agricultural stories in Marathi, agrowon, technowon, traditinal medicine are useful in animal husbandry | Page 2 ||| Agrowon

पशू उपचारासाठी औषधी वनस्पती ठरताहेत फायदेशीर...
अमित गद्रे
शुक्रवार, 3 मे 2019

भारतात पुरातन काळापासून मानवी तसेच पशू उपचारासाठी औषधी वनस्पतींचा वापर होत आहे. आजही ग्रामीण भागात वैदू लोक जनावरांच्या उपचारासाठी औषधी वनस्पतींचा वापर करताना दिसतात. या उपचारपद्धती चांगल्या आहेत. परंतु, गेल्या काही वर्षांत औषधी वनस्पती नामशेष होत आहेत तसेच खात्रीशीर उपचार करणाऱ्या वैदूंची संख्यादेखील कमी होत आहे. हे लक्षात घेऊन परंपरागत पशू उपचार पद्धती, औषधी वनस्पतीचे संवर्धन आणि प्रसार करण्याचे काम बाएफ संस्थेने हाती घेतले आहे.

भारतात पुरातन काळापासून मानवी तसेच पशू उपचारासाठी औषधी वनस्पतींचा वापर होत आहे. आजही ग्रामीण भागात वैदू लोक जनावरांच्या उपचारासाठी औषधी वनस्पतींचा वापर करताना दिसतात. या उपचारपद्धती चांगल्या आहेत. परंतु, गेल्या काही वर्षांत औषधी वनस्पती नामशेष होत आहेत तसेच खात्रीशीर उपचार करणाऱ्या वैदूंची संख्यादेखील कमी होत आहे. हे लक्षात घेऊन परंपरागत पशू उपचार पद्धती, औषधी वनस्पतीचे संवर्धन आणि प्रसार करण्याचे काम बाएफ संस्थेने हाती घेतले आहे.

या उपक्रमाबाबत माहिती देताना बाएफ संस्थेतील कार्यक्रम कार्यकारी सदाशिव निंबाळकर म्हणाले, की गेल्या चार वर्षांपासून आम्ही महाराष्ट्रातील पेठ (जि. नाशिक) आणि जव्हार (जि. पालघर) तालुक्यात पशू उपचारामध्ये औषधी वनस्पतींचा वापर करणाऱ्या ९७ वैदूंशी प्रत्यक्ष बोलून नोंदी घेतल्या. वैदूतर्फे जनावरांच्या काही प्राथमिक आजारावर होणारे उपचार, वापरण्यात येणाऱ्या औषधी वनस्पती, त्यांचा योग्य वापर आणि आजारावर उपचार केल्यानंतर होणारा परिणाम याच्या शास्त्रीय नोंदी घेतल्या.

आजार लक्षात घेऊन वैदूने तयार केलेल्या औषधाची प्रत्यक्ष जनावरांवर चाचणी संस्थेच्या पशू तज्ज्ञांनी घेतली. या औषधोपचाराचा जनावरावर झालेला परिणाम तपासला. औषधी वनस्पती आणि तयार केलेल्या औषधाची खात्री करण्यात आली. त्यानंतर खात्रीशीर औषधी वनस्पती आणि उपचारपद्धतींचा प्रसार पशुपालकांपर्यंत करण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांत पेठ (जि. नाशिक) आणि जव्हार (जि. पालघर) या तालुक्यांतील २६ गावांतील सुमारे ६०० पशुपालकांना औषधी वनस्पतींचा पशू उपचारात कसा वापर करायचा याचे प्रशिक्षण बाएफ संस्थेने दिले आहे. त्यांचे चांगले परिणाम दिसून येत आहेत.

पशुपालकांसाठी हर्बल गार्डन :

  • बाएफ संस्थेतील तज्ज्ञांनी औषधी वनस्पतींद्वारे पशू उपचाराची माहिती पोचविण्याबरोबरच गेल्यावर्षी पेठ आणि जव्हार तालुक्यांतील चार शेतकऱ्यांच्या शेतावर विविध प्रकारच्या तीस औषधी वनस्पतींची सुमारे ३० हजार रोपे तयार केली. याबाबत माहिती देताना बाएफ संस्थेतील वरिष्ठ संशोधन अधिकारी दीपक पाटील म्हणाले, की संस्थेच्या उपक्रमात सामील झालेल्या प्रत्येक पशुपालकास हर्बल गार्डन उभारणीसाठी प्रत्येकी तीस औषधी वनस्पतींच्या रोपांचे वाटप करण्यात आले. याबरोबर रोप लागवडीविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. पशुपालकांनी ही रोपे शेती बांधावर तर काही जणांनी गोठ्याजवळ लावून हर्बल गार्डन तयार केली. याचा चांगला फायदा पशुउपचारासाठी होत आहे.
  • हर्बल गार्डनमध्ये औषधी वनस्पतींची निवड करताना पहिल्यांदा जास्त प्रमाणात दिसणारे पशू आजार म्हणजेच पोटफुगी, जंत प्रादुर्भाव, हगवण, गोचिड प्रादुर्भाव लक्षात घेतला. या आजारावर उपचारासाठी लागणाऱ्या औषधी वनस्पतींची निवड करण्यात आली. पशुपालकांना या वनस्पतींपासून औषधनिर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले. पशुपालक आजारानुसार औषध तयार करून जनावरांच्या उपचारासाठी वापरतात. यामुळे स्थानिक पातळीवर तातडीने प्रथमोपचार करणे शक्य झाले. सदर प्रशिक्षण कार्यक्रमामुळे स्थानिक वैदूंकडून परिसरातील शेतकरी औषधी वनस्पतींच्या उपचारांची माहिती घेत आहेत.
  • वैदू लोकांच्या अनुभवावरून ज्या दुर्मीळ आणि उपयुक्त औषधी वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्यांचे जतन व संवर्धन करण्याची जागरूकता पशुपालकांंमध्ये आली आहे. प्रामुख्याने गूळवेल, चिबड, कडुनिंब, वेखंड, मोह, निरगुडी, खाजकुहिली, करंज, सीताफळ, रिठा, बेल, अर्जुन सादडा, बाफळी, नरखी, पाभा, शतावरी, महारूख, आंबेहळद, निंभारा, कहानडोळ, कडू सिरडा, दाती, काळाकुडा, खरोटा, करवळ, खांदवेल, टेटू, धामोडा, रूई, पळस, शिसव, ओवा, रानमूग, एकदांडी, सफेद मुसळी, भारंगी, वाघोटा इत्यादी औषधी वनस्पतींच्या लागवडीवर भर देण्यात आला आहे.

औषधी वनस्पतींची नोंद ः

१) पालघर आणि नाशिक जिल्ह्यांत पारंपरिक पशू औषधी वनस्पतींचा अभ्यास करताना १७८ प्रजातींची ७३ कुळे आणि १५२ वनौषधींची नोंद.
२) नोंदण्यात आलेल्या प्रजातीपैकी ७४ वृक्ष,४९ झुडुपे,२९ क्षुप- वनस्पती आणि २६ वेलवर्गीय वनस्पतींचा जनावरांच्या औषधोपचारासाठी वापर.
३) बाएफतर्फे प्रकाशित मार्गदर्शन पुस्तकामध्ये ८० वनस्पतींच्या प्रजातींची नोंद.

पशुपालकांपर्यंत पोचवतोय तंत्रज्ञान...

परंपरागत औषधी वनस्पतींचा पशू उपचारातील वापराच्या शास्त्रीय नोंदी आम्ही ठेवत आहोत. जनावरांच्या आजारावर उपचार करणारे वैदू आणि पशुपालकांना योग्य पद्धतीने औषधी वनस्पतींच्या वापराचे प्रशिक्षण दिले जात आहे. परंपरागत ज्ञान आणि आधुनिक उपचारपद्धतीची सांगड घालून हे तंत्र राज्यभरातील पशुपालकांपर्यंत पोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- गिरीश सोहनी, अध्यक्ष, बाएफ.

संपर्क ः सदाशिव निंबाळकर, दीपक पाटील
०२०-२६९२६२४८ /२६९२६२६५

बाएफ, मध्यवर्ती संशोधन केंद्र, उरुळी कांचन, जि. पुणे

टॅग्स

इतर कृषिपूरक
चिकन, मांस विक्रीसाठी गुणवत्ता नियमचिकन, मांस विक्रेत्यांना परवाना घेण्यासाठी...
निवड दुधाळ गाई, म्हशींची...दुग्ध व्यवसायासाठी गाई, म्हशींची निवड करताना...
कोवळ्या ज्वारीच्या विषबाधेपासून जनावरे...कोवळ्या ज्वारीची पाने अधिक प्रमाणात खाल्ल्याने...
कोंबड्यांच्या आरोग्याकडे द्या लक्षपावसाळ्यात मुख्यतः शेड, खाद्य,पाणी आणि लिटरचे...
पशुआहारात वापरा शतावरीजनावरांच्या स्वास्थासाठी वनौषधींचा उपयोग फायदेशीर...
जनावरांना द्या पुरेसा आहार, पाणीजनावरांना आपण गरजेनुसार पाणी देण्याऐवजी आपल्या...
दूध गुणवत्तावाढीसाठी सुप्त कासदाह टाळादुधाळ जनावरांमध्ये साधारणपणे १० ते १२ टक्के या...
सक्षम करा दुग्धव्यवसाय डेअरी हा व्यवसाय म्हणून पाहावा. त्याचे अर्थकारणही...
वाढत्या तापमानात गाई, म्हशींचे आरोग्य...सध्या काही भागांत प्रमाणापेक्षा उष्ण तापमान व...
खाऱ्या पाण्याचा जनावरांच्या आरोग्यावर...खारे पाणी जनावरांची कार्यक्षमता, उत्पादनक्षमता...
भारतातील आधुनिक मधमाश्‍या पालनाचा इतिहासजागतिक मधमाश्‍या दिन विशेष भारतीय उपखंड हे...
तुती लागवडीत आच्छादन करा, संरक्षित पाणी...तुती लागवड तसेच रोपवाटिकेत काळे पॉलिथीन आच्छादन...
शेततळ्यातील मत्स्यशेती शेततळ्यात पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या...
बैलामधील खांदेसूजीवर उपायउन्हाळ्यात नांगरणी, कुळवणी, तसेच पावसाळ्याच्या...
कोकण कन्याळ शेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांतील...
शेळ्यांसाठी चारासाधारणपणे शेळ्यांना प्रतिदिन अडीच किलो हिरवा चारा...
लेप्टोस्पिरोसिसपासून जनावरांची काळजी...निरोगी जनावरांचा बाधित जनावरांशी संबंध, गोठ्यातील...
योग्य वेळी लसीकरण करा, आजार टाळाजनावरांतील आजारांच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शक...
नर रेडकांच्या संगोपनातून वाढवा नफा नर रेडकांचा व्यवस्थित सांभाळ करून, त्यांना योग्य...
पशू उपचारासाठी औषधी वनस्पती ठरताहेत...भारतात पुरातन काळापासून मानवी तसेच पशू उपचारासाठी...