्हाल्टाइक माॅड्यूल बॅटरी, कंट्रोल इलेक्ट्राॅनिक्स ल्युमिनरी आणि पथदीप लावण्यासाठी आवश्यक खांब इत्यादी आहेत.
  • सौर पथदिव्यामध्ये असलेल्या कंट्रोल इलेक्ट्राॅनिक्समुळे ते संध्याकाळ झाली की आपोआप सुरू होतात. पहाट झाली की आपोआप बंद होतात.
  • सौर दूरदर्शन संच

  • सौर दूरदर्शन संचामध्ये विद्युत निर्मितीसाठी ३० डब्लूपी क्षमतेची तीन किंवा चार पॅनेल्स वापरली जातात.
  • ही पॅनेल्स समांतर पद्धतीने जोडून त्यातून बारा व्होल्ट दाबाने वीज निर्मिती करून ती निर्यतकामार्फत बॅटरीमध्ये साठवली जाते.
  • सौर टीव्हीतील घटक व त्यांची क्षमता ः
  • सौर पॅनेल्स    ३५ डब्लूपी (३ नग)
  • बॅटरी    १२ व्होल्ट (१२० ए.एच.)
  • दूरदर्शन संच    १ नग
  • इन्व्हर्टर    १ नग
  • क्षमता    दररोज तीन तास
  •  : डाॅ. राहुल रामटेके, ७५८८०८२८६५ (वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com