मिरचीचा तिखटपणा त्यातील कॅपासिसीन या घटकांमुळे असतो. या कॅपासिसीनमुळेच आपल्या जिभेला मिरचीच्या उष्णतेची किंवा तिखटपणाची जाणीव होते. भविष्यामध्ये हा तिखटपणा टोमॅटोमध्ये आणणे शक्य होणार असल्याचे मत ट्रेण्ड्स इन प्लॅंट सायन्स या मासिकामध्ये व्यक्त करण्यात आले आहे. संशोधकांच्या मते, टोमॅटोमध्ये कॅपासिसीन निर्मिती करण्यासाठी सर्व घटक उपलब्ध आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या जनुकीय तंत्रज्ञानाद्वारे टोमॅटोमध्ये ही क्षमता आणणे फारसे अवघड नाही. मिरची आणि टोमॅटो ही दोन्ही पिके एकमेकांच्या जवळची असून, सुमारे १९ दशलक्ष वर्षापूर्वी एकाच पूर्वज वनस्पतीपासून तयार झाली आहेत. त्यामुळे त्यांच्यात मोठ्या प्रमाणात जनुकीय साम्य आहे. टोमॅटोमध्ये कॅपासिसीन निर्मितीचे सर्व जनुके उपलब्ध आहेत. मात्र, ती कार्यान्वित होण्यासाठीची मूलद्रव्यीय यंत्रणा उपलब्ध नाही. आधुनिक जनुकीय तंत्रज्ञानाद्वारे ती नक्कीच विकसित करता येऊ शकते, असे मत ऑगस्टीन झसोगोन यांनी व्यक्त केले. त्यासाठी अत्यंत थोड्या संशोधनाची आवश्यकता आहे. त्या दिशेने आमचे प्रयत्नही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. उपयुक्तता ः
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.