ट्रॅक्टरचलित कुट्टी यंत्र, खड्डे खोदाई यंत्र

ट्रॅक्टरचलित कुट्टी यंत्र, खड्डे खोदाई यंत्र
ट्रॅक्टरचलित कुट्टी यंत्र, खड्डे खोदाई यंत्र

मजूर टंचाई लक्षात घेता विविध यंत्रांची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे वेळ, श्रम आणि आर्थिक बचत होते. ट्रॅक्टरचलित पऱ्हाट्या कुट्टी, फवारणी आणि खड्डे करणारे यंत्र फायदेशीर ठरणारे आहे. ट्रॅक्टरचलित पऱ्हाट्या कुट्टी करणारे यंत्र :

  • हे यंत्र ट्रॅक्टरला थ्री पोइंट लिंकेजला जोडले जाते. पी.टी.ओ.च्या साह्याने फिरवले जाते.
  • एका वेळेस एक पऱ्हाट्याची ओळ जमिनीपासून जवळपास ५ सें.मी.पर्यंत तोडली जाते. त्यानंतर त्याची कुट्टी करून ब्लोअर च्या साह्याने मागे जमिनीवर फेकली जाते. केलेली कुट्टी यंत्राला मागे ट्रॉली जोडून गोळा करता येते.
  • वैशिष्ट्ये :

  • अतिशय सोपे, जलद व कार्यक्षम यंत्र.
  • वेळ श्रम आणि पैशात बचत.
  • भाडेतत्त्वावर अधिक उपयोगी कार्यक्षम यंत्र.
  • चारा बारीक करण्यासाठी सुद्धा याचा वापर.
  • पऱ्हाट्याची कुट्टी आच्छादनासाठी उपयोगी.
  • खड्डा करणारे यंत्र ः

  • फळबागेसाठी, वृक्षारोपण किंवा कुंपणाचे खड्डे करण्यासाठी यंत्र फायदेशीर.
  • ट्रॅक्टरच्या थ्री पॉइंट लिंकेजला जोडला जातो.
  • पी.टी.ओ.च्या साह्याने ऊर्जा घेऊन ती गिअरच्या साह्याने स्क्रूला दिली जाते.
  • वेगवेगळ्या आकाराचे आणि खोलीचे खड्डे करण्यासाठी या यंत्राला वेगवेगळे स्क्रू वापरता येतात.
  • संपर्क ः वैभव सूर्यवंशी ः ९७३०६९६५५४ (कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद, जि. जळगाव)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com